अल्सर म्हणजे काय
पचनमार्गाच्या आवरणावर होणा-या जखमा म्हणजे अल्सर. अल्सर सामान्यपणे डिओडिनममध्ये (आतड्याच्या पहिल्या भागात) होतो किंवा पोटात होतो. (त्याला गॅस्ट्रीक अल्सर असे म्हणतात).
अल्सर कशाने होतो
- हेलिकोबॅक्टर पायरोली नावाच्या जिवाणू मुळे बरेचसे अल्सर होतात.
- आम्ल व इतर पाचक द्रव्ये पचनमार्गावर जळजळ करुन अल्सर होण्यास मदत करतात. जेव्हा शरिर जास्त आम्ल तयार करते तेव्हा किंवा पचनमार्गावर जखमा झाल्यास अल्सर होतो.
- अल्सर असणा-यांमध्ये तो शाररिक किंवा मानसिक त्रासाने वाढू शकतो.
- काही वेदनाशामक गोळ्यांच्या सतत सेवनाने देखील अल्सर होऊ शकतो.
अल्सरची लक्षणे
- खाल्यावर चांगले वाटते पण २ ते ३ तासात अचानक तब्येत बिघडते (आतड्याचा अल्सर)
- खाल्यावर किंवा काही प्यायल्यावर मचुळ वाटते. (गॅस्ट्रीक अल्सर)
- रात्री जाग आणणारी पोट दुखी.
- पोटात जड वाटणे, आंबट ढेकर येणे, जळजळ किंवा पोट बिघडणे
- उलट्या
- अचानक वजनात घट
अल्सरवरील काही सामान्य ऊपाय
- धुम्रपान टाळा
- डॉक्टरने सांगितल्याशिवाय मनाने औषधे घेणे टाळा.
- कॅफेनचे सेवन किंवा दारु पिणे टाळा
- छातीत जळजळ असेल तर तिखट खाणे टाळा
अल्सर धोकादायक असल्याची काही चिन्हे
- उलटीवाटे रक्त जाणे
- उलटीवाटे फार पहिले सेवन केलेले अन्न वा पेय बाहेर पडणे.
- अशक्तपणा किंवा मळमळ जाणवणे.
- शौचास रक्त जाणे (रक्तामुळे शौचाचा रंग लाल किंवा काळा होतो)
- मळमळ होत राहणे किंवा सतत उलट्या होणे.
- पोटात अचानक जोरात दुखणे.
- वजनात घट होणे
- औषध घेऊन देखील दुखणे न थांबणे.
- दुखणे पाठी पर्यंत पोहोचणे.
स्त्रोत : पोर्टल कंटेंट टिम अंतिम सुधारित : 8/21/2020
0 रेटिंग्स आणि 0 टिप्पण्या
तार्यांवर रोल करा, नंतर दर क्लिक करा.
© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.