संतृप्त चरबी
संतृप्त चरबी हि पशु उप्तादने आणि प्रक्रिया केलेल्या खाद्यपदार्थामध्ये आढळते जसे, मांस, डेयरी उत्पादने, चिप्स आणि पेस्ट्रिजमध्ये आढ्ळते.
असंतृप्त चरबी
असंतृप्त चरबी हि काजू, अँव्होकॅडो आणि ऑलिव्ह सारख्या खाद्य पदार्थामधुन आढळते
खाद्यपदार्थांमध्ये आढळणार्या दोन मुख्य प्रकारच्या मेदांमधील फरक जाणून घेतल्यानंतर, तुमचे कोलेस्ट्रॉल कमी करण्यास तुम्हांला मदत होईल. जरी दोन्ही प्रकारचे मेद पुष्कळशा पदार्थांमध्ये आढळत असले तरी, ह्यांची निर्मिती समानुरूप नसल्याचे अभ्यासाने सिध्द झाले आहे. असंपृक्त मेद तुमच्या ह्रदयासाठी लाभदायक असू शकते, पण संपृक्त मेद तुमच्या कोलेस्ट्रॉलसाठी आणि ह्रदयाकरीता अहितकर ठरते.
म्हणूनच, जर तुम्ही कोलेस्ट्रॉल कमी करणारा संतुलित आहार घेत असाल तर, असंपृक्त मेदयुक्त आहार घेतल्याने तुमचे कोलेस्ट्रॉल (स्तर) वाढणार नाही. तथापि, उच्च संपृक्त मेद असलेले घेणे तुम्ही टाळायला हवे.
ह्रदयाच्या आरोग्यवृध्दिसाठी चांगल्या असणार्या, असंपृक्त मेदाची विभागणी दोन मुख्य श्रेणींमध्ये करता येते; मोनोअनसॅच्युरेटेड व पॉलीअनसॅच्युरेटेड फॅटस्. ह्या दोन्ही प्रकारच्या मेदांतील फरक त्यांच्या संरचनेवर आधारित आहे. मोनोअनसॅच्युरेटेड फॅटच्या संरचनेत एक दुहेरी बंध असतो. तर दुसरीकडे, पॉलीअनसॅच्युरेटेड मेदाच्या संरचनेत दोन किंवा जास्त दुहेरी बंध असतात. संपृक्त मेद व ट्रान्स फॅटच्या जागी मोनोअनसॅच्युरेटेड व पॉलीअनसॅच्युरेटेड फॅट घेतल्यास ह्रदयरोगापासून तुमचे संरक्षण करण्यास मदत करतील. ह्याबाबत मोनोअनसॅच्युरेटेड व पॉलीअनसॅच्युरेटेड फॅटसंबंधी पुष्कळसा पुरावा आहे.
नॅशनल कोलेस्ट्रॉल एज्युकेशन प्रोग्रॅम प्रमाणे, तुमच्या दैनिक (आहारामध्ये) पॉलीअनसॅच्युरेटेड फॅट्स चे प्रमाण 10 टक्केपर्यंत असू शकते. पॉलीअनसॅच्युरेटेड फॅट खालील प्रकारच्या खाद्य पदार्थां पासून मिळू शकतात; मेवे, वनस्पति तेले (मक्याचे तेल, करडईचे तेल).
कोलेस्ट्रॉल म्हणजे चरबीसारखा एक पदार्थ असतो ज्याची निर्मिती आपल्या Or काळीजात होते तसेच आपण घेत असलेल्या पुष्कळशा खाद्यपदार्थांमध्ये देखील हा आढळतो. आपल्या शरीरात आपल्याला आवश्यक असलेल्या सर्व कोलेस्ट्रॉलचे उत्पादन होत असते पण आपणांस कोलेस्ट्रॉलची आवश्यकता कशासाठी जाणवते? खरे तर, कोलेस्ट्रॉल पुष्कळशा महत्वपूर्ण शारीरिक क्रियांसाठी आवश्यक असते ज्यामध्ये खालील बाबींचा समावेश आहे:
तुमच्या आरोग्यासाठी शरीरात जास्त प्रमाणात कोलेस्ट्रॉल असणे घातक असले तरी ही, तुमच्या शरीरातील हे एक महत्वपूर्ण संयोजन आहे. पुष्कळशा शारीरिक प्रक्रियांसाठी कोलेस्ट्रॉल जवाबदार आहे.
उदाहरणार्थ, लैंगि व स्टेरॉइड हार्मोन्सकरीता कोलेस्ट्रॉल एक महत्वपूर्ण अग्रगामी आहे. आपल्या शरीरातील प्रत्येक पेशीस ह्याच्यामुळे संरचनात्मक आधार मिळतो, कारण कोलेस्ट्रॉल हा पेशींच्या त्वचावेष्टनामधील एक मुख्य घटक आहे. त्याबरोबरच, आपल्या मज्जातंतुंना आवरण किंवा वेष्टन घालणार्या मायलिन शीथच्या निर्मितीसाठी कोलेस्ट्रॉल फार आवश्यक आहे. उच्च कोलेस्ट्रॉल व ह्रदयरोग यांच्यातील एक सशक्त कडी असूनसुध्दा, आपल्या शरीरांत कोलेस्ट्रॉलची थोडीशी मात्रा असणे आवश्यक असते.
सर्व साधारणपणे, आपले कालीज शारीरिक प्रक्रियांसाठी आपणांस आवश्यक असलेल्या ८० टक्के कोलेस्ट्रॉलची निर्मिती करते आणि बाकीची मात्रा आपल्या आहारांतून आपणांस मिळते.
कोलेस्ट्रॉल घेण्याची तुमची दैनिक मात्रा २०० ग्रामपेक्षा जास्त नसावी. तथापि, आपल्याला आवश्यक असलेल्या कोलेस्ट्रॉलच्या दैनिक मात्रेची निर्मिती करण्यास कालीज सक्षम असते, म्हणून खरे पाहतां, आहारातून देखील कोलेस्ट्रॉल घेण्याची काही ही गरज नाही.
आम्ही आधी म्हटल्याप्रमाणे, आपण घेत असलेल्या आहारातून मिळणार्या मेदाची मात्रा आपल्या कोलेस्ट्रॉल व ट्राइग्लिसराइड पातळीवर पुष्कळ प्रभाव टाकते. चुकीच्या कोलेस्ट्रॉलची पुष्कळशी मात्रा आणि तुम्हांला तुमच्या कोलेस्ट्रॉलची पातळी उच्च झाल्याचे जाणवेल. तुमच्या आहारीय मेदावर नियंत्रण ठेवण्यासाठी येथे काही नुस्खे दिलेल्या आहेत.
ट्रिग्लिसिराइडस् हे शरीरामधील बहुतेक मेदांचे व आपण खातो त्या आहाराचे रासायनिक स्वरूप आहे. जेव्हां आपण खातो, आपले शरीर मेदाचे रूपांतर ट्रिग्लिसिराइडस् मध्ये करते, जे आपणांस गरज पडेल तेव्हां साठवून ठेवलेल्या उर्जेचे स्वरूप आहे. जेव्हां ही शरीरास उर्जेची गरज पडते, ट्रिग्लिसिराइडसचे निष्पादन केले जाते आणि आपल्या शरीराच्या उर्जाविषयक गरजा पूर्ण करण्यासाठी इंधनाच्या स्वरूपात ह्यांचे ज्वलन होते.
तुमच्या आरोग्यविषयक तपासणीचा एक भाग म्हणून, तुमच्या शरीरातील कोलेस्ट्रॉल व ट्रिग्लिसिराइडसचे प्रमाण मोजण्यासाठी डॉक्टर बहुतेक तुमचे रक्त परीक्षण करतात. काही जणांची पातळी अगदी योग्य अशी असते. पण काही लोकांना, त्यांचा आहार, ते घेत असलेले औषधोपचार, किंवा त्यांची जनुकीय-बांधणी, ह्यांच्यामुळे त्यांच्या शरीरातील कोलेस्ट्रॉल व ट्रिग्लिसिराइडसचे प्रमाण आवश्यक त्यापेक्षा जास्त होते. दुर्दैवाने जास्त उंचावलेली पातळी योग्य नाही. खरे तर, शरीरात कोलेस्ट्रॉल व ट्रिग्लिसिराइडसचे प्रमाण जास्त असणे तुमच्या प्रकृतीस धोकादायक आहे. कोलेस्ट्रॉल व ट्रिग्लिसिराइडसची पातळी प्रमाणापेक्षा जास्त असण्याचा संबंध खालील बाबींशी लावता येतो:
कोलेस्ट्रॉलच्या पातळीवर पुष्कळशा घटकांचा प्रभाव पडतो. यापैकी काही आपल्या नियंत्रणाच्या बाहेर आहेत; उदाहरणार्थ, आनुवांशिक स्वभावधर्म (कुटुंबात कोणाला तरी कोलेस्ट्रॉलची पातळी उच्च असण्याचा त्रास असल्याचा इतिहास असणे). पण पुष्कळसे घटक आपल्या नियंत्रणात असतात. ह्यांमध्ये खालील घटकांचा समावेश असतो:
अंतिम सुधारित : 7/11/2020
या विभागात अ जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे म्हणजेच योग...
अतिसार म्हणजे वारंवार मलप्रवृत्ती होणे, मल पातळ हो...
डॉक्टर्स आणि नर्सेस एवढेच मनुष्यबळ गृहीत धरून स्वा...
एक किंवा एकापेक्षा अधिक वेळा पातळ अगर पाण्यासारखी ...