जंतूदोषांमुळे हृदयाच्या झडपांचा आजार होऊन त्या बिघडतात हे आपण पाहिले. झडपांच्या आजाराचे व बिघाडाचे सांधेहृदयताप हे सर्वात प्रमुख कारण आहे. याशिवाय झडपांचे काही आजार जन्मजात असतात.
जन्मजात आजारांपैकी काही आजारांत झडपांत दोष (किंवा) हृदयाच्या कप्प्यांमधील पडद्यात भोके असतात. या भोकांमुळे रक्तप्रवाहात उलटसुलट गती निर्माण होते.
दम लागणे हे लक्षण झडपांच्या वा पडद्यांच्या दोषामुळे येणारे प्रमुख लक्षण असते. या आजारांमुळे लहान मुलांमध्ये खेळण्याची प्रवृत्ती कमी होऊन मुले बसून राहतात. पुन्हा पुन्हा कफ/ खोकला व दम येतो. आजाराची तीव्रता जास्त असेल तर जीभ, नखे,इत्यादींवर निळसर झाक दिसते. याचा अर्थ रक्ताच्या शुध्दीकरणाचे म्हणजे प्राणवायूचे प्रमाण कमी आहे. मुलाच्या छातीवर हात ठेवला तर दर ठोक्यागणिक थरथर जाणवते. अनेक मुलांची या आजाराने वाढ खुंटते व वजन कमी राहते.
तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार औषधोपचार व शस्त्रक्रिया करणे योग्य ठरेल. काही झडपांच्या व पडद्यांच्या दोषावर शस्त्रक्रियेचा अगदी चांगला फायदा होतो.
लेखक : डॉ. श्याम अष्टेकर
(MBBS, MD community Medicine)
संदर्भ : आरोग्यविद्या
अंतिम सुधारित : 4/19/2020
योनिद्वारे रक्तस्रावाची कारणे अनेक आहेत. त्यांचे य...
एक किंवा एकापेक्षा अधिक वेळा पातळ अगर पाण्यासारखी ...
अतिसाराबाबतच्या माहितीचा प्रसार करणे व तिची अंमलबज...
प्रत्येकच रोग सर्वानाच होतो असं नाही परंतु बहुतांश...