অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

हृदयावरणातील उत्प्रवाह

प्रस्तावना

हृदयावरणातील उत्प्रवाह म्हणजे हृदयावरण पोकळीमध्ये वाजवीपेक्षा जास्त प्रमाणात द्रव साठणे. शरीरातील स्थानिक किंवा एकंदर असंतुलनामुळे हे होऊ शकते किंवा दुसर्‍याच एखाद्या अज्ञात कारणामुळेही. हृदयावरणातील उत्प्रवाह गंभीर असू शकतात आणि रोग्याच्या लक्षणांवर त्यांचा संथपणे परंतु निश्चितपणे परिणाम होतो. हृदयावरण पोकळीमध्ये साधारणतः १५-२० मिलि द्रव असतो आणि हृदयावरणाच्या विसेरल आणि पॅरिटल प्रकारच्या थरांना वंगण पुरवण्यासाठी तो आवश्यक असतो. हृदय व संबंधित अवयवांचे काम नीट चालण्यामध्ये हृदयावरण आणि हृदयावरण-द्रवाचा मोलाचा वाटा असतो. हृदयावरणातील दाबाच्या अंतर्गत संतुलनाला फारसा धक्का न पोहोचू देता हृदयावरण थोडे ताणले जाऊ शकते आणि द्रव सामावून घेऊ शकते. मायोकार्डियमचे एकसमान आकुंचन होण्यामध्ये हृदयावरणाची महत्त्वाची भूमिका असते. ह्यामुळे हृदयावरील सर्व ताण एकसमान रीतीने वितरित केले जातात.

हृदयावरणाच्या ह्या पिशवीमध्ये द्रव किती प्रमाणात साठतो आहे ह्यावर हृदयावरणातील उत्प्रवाहाची लक्षणे दिसणे अवलंबून असते. द्रव जास्त वेगाने साठल्यास, अगदी ८० मिलि द्रवामुळेदेखील, हृदयावरणातील अंतर्गत दाब वाढू शकतो. द्रव साठण्याचा दर संथ असल्यास कोणतीही लक्षणे न दाखवता हे उत्प्रवाह २१ पर्यंत वाढू शकतात.

हृदयावरणातील उत्प्रवाह - कारणे

असाधारण प्रमाणात द्रव तयार होण्याच कारणे ह्या बाबींवर अवलंबून असतात -

1) पेरिकार्डायटिससारख्या दुखण्यानंतर
2) साधारणपणे लिम्फॅटिक मार्गांमधून द्रव बाहेर टाकला जातो. परंतु काही कारणाने ह्यात अडथळ आल्यास परिस्त्रावक द्रव तयार होतात.
३) हृदयावरणामधील दाहक, सांसर्गिक, घातक किंवा स्वप्रतिबंधक प्रक्रियांनंतर निःस्त्रावी द्रव तयार होतात.

  • इडिओपॅथिक - बर्‍याच प्रकरणांत कारण अज्ञातच राहते.
  • सांसर्गिक -
    • दुसर्‍या पातळीचा जीवाणुसंसर्ग
    • अचानक झालेला संसर्ग
    • घातक अर्बुद (कॅपोसी सॅक्रोमा, लायफोमा)
    • एड्समुळे विविध मार्गांनी हृदयावरणातील उत्प्रवाह सुरू होऊ शकतो. उदा. -
    • विषाणुजन्य - पेरिकार्डायटिस आणि मायोकार्डायटिसचे हे सार्वत्रिक कारण आहे. खालील विषाणूंमुळे हे दुखणे उद्भवते -
    • पायोजनिक (न्युमोकोक्काय, स्ट्रेप्टोकोक्काय, स्टॅफिलोकोक्काय, नेसेरिया, ट्युबरक्युलस)
    • बुरशीजन्य (हिस्टोप्लाझ्मोसिस, कोक्किडियोइडोमायकोसिस, कॅँडिडा)
    • इतर प्रकारचे संसर्ग (सिफिलिटिक, प्रोटोझोअल, पॅरासायटिक)
  • पोस्टऔपरेटिव/पोस्टप्रोसिजरल - हृदयारोपणानंतर शरीराने अवयव नाकारल्यास होऊ शकते.
  • फारशी न पाहिली जाणारी काही इतर कारणे अशी आहेत -
    • युरेमिया
    • मायक्सेडेमा
    • हृदयाच्या धमनिकेशीसंबंधी हायपरटेन्शन
    • रेडिएशन थेरेपी म्हणजे लाइट घेणे
    • फ्री वॉल फाटल्यामुळे होणारी संभाव्य गुंतागुंत, गंभीर मायोकार्डियल इन्फार्क्शन
    • हृदयावरणाच्या पिशवीतील गळतीमुळे स्त्रव (हॅमरेज) होणे - एरॉटिक डिसेक्शन
    • ट्रॉमा
    • अतिसंवेदनशीलता किंवा स्वयंप्रतिबंधाशी संबंधित
  • सिस्टेमिक ल्युपस एरिथेमॅटोसस
  • र्‍हुमेटॉइडल आर्थरायटिस (सांधेदुखी)
  • अ‍ॅँकिलूजिंग स्पॉन्डिलायटिस
  • संधि-ताप (र्‍हुमॅटिक फीवर)
  • स्क्लेरोडर्मा
  • औषधांशी संबंधित (प्रोकेनामाइड, हायड्रालेझिन, आयसोनियाझिड, मायनोक्सिडिल, फेनिटॉइन, अ‍ॅँटिकोएग्युलंट, मेथिसर्जाइड)
  • लक्षणे

  • कार्डिओवास्क्युलर -
    • छातीत दुखणे, दाबल्यासारखे वाटणे, अस्वस्थता. एक लक्षात घेण्याजोगी बाब म्हणजे हृदयावरणाचे दुखणे बसून पुढे वाकल्याने कमी होते तर आडवे झोपल्याने वाढते.
    • डोके हलके वाटणे, सिन्कोप
    • धडधड वाढणे
  • श्वसनासंबंधी -
    • खोकला
    • डिस्निया
    • आवाज बसणे
  • पचनशी संबंधित
    • उचक्या
  • मेंदू व चेतासंस्थेशी संबंधित
    • घाबरल्यासारखे वाटणे
    • मनाचा गोंधळ होणे

    हृदयावरणातील उत्प्रवाह - लक्षणे

    पेरिकार्डियल फ्रिक्शन रब -
    • ह्याच्या गंभीर स्थितीचे निदर्शक लक्षण म्हणजे हृदयाच्या एका चक्रक्रमात ३ घटक असणे. आवाज उच्च-कंपनाचा, घासणारा किंवा खरवडणारा असतो. कधीकधी, छातीच्या पिंजर्‍यावर डावीकडील खालच्या मागील कडेला स्टेथोस्कोप दाबून धरल्यासच, तो जाणवतो.
    • टॅकिकार्डिया
    • टॅकिनिया
    • श्वासाचा आवाज कमी होणे (प्लूरल उत्प्रवाहानंतर)
    • हिपॅटोस्प्लेनोमेगाली (यकृत आणि पांथरीचा आकार वाढणे)
    • हृदयाचे अनियमित ठोके
    • एडिमा
    • सायनोसिस

    स्त्रोत : पोर्टल कंटेंट टिम

    अंतिम सुधारित : 4/22/2020



    © C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
    English to Hindi Transliterate