ह्रयूमॅटिक हृदयविकार एक असा रोग आहे जो, घशात स्ट्रेप्टोकोकल बॅक्टेरियाच्या संक्रमणामुळे सुरु होतो व हृदयाच्या झडपा (पडद्यासारख्या झडपा ज्यामुळे रक्ताचा उलटा प्रवाह रोखला जातो.) निकामी होतात. जर या घशाच्या संक्रमणावर उपचार केले नाहीत तर ह्रयूमॅटिक ताप येतो, व सतत ताप येऊन येऊन ह्रयूमॅटिक हृदयविकार होतो.
ह्रयूमॅटिक ताप हा शोथविकार असून तो शरीराच्या संयोजी ऊतकांवर परिणाम करतो, विशेषत: हृदयावर, अस्थिसंधींवर, मेंदूवर आणि कातडीवर. जेंव्हा ह्रयूमॅटिक ताप हृदयाचे कायमचे नुकसान करतो, त्याच्या परिणामाला ह्रयूमॅटिक हृदयविकार असे म्हटले जाते.
कोणत्या ही वयोगटातील व्यक्तींना तीव्र ह्रयूमॅटिक तापाला सामोरे जावे लागू शकते, पण साधारणपणे हा रोग 5 ते 15 वर्षाच्या मुलांमध्ये जास्त प्रमाणात आढळतो.
हृदयाच्या क्षतिग्रस्त झालेल्या झडपा एकतर पूर्णपणे बंद होत नाहीत (इनसफिशियन्सी) किंवा पूर्णपणे उघडत नाहीत (स्टेनोसिस).
ज्या झडपा पूर्णपणे बंद होत नाहीत, पंप झालेल्या रक्तास परत मागे कक्षात स्त्रवण्यास कारणीभूत होतात. ह्याला रिगरगिटेशन किंवा गळती म्हणतात. हृदयाच्या पुढील स्पंदनाबरोबर, हे रक्त झडपांतून झिरपते व नियमित रक्तात मिसळते. ह्या रक्ताच्या जास्त वाहण्यामुळे हृदयाच्या स्नायूंवर जास्त ताण पडतो.
जेंव्हा हृदयाच्या क्षतिग्रस्त झालेल्या झडपा पूर्णपणे उघडत नाहीत, त्यावेळी हृदयावर नेहमीपेक्षा अरुंद जागेतून रक्त पंप व्हावे ह्यासाठी जास्त ताण पडतो. साधारणपणे ह्याची काही ही लक्षणे दिसून येत नाहीत जो पर्यंत झडपा फार अरुंद होत नाहीत.
छातीचा एक्स-रे आणि इलेक्ट्रोकार्डियोग्राम या दोन चाचण्यांच्या आधारे हृदयावर अशा प्रकारचा परिणाम झाला आहे कां हे पाहता येते.
रुग्णाची तब्येत, त्याचा मागील वैद्यकीय इतिहास आणि रोगाची तीव्रता पाहून काय औषधोपचार करावा हे डॉक्टर ठरवतो.
ह्रयूमॅटिक ताप हा हृदयावर परिणाम करत असल्यामुळे, त्यावर जास्तीत जास्त चांगला उपाय म्हणजे ह्रयूमॅटिक तापापासून बचाव करणे.
ह्रयूमॅटिक हृदविकारावर बचाव म्हणजे ह्रयूमॅटिक तापापासून बचाव करणे. घशाच्या संक्रमणाचा त्वरित उपायाने बचाव करता येऊ शकतो. जर ह्रयूमॅटिक ताप आलाच, तर पुढील झटके वाचविण्यासाठी नियमित एंटीबायोटिक उपचार घेणे महत्वाचे आहे.
स्त्रोत : पोर्टल कंटेंट टिम
अंतिम सुधारित : 7/1/2020
प्रत्येकच रोग सर्वानाच होतो असं नाही परंतु बहुतांश...
अतिसाराबाबतच्या माहितीचा प्रसार करणे व तिची अंमलबज...
योनिद्वारे रक्तस्रावाची कारणे अनेक आहेत. त्यांचे य...
अतिसार म्हणजे वारंवार मलप्रवृत्ती होणे, मल पातळ हो...