उदरपोकळी पाहताना मात्र पोटावर एक छोटे छिद्र पाडावे लागते. मोठे आतडे तपासायचे असल्यास गुदद्वारातून मूत्रनलिकेतून मूत्राशय, घशातून जठर व श्वासनलिका हे अवयव तपासता येतात. जठर, मूत्राशय, आतडे, इत्यादी भागांतले कर्करोग अत्यंत छुपे असतात. या तंत्राने ते चांगले तपासता येतात. तपासणीसाठी त्या अवयवाचा छोटासा भागही काढून घेता येतो.
'दुर्बिणीच्या' सहाय्याने केली जाणारी स्त्रीनसबंदी याच तंत्राचा वापर करून केली जाते.
लेखक : डॉ. श्याम अष्टेकर (MBBS, MD community Medicine)
संदर्भ : आरोग्याविद्या
अंतिम सुधारित : 6/6/2020
जीवोतक परीक्षा : (बायोप्सी). जिवंत शरीरातून घेतलेल...
दृष्टीदोष असेल तर नेत्रतज्ज्ञ विशिष्ट तक्ते वापरून...
क्ष-किरण (एक्स-रे) हे डोळयांना न दिसणारे किरण असता...
हिरडया निरोगी असतील तर दोन दातांच्या फटीमध्ये त्या...