काही वेळा शरीरातून शस्त्रक्रियेने काही भाग बाहेर काढला जातो. या भागाची सूक्ष्मदर्शकाखाली तपासणी केल्यावर त्या भागातील रोगप्रक्रियेचे ज्ञान होते. शस्त्रक्रिया करताना काढलेला काही रोगट भाग तपासणीसाठी उपलब्ध असतोच. काही वेळा हा भाग मुद्दाम तपासणीसाठीच काढला जातो. उदा. गर्भाशयाचा किंवा इतर कोठलाही कॅन्सरचा गोळा (त्याचा भाग) सूक्ष्मदर्शकाखाली तपासला जातो. त्यावरून कॅन्सरच्या प्रकाराचे ज्ञान होते. क्युरेटिंग (अथवा गर्भाशय खरवडणे) केल्यानंतर खरवडून काढलेला भाग तपासून काही निदान करता येते. अस्थिमज्जा तपासायची झाल्यास ती सिरींज-सुई वापरून काढून तपासतात. गर्भाशयाच्या तोंडाचा कॅन्सर ओळखण्यासाठी तो भाग खरवडून तपासायला पाठवला जातो. अनेक प्रकारच्या गाठींसाठी या तपासणीचा चांगला उपयोग होतो.
फाईन नीडल ऍस्पिरेशन सायटॉलॉजी (FNAC) हे तंत्र आता पुष्कळ वापरले जाते. यामध्ये संबंधित अवयवाचा भाग सुईच्या सहाय्याने शोषून घेतात. त्यामुळे जखम टळते.
लेखक : डॉ. श्याम अष्टेकर (MBBS, MD community Medicine)
संदर्भ : आरोग्याविद्या
अंतिम सुधारित : 6/5/2020
सार्वजनिक रीत्या बोललेला, लिहिलेला किंवा मुद्रित झ...
जीवोतक परीक्षा : (बायोप्सी). जिवंत शरीरातून घेतलेल...
क्ष-किरण (एक्स-रे) हे डोळयांना न दिसणारे किरण असता...
हिरडया निरोगी असतील तर दोन दातांच्या फटीमध्ये त्या...