ही तपासणी मुख्यत: क्षयरोगासाठी करतात.
अशा तपासणीसाठी छातीतून येणारा खाकरा, बेडके (थुंकी नाही) जमा करून ठेवावी. त्यातला शक्यतो हिरवट पिवळट पूमिश्रित भाग शोधून त्यातून काडीच्या साह्याने एक ठिपका काचपट्टीवर पसरवावा. याला क्षणभर खालून उष्णता देऊन त्यातले जंतू मारले जातात. (पण जळण्याइतकी उष्णता द्यायची नाही) उष्णता देण्यासाठी काचपट्टी अर्धा सेकंदभर स्पिरीटच्या ज्योतीतून फिरवली जाते. यानंतर या नमुन्याला रासायनिक रंग दिला जातो. क्षयरोगाचे जंतू हा रंग घेतात. सूक्ष्मदर्शकाखाली हे जंतू गुलाबी जांभळया रंगाचे व कांडयांसारखे दिसतात. योग्य पध्दतीने बेडका जमा न केल्यास जंतू न दिसण्याची शक्यता असते. तसेच सतत तीन वेळा तपासणी करावी. यात जंतू न आढळल्यास फुप्फुसाचा क्षयरोग 'नाही' असे म्हणता येईल.
लेखक : डॉ. श्याम अष्टेकर
(MBBS, MD community Medicine)
संदर्भ : आरोग्याविद्या
अंतिम सुधारित : 6/8/2020
क्षयरोग (टीबी) हा संसर्गजन्य रोग असुन तो मायक्रोबॅ...
क्षयरोगास कारणीभूत असलेला जीवाणू मायक्रोबॅक्टेरीयम...
प्रत्येक क्षय रुग्णांपर्यंत पोहचूयात, मिळून सगळे ए...
हि चित्रफित दूरदर्शन सह्यादी वाहिनीने तयार केली आह...