অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

कणा व मणका

लहान लहान परंतु भक्कम अशा गोलाकार अस्थींचा मिळून पाठीचा कणा तयार होतो. याला पृष्ठवंश किंवा कशेरुक दंड असेही म्हणतात. त्या प्रत्येक लहान अस्थीला मणका किंवा कशेरुक असे नाव आहे. या लहान लहान अस्थी एकीवर एक अशा बसविलेल्या असून त्यांची एक साखळीच बनल्यासारखी असते.

या साखळीमुळे शरीराला मध्य रेषेत बळकट असा आधार मिळतो. दोन अस्थींच्या किंवा मणक्यांच्या मध्ये कमीजास्त जाडीची उपास्थिचक्रे (सांध्यातील अस्थींच्या पृष्ठभागावर असणाऱ्या लवचिक व एक प्रकारच्या संयोजी म्हणजे जोडणाऱ्या पेशीसमूहाच्या चकत्या) असल्यामुळे कण्याला लवचिकपणा प्राप्त होऊन त्याची विशिष्ट मर्यादेपर्यंत हालचाल होऊ शकते. प्रत्येक मणक्याच्या मध्यभागी जी पोकळी असते तिच्यामुळे कण्याच्या मध्यभागी असलेला मेरुरज्‍जू (मेंदूच्या मागील भागापासून निघालेला आणि मणक्यांच्या आतील पोकळीतून जाणारा मज्‍जातंतूंचा दोरीसारखा जुडगा) सुसंरक्षित राहू शकतो.

सर्व पृष्ठवंशीय प्राण्यांमध्ये पाठीला अस्थिमय असा कणा असतो; पण त्यातील मणक्यांची संख्या त्या त्या प्राण्यांची जीवनपद्धती, सवयी व उत्क्रांती यांमुळे कमीजास्त असते. साधारण मानाने ही संख्या ३०-३१ पासून ७० पर्यंत असू शकते.

आ. २. प्रारूपिक ग्रैव कशेरुक : (१) कशेरुक काय, (२) अनुप्रस्थीय छिद्र, (३) कशेरुक रंध्र, (४) कशेरुक पत्र, (५) कंटक प्रवर्ध, (६) कशेरुक वृंत. आ. २. प्रारूपिक ग्रैव कशेरुक : (१) कशेरुक काय, (२) अनुप्रस्थीय छिद्र, (३) कशेरुक रंध्र, (४) कशेरुक पत्र, (५) कंटक प्रवर्ध, (६) कशेरुक वृंत. आ. ३. शीर्षधक कशेरूकआ. ३. शीर्षधक कशेरूक आ. १. प्रारूपिक वक्षीय कशेरुक : (१) कशेरुक काय, (२) कशेरुक रंध्र, (३) कशेरुक वृंत, (४) कंटक प्रवर्ध, (५) अनुप्रस्थ प्रवर्ध.आ. १. प्रारूपिक वक्षीय कशेरुक : (१) कशेरुक काय, (२) कशेरुक रंध्र, (३) कशेरुक वृंत, (४) कंटक प्रवर्ध, (५) अनुप्रस्थ प्रवर्ध.

भ्रूणावस्थेत (विकासाच्या पूर्व अवस्थेत असणाऱ्या बालजीवाच्या अवस्थेत) पचननलिका व मेरुरज्‍जू यांच्यामधील जागेत पृष्ठरज्‍जूच्याभोवती (पेशींचा बनलेला लवचिक आधार-अक्ष किंवा कणा याभोवती) पृष्ठवंशाची उत्पत्ती होते. प्रत्येक भ्रूणखंडातील मध्यस्तराची वाढ होत जाऊन त्या ठिकाणी अस्थी तयार होतात. या अस्थींचा मेरुरज्‍जूला वेढा पडल्यासारखा होऊन पाठीचा कणा तयार होतो. काही कनिष्ठ पृष्ठवंशीय प्राण्यांमध्ये पृष्ठरज्‍जू तसाच राहतो तर काही मत्स्यांच्या शरीरातील कणा उपास्थींचाच बनलेला असतो.

कण्यांचे स्थानपरत्वे पाच भाग कल्पिले आहेत. त्यांना ग्रैवी (मानेतील), वक्षीय, कटी (कंबर), त्रिक्‌ (कंबर व माकडहाड यांमधील भाग) व अनुत्रिक्‌ (माकडहाड) विभाग म्हणतात. या प्रत्येक विभागातील मणक्यांची संख्या व रचना भिन्न असली, तरी सर्व मणक्यांच्या मूलभूत रचनेचा सांगाडा एकसारखा असतो. विविध प्राण्यांच्या जीवनपद्धतीनुसार त्यांच्या तपशीलांत फरक दिसून येतो.

मानवी कण्यामध्ये एकूण ३३ मणके असून त्यांचेही पाच प्रकार दिसून येतात. मणक्याच्या रचनेचे मूलभूत वर्णन प्रथम करून पुढे प्रत्येक विभागातील मणक्याचे वर्णन खाली दिले आहे.

आ. ४. अक्ष कशेरुक : (१) दंताभ प्रवर्ध, (२) अनुप्रस्थीय छिद्र, (३) कंटक प्रवर्ध.   आ. ४. अक्ष कशेरुक : (१) दंताभ प्रवर्ध, (२) अनुप्रस्थीय छिद्र, (३) कंटक प्रवर्ध.

मानवी मणक्यांची सर्वसाधारण रचना: याचे दोन मुख्य भाग असतात.

  1. पुढच्या जाड व गोलाकार अस्थींच्या भागाला कशेरुक काय असे नाव असून
  2. मागच्या कमानीसारख्या भागाला कशेरुक चाप म्हणतात. या दोन भागांच्या मध्यभागी असलेल्या पोकळीस कशेरुक रंध्र असे म्हणतात. एकावर एक अशा बसविलेल्या मणक्यांमुळे या रंध्रांची मिळून एक पोकळ व लांब अशी गुहा तयार होते; त्या गुहेत मेरुरज्‍जू असतो.

कशेरुक काय

मणक्याचा पुढचा भाग जाड व वर्तुलस्तंभाकार असतो. त्याचा बाह्यथर घट्ट, टणक व कठीण अशा हाडांचा बनलेला असतो. आतील भाग पोकळ स्पंजासारख्या हाडांचा बनलेला असतो. कशेरुक कायाचा वरचा व खालचा पृष्ठभाग खोलगट, चपटा व खडबडीत असतो. त्या ठिकाणी उपास्थिचक्रे घट्ट बसलेली असतात. कशेरुक कायाची पुढची बाजू फुगीर, बहिर्गोलाकार असून रंध्राकडील मागील बाजू खोलगटअंतर्गोलाकार असते. या मागील बाजूच्या पृष्ठभागामध्ये लहान छिद्रे दिसतात. या छिद्रांतून मणक्याला रक्ताचा पुरवठा करणाऱ्या वाहिन्या असतात.

कशेरुक चाप

कशेरुक कायापासून कमानीसारखा गोलाकार असा जो भाग मागच्या बाजूकडे गेलेला दिसतो त्याला कशेरुक चाप असे नाव असून त्याच्या प्रत्येक बाजूस दोन विभाग झालेले असतात. कायापासून मागे तिरकस असलेल्या देठासारख्या विभागाला कशेरुक वृंत असेनाव आहे.

वृंतापासून मागे जाऊन मध्यरेषेत एकमेकांस मिळून कमान पुरी करणाऱ्या विभागाला कशेरुक पत्र असे म्हणतात. कशेरुक वृंत हे कशेरुक कायाच्या पार्श्व व पश्च कोपऱ्यापासून मागे जाणारे असे आखूड अस्थिविभाग असतात. वृंताचा वरचा व खालचा पृष्ठभाग खोलगट व गुळगुळीत असतो. मणके एकावर एक बसले म्हणजे त्या दोन खोलगट भागांमुळे जे रंध्र तयार होते त्याला आंतरकशेरुक रंध्र असे नाव असून त्या रंध्रातून मेरुरज्जूपासून निघणाऱ्या तंत्रिका (मज्जातंतू) बाहेर पडतात.

आ. ५. सहावा वक्षीय कशेरुक (पृष्ठभाग) : (१) कशेरुक काय, (२) कशेरुक वृंत, (३) कंटक प्रवर्ध, (४) अनुप्रस्थ प्रवर्ध, (५) कशेरुक रंध्र. आ. ५. सहावा वक्षीय कशेरुक (पृष्ठभाग) : (१) कशेरुक काय,

(२) कशेरुक वृंत, (३) कंटक प्रवर्ध, (४) अनुप्रस्थ प्रवर्ध, (५) कशेरुक रंध्र.

कशेरुक पत्र हे रुंद व जाड असे अस्थिविभाग असून ते पाठीकडे मध्यरेषेत एकमेकांस मिळतात. या कशेरुक पत्रापासून मागे मध्यरेषेत एक व प्रत्येक बाजूस तीन प्रवर्ध (मुख्य भागापासून झालेली बाह्यवाढ) निघतात. असे एकूण सात प्रवर्ध कशेरुक पत्रापासून निघतात. मध्यरेषेत मागे जाणाऱ्या प्रवर्धाला कंटक प्रवर्ध (काट्यासारखे प्रवर्ध) म्हणतात.

हा प्रवर्ध जाड असून किंचित खालच्या बाजूस झुकल्यासारखा असतो. त्याचा आकार व रचना यांमध्ये स्थानपरत्वे फरक दिसून येतो. पाठीच्या मध्यरेषेत हे प्रवर्ध एकाखाली एक असे हाताला लागतात. कंटक प्रवर्धापासून स्नायू व स्नायुबंध निघतात व त्याच्यामुळे मणके एकमेकांस घट्ट बांधले जाऊन त्यांचे काही मर्यादेपर्यंत चलन होऊ शकते. कशेरुक पत्राच्या पश्चभागापासून सरळ दोन्ही बाजूंना जाणाऱ्या दोन आडव्या प्रवर्धांना अनुप्रस्थ (आडवे) प्रवर्ध असे म्हणतात. हे प्रवर्ध जाड व भक्कम असून त्यांच्याशी संलग्न असलेल्या स्नायू व स्नायुबंधामुळे पृष्ठवंशाला स्थिरता येते

आ. ६. कटिकशेरूक : (१) कशेरूक काय, (२) कशेरूक रंध्र, (३) कशेरूक वृंत, (४) अनुप्रस्थ प्रवर्ध, (५) कंटक प्रवर्ध.आ. ६. कटिकशेरूक : (१) कशेरूक काय, (२) कशेरूक रंध्र, (३) कशेरूक वृंत, (४) अनुप्रस्थ प्रवर्ध, (५) कंटक प्रवर्ध.

कशेरुक पत्राच्या अग्रपश्चभागापासून वर एक व खाली एक असे प्रत्येक बाजूस दोन म्हणजे एकूण चार प्रवर्ध असतात, त्यांना अनुक्रमे ऊर्ध्व (सांध्याच्या वरचे) आणि अधः (सांध्याच्या खालचे) प्रवर्ध असे म्हणतात. या प्रवर्धांचा पृष्ठभाग चपटा, पातळ व गुळगुळीत असतो. ऊर्ध्वप्रवर्धाचा वरच्या मणक्याच्या अधःप्रवर्धाशी व अध:प्रवर्धाचा व अधःप्रवर्धाचा खालच्या मणक्याच्या ऊर्ध्वप्रवर्धाशी संधी होतो.

अशा रीतीने प्रत्येक मणक्याची वरच्या मणक्याशी दोन व खालच्या मणक्याशी दोन अशी एकूण चार संधिस्थाने असतात. वरच्या संधिस्थानाचा संधिपृष्ठभाग मागच्या दिशेला असून खालच्याचा पुढच्या दिशेला असतो. या अशा रचनेमुळे मणक्यांची साखळीच तयार होते. तिलाच पृष्ठवंश किंवा कणा म्हणतात स्थानपरत्वे मानवी मणक्यांच्या रचनेत जे फरक दिसतात त्यांचे त्रोटक वर्णन पुढे दिले आहे.

आ. ७. त्रिक् व अनुत्रिकास्थी : (१) त्रिकास्थी, (२) अनुत्रिकास्थी.आ. ७. त्रिक् व अनुत्रिकास्थी : (१) त्रिकास्थी, (२) अनुत्रिकास्थी.

ग्रैव कशेरुक

(आ. २). मानेत सात मणके असून त्यांचे काय चपटे असतात. हे मणके आकाराने लहान असून पहिल्या मणक्यापासून सातव्या मणक्यापर्यंत त्यांचा आकार मोठा होत जातो. कशेरुक रंध्र मोठे आणि रुंद असते. उपास्थिचक्रे पुढच्या बाजूला जाड असतात. ग्रैव कशेरुकांच्या कंटकप्रवर्धांना दोन टोके असतात. अनुप्रस्थ प्रवर्धामध्ये मोठे छिद्र असते. या छिद्रातून कशेरुक रोहिणी मेंदूकडे जाते.

मानेतील मणक्यांपैकी पहिला मणका अंगठीच्या आकाराचा असतो. त्याला कशेरुक काय असा नसतो; त्याच्या कशेरुक कायाच्या जागी पश्च पृष्ठावर एक खोबण दिसते; त्या खोबणीत दुसऱ्या मणक्यापासून निघालेला एक प्रवर्ध बसतो. या ठिकाणी सांधा होतो, त्याच्यामुळे डोके बाजूला वळू शकते. या ग्रैव मणक्याला शीर्षधर कशेरुक असे म्हणतात (आ. ३).

मानेतील दुसऱ्या मणक्याला अक्ष कशेरुक म्हणतात (आ. ४) याच्या कायापासून निघणारा जाड प्रवर्ध (दंताभ प्रवर्ध, दातासारखा प्रवर्ध) वरच्या बाजूस जाऊन त्याचा शीर्षधर कशेरुकाशी सांधा होतो. हा प्रवर्ध म्हणजे पहिल्या मणक्याचा काय असून तो दुसऱ्या मणक्याच्या कायाशी एकरूप झालेला असतो.

आ. ८. पृष्ठवंशाचे पार्श्वदर्शन : (१) ग्रैव बाक, (२) वक्षीय बाक, (३) कटिभागातील बाक.आ. ८. पृष्ठवंशाचे पार्श्वदर्शन : (१) ग्रैव बाक, (२) वक्षीय बाक, (३) कटिभागातील बाक.

 

 

 

 

 

 

 

 

 

 

मानेतील सातव्या मणक्याचा कंटक प्रवर्ध लांब व जाड असून तो मानेच्या मागच्या भागात उंच असा हाताला लागतो.

वक्षीय कशेरुक

(आ. १, ५). हे एकूण १२ असून त्यांचे काय जाड आणि भक्कम असतात. दोन मणक्यांमधील उपास्थिचक्रेही जाड असतात. या कायांच्या पार्श्व कोणापाशी पर्शुकेच्या (फासळ्यांच्या) शिरांच्या सांध्याकरिता चपटी खोबण असते. पहिल्या १० मणक्यांच्या अनुप्रस्थ प्रवर्धांच्या टोकाशी पर्शुका टेकण्यासाठी एक चपटी जागा दिसते. या मणक्यांचे कंटकप्रवर्धक जाड व लांब असून ते खालच्या बाजूस झुकल्यासारखे असता

कटिकशेरुक

(आ. ६). हे एकूण पाच असून ते सर्वांत जाड, मोठे व भक्कम असतात. या ठिकाणची उपास्थिचक्रेही सर्वांत मोठी असून कशेरुक रंध्रे त्रिकोणी व लहान असतात. त्यांचे कंटकप्रवर्ध जाड व आखूड असून सरळ मागे गेलेले असतात

त्रिक्कशेरुक : हे पाच असले तरी त्यांचे काय व अनुप्रस्थ प्रवर्ध एकरूप झाल्यामुळे त्यांचे मिळून एक त्रिकास्थी तयार होते. त्रिकास्थी त्रिकोणाकार असून तिच्या बाजूस तंत्रिकांसाठी चार छिद्रे असतात. त्रिकास्थीच्या वरच्या पाचव्या कटिकशेरुकाशी संधी झालेला असून खालच्या अंगाला अनुत्रिकास्थीशी संधी होतो (आ. ७). दोन्ही बाजूंस त्रिकास्थीच्या श्रोणीतील (धडाच्या शेवटी अस्थींनी बनलेल्या पोकळीतील) अस्थीशी संधी झालेला असतो

अनुत्रिक्‌ कशेरुक

हे चार असून त्या सर्वांचे मिळून अनुत्रिकास्थी तयार होते. अनुत्रिकास्थी त्रिकोणी असून त्याच्या खालच्या टोकास माकडहाड असे म्हणतात. शेपूट असलेल्या पृष्ठवंशीय प्राण्यांत अनुत्रिक्‌ कशेरुकापासूनच शेपूट तयार होते.

पाठीच्या कण्याचे कार्य

(आ. ८). हा सर्व शरीराचा मुख्य आधार असतो. डोके, छाती, पोट व श्रोणी या सर्व विभागांचे वजन पाठीच्या कण्यावर पेलले जाते. कणा सरळ नसून त्याला मानेच्या भागात बहिर्गोल, वक्षीय भागात अंतर्गोल व कटिभागात पुन्हा बहिर्गोल असे बाक आलेले असतात. त्रिकास्थीमधील बाकही अंतर्गोल असून त्या अस्थीची आणि श्रोण्यस्थीची मिळून श्रोणि-गुहा तयार होते. उपास्थिचक्रांमुळे कण्याला लवचिकपणा प्राप्त होऊन वाकणे, ताठ बसणे, बाजूला वळणे वगैरे क्रिया कण्याशी संबंध असलेल्या स्नायूंच्या आकुंचनामुळे होऊ शकतात.

आ. १. प्रारूपिक वक्षीय कशेरुक : (१) कशेरुक काय, (२) कशेरुक रंध्र, (३) कशेरुक वृंत, (४) कंटक प्रवर्ध, (५) अनुप्रस्थ प्रवर्ध.

लहान लहान परंतु भक्कम अशा गोलाकार अस्थींचा मिळून पाठीचा कणा तयार होतो. याला पृष्ठवंश किंवा कशेरुक दंड असेही म्हणतात. त्या प्रत्येक लहान अस्थीला मणका किंवा कशेरुक असे नाव आहे. या लहान लहान अस्थी एकीवर एक अशा बसविलेल्या असून त्यांची एक साखळीच बनल्यासारखी असते.

या साखळीमुळे शरीराला मध्य रेषेत बळकट असा आधारमिळतो. दोन अस्थींच्या किंवा मणक्यांच्या मध्ये कमीजास्तजाडीची उपास्थिचक्रे (सांध्यातील अस्थींच्या पृष्ठभागावरअसणाऱ्या लवचिक व एक प्रकारच्या संयोजी म्हणजे जोडणाऱ्या पेशीसमूहाच्या चकत्या) असल्यामुळे कण्यालालवचिकपणा प्राप्त होऊन त्याची विशिष्ट मर्यादेपर्यंत हालचाल होऊशकते.

प्रत्येक मणक्याच्या मध्यभागी जी पोकळी असते तिच्यामुळेकण्याच्या मध्यभागी असलेला मेरुरज्‍जू (मेंदूच्या मागीलभागापासून निघालेला आणि मणक्यांच्या आतील पोकळीतून जाणारा मज्‍जातंतूंचा दोरीसारखा जुडगा) सुसंरक्षित राहू शकतो.

आ. २. प्रारूपिक ग्रैव कशेरुक : (१) कशेरुक काय, (२) अनुप्रस्थीय छिद्र, (३) कशेरुक रंध्र, (४) कशेरुक पत्र, (५) कंटक प्रवर्ध, (६) कशेरुक वृंत.

सर्व पृष्ठवंशीय प्राण्यांमध्ये पाठीला अस्थिमय असा कणा असतो; पण त्यातील मणक्यांची संख्या त्या त्या प्राण्यांची जीवनपद्धती, सवयी व उत्क्रांती यांमुळे कमीजास्त असते. साधारण मानाने ही संख्या ३०-३१ पासून ७० पर्यंत असू शकते.

आ. ३. शीर्षधक कशेरूक

भ्रूणावस्थेत (विकासाच्या पूर्व अवस्थेत असणाऱ्या बालजीवाच्या अवस्थेत) पचननलिका व मेरुरज्‍जू यांच्यामधील जागेत पृष्ठरज्‍जूच्याभोवती (पेशींचा बनलेला लवचिक आधार-अक्ष किंवा कणा याभोवती) पृष्ठवंशाची उत्पत्ती होते. प्रत्येक भ्रूणखंडातील मध्यस्तराची वाढ होत जाऊन त्या ठिकाणी अस्थी तयार होतात. या अस्थींचा मेरुरज्‍जूला वेढा पडल्यासारखा होऊन पाठीचा कणा तयार होतो. काही कनिष्ठ पृष्ठवंशीय प्राण्यांमध्ये पृष्ठरज्‍जू तसाच राहतो तर काही मत्स्यांच्या शरीरातील कणा उपास्थींचाच बनलेला असतो.

कण्यांचे स्थानपरत्वे पाच भाग कल्पिले आहेत. त्यांना ग्रैवी (मानेतील), वक्षीय, कटी (कंबर), त्रिक्‌ (कंबर व माकडहाड यांमधील भाग) व अनुत्रिक्‌ (माकडहाड) विभाग म्हणतात. या प्रत्येक विभागातील मणक्यांची संख्या व रचना भिन्न असली, तरी सर्व मणक्यांच्या मूलभूत रचनेचा सांगाडा एकसारखा असतो. विविध प्राण्यांच्या जीवनपद्धतीनुसार त्यांच्या तपशीलांत फरक दिसून येतो.

मानवी कण्यामध्ये एकूण ३३ मणके असून त्यांचेही पाच प्रकार दिसून येतात. मणक्याच्या रचनेचे मूलभूत वर्णन प्रथम करून पुढे प्रत्येक विभागातील मणक्याचे वर्णन खाली दिले आहे.

आ. ४. अक्ष कशेरुक : (१) दंताभ प्रवर्ध, (२) अनुप्रस्थीय छिद्र, (३) कंटक प्रवर्ध.

मानवी मणक्यांची सर्वसाधारण रचना याचे दोन मुख्य भाग असतात.

  1. पुढच्या जाड व गोलाकार अस्थींच्या भागाला कशेरुक काय असे नाव असून
  2. मागच्या कमानीसारख्या भागाला कशेरुक चाप म्हणतात. या दोन भागांच्या मध्यभागी असलेल्या पोकळीस कशेरुक रंध्र असे म्हणतात. एकावर एक अशा बसविलेल्या मणक्यांमुळे या रंध्रांची मिळून एक पोकळ व लांब अशी गुहा तयार होते; त्या गुहेत मेरुरज्‍जू असतो.

कशेरुक काय

मणक्याचा पुढचा भाग जाड व वर्तुलस्तंभाकार असतो. त्याचा बाह्यथर घट्ट, टणक व कठीण अशा हाडांचा बनलेला असतो. आतील भाग पोकळ स्पंजासारख्या हाडांचा बनलेला असतो. कशेरुक कायाचा वरचा व खालचा पृष्ठभाग खोलगट, चपटा व खडबडीत असतो. त्या ठिकाणी उपास्थिचक्रे घट्ट बसलेली असतात.

कशेरुक कायाची पुढची बाजू फुगीर, बहिर्गोलाकार असून रंध्राकडील मागील बाजू खोलगटअंतर्गोलाकार असते. या मागील बाजूच्या पृष्ठभागामध्ये लहान छिद्रे दिसतात. या छिद्रांतून मणक्याला रक्ताचा पुरवठा करणाऱ्या वाहिन्या असतात.

 

स्त्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate