लैंगिक प्रकार सामान्यतः प्रगत प्राण्यांत आढळतो.
ह्यास नर व मादी अशा दोन जनकांची जरूरी असते. इतकेच नव्हे, तर प्रत्येकात आवश्यकतेनुसार शारीरीक व शरीरक्रियात्मक वैशिष्ट्ये असलेली जननेंद्रिये किंवा जनन तंत्राची वाढ झालेली असते. काही उभयलिंगी [उभयलिंगता] प्राण्यांत ही इंद्रिय तंत्रे एकाच प्राण्यांत असतात (उदा., पट्टकृमी, गांडूळ, ट्यूनिकेट वगैरे).
प्रोटोझोआ (प्रजीवसंघ) संघातील पॅरामिशियम ह्या प्राण्यात केंद्रकापासून (पेशीतील क्रियांवर नियंत्रण ठेवणाऱ्या जटिल गोलसर पुंजापासून) स्त्री-व पुं-युग्मक (प्रजोत्पादन पेशी) तयार होऊन व दोन प्राणी काही काळ एकत्र येऊन संयुग्मनाने लैंगिक प्रजनन होते. तथापि ह्या प्राण्यांत लैंगिक प्रजननासाठी खास अशी इंद्रिये नसतात. लैंगिक प्रजननात केवळ जननेंद्रिये असल्याचे उदाहरण म्हणजे हायड्रा हा आंतरगुही (सीलेंटेरेट) प्राणी होय. हायड्र्यात जातीनुसार एकाच प्राण्यांत किंवा वेगवेगळ्या प्राण्यांत शरीराच्या विशिष्ट भागांवर वृषण (पुं-प्रजोत्पादक ग्रंथी) न अंडाशय (स्त्री-प्रजोत्पादक ग्रंथी) निर्माण होतात. ह्यांत अनुक्रमे शुक्राणू (पुं-प्रजोत्पादक पेशी) आणि अंडाणू (स्त्री-प्रजोत्पादक पेशी) तयार होतात. त्यांच्या फलनाचे युग्मनज तयार होऊन त्यापासून सरतेशेवटी नवीन हायड्रा निर्माण होतो.
स्त्रोत: मराठी विश्वकोश
अंतिम सुधारित : 10/7/2020
वंश पुढे नेण्यासाठी जिवांना जन्म देणे (जनन किंवा प...
स्वत:चे सुख अधिक महत्वाचे की, नव्याने या जगात प्रव...
काही सजीवांमध्ये पुं.- आणि स्त्री-जननेंद्रिये एकाच...
गर्भकालातील गर्भाचे जीवन संपूर्णपणे नाळेवर अवलंबून...