অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

पुरुषसंप्रेरके

पुरुषसंप्रेरके

पुरुषसंप्रेरक ऍड्रोजेन किंवा टेस्टोस्टेरोन म्हणून ओळखले जाते व हेही कृत्रिमरित्या बनवता येते. पुरुष-शरीरातील बीजांडातून हे संप्रेरक रक्तात मिसळते. यामुळे 'पुरुषी' लक्षणे तयार होतात. या संप्रेरकांमुळे शरीरातील प्रथिनांच्या साठयामध्ये काही प्रमाणात वाढ होत जाते म्हणून वाढीसाठी या संप्रेरकांचा उपयोग होतो. या गुणधर्मामुळे या संप्रेरकाचा निष्कारण टॉनिकसारखा गैरवापर होतो आणि याचा स्त्रियांवर तर विशेष प्रतिकूल परिणाम होतो. (आवाज घोगरा होणे, ओठाच्या वर लव येणे, इ.) स्टेरॉईड या संप्रेरकांचा गैरवापर होण्याचे आणखी एक क्षेत्र म्हणजे व्यावसायिक खेळ. यात स्नायुशक्ती वाढवण्यासाठी खेळाडू पुरुष-संप्रेरके घेतात. खेळांच्या नियमात हे बसत नाही. रक्त, लघवी तपासणीत हे उघडकीला येऊ शकते.

 

लेखक : डॉ. श्याम अष्टेकर

(MBBS, MD community Medicine)

संदर्भ : आरोग्यविद्या

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate