অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

माणूस कसा निर्माण झाला

माणूस कसा निर्माण झाला


आपल्या पृथ्वीवर जीवसृष्टी निर्माण होऊन कोटयवधी वर्षे झाली. आधी केवळ एकपेशीय जीव होते. मग वनस्पती व प्राणी अशा दोन मुख्य शाखा झाल्या. प्राण्यांमध्ये आधी छोटे गोगलगायीसारखे जीवकीटक,कृमीनंतर पाठीचा कणा असलेले मासेनंतर पक्षीत्यानंतर सस्तन प्राणी आणि माणूस असा हा प्रवास आहे. पृथ्वीवरच्या अनेक खंडांत ही प्रक्रिया चालू होती व आहे. त्यामुळे प्राण्यांच्या प्रजाति आणि माणसांचे निरनिराळे वंश दिसतात. या उत्क्रांतीच्या प्रवासात अनेक छोटेमोठे प्राणी- वनस्पती समूळ नष्ट झाल्या तर अनेक नवीन प्रकार तयार झाले. बदलत्या परिस्थितीप्रमाणे (अन्न,हवामानपरिसर) वनस्पती व प्राणीजीवनात हे बदल होत जातात. ग्लोबल वॉर्मिंग उर्फ पृथ्वीची तपमानवाढ होण्यामुळे जीवसृष्टीत अनेक बदल संभवतात. मनुष्यजात पृथ्वीवर जन्मली तिथे हवामानजीवजंतूवनस्पतीअन्नइत्यादी सर्व शत्रू-मित्र पहिल्यापासूनच आहेत. त्यांतल्या काहींशी माणसाला लढायला लागते तर काही त्याला जगवतात. या लढाया मनुष्य हरायला लागलाकी त्याला आजारसाथी असे स्वरुप येते आणि परिस्थिती अनुकूल असेल तर भरभराट होते. या सगळया प्रदीर्घ उत्क्रांती प्रवासात महत्त्वाचा धागा आहे तो रंगसूत्रे आणि गुणसूत्रांचा.

आता उपलब्ध माहितीनुसार मानवजातीचा जन्म आफ्रिका खंडात झाला आहे. याला आता कोटयवधी वर्षे लोटली.काळाप्रमाणे मानववंशात बदल होत गेले. मानववंश इजिप्तमधल्या नाईल नदीच्या खो-यापर्यंत जायला लक्षावधी वर्षे लागली. तिथून पुढे मानवी टोळया युरोप-आशिया-अमेरिका-ऑस्ट्रेलिया खंडात गेल्या. या प्रदीर्घ प्रवासात माणसाचे विविध वंश तंत्रज्ञानभाषा,संस्कृतीपिकेआजार वगैरे जडण घडण होत गेली. आता या सर्वच प्रक्रियांनी वेग घेतला आहे.


लेखक : डॉ. श्याम अष्टेकर (MBBS, MD community Medicine)

संदर्भ : आरोग्याविद्या

 

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate