অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

मानवेतर प्राण्यांतील पचन तंत्र

मानवेतर प्राण्यांतील पचन तंत्र

पचन तंत्र

(पचनसंख्या). पचन तंत्र अन्नपचनाचे कार्य करते.  प्राणी वनस्पतिज किंवा प्राणिज अन्न घेत असल्याने त्याचे स्वरूप जटिल (गुंतागुंतीचे, क्लिष्ट) असते. म्हणजेच शरीरास ते अन्न जसेच्या तसे निरनिराळ्या कार्यासाठी वापरता येत नाही. अन्नावर काही प्रक्रिया केल्या जाऊन ते शरीरास वापरण्यास सुलभ केले जाते, ह्यालाच अन्नपचन म्हणतात.

न्न घेणे; काही काळ ते साठवून ठेवणे; त्याचे बारीक तुकडे करणे, ते घुसळून एकत्रित करणे, त्यावर एंडाइमांची (जीवरासायनिक विक्रिया घडवून आणण्यास मदत करणाऱ्या प्रथिनयुक्त द्रव्यांची) क्रिया घडवून आणणे-म्हणजेच अन्नाचे यांत्रिक व रासायनिक पचन करणे; पचन झालेल्या अन्नाचे अभिशोषण करणे (शरीरातील घटकात सामावून घेणे) आणि पाण्याचा अंश काही प्रमाणात शोषून घेऊन नको असलेला व न पचलेला भाग बाहेर टाकणे [ ⟶ उत्सर्जन] ह्या सर्व क्रियांचा समावेश व्यापक अर्थाने अन्नपचन ह्या संज्ञेत होतो. ह्या क्रियांसाठी प्राण्यात पचन तंत्र आवश्यक असते.

मानवेतर प्राण्यांतील पचन तंत्र

हुतेक प्रगत अपृष्ठवंशी (पाठीचा कणा नसलेल्या) व सर्व पृष्ठवंशी प्राण्यांत मुखाने सुरू होणारे व गुदद्वाराने शरीराबाहेर उघडणारे लांब, वलयांकित, नलिकाकार पचन तंत्र असते; पण प्रोटोझोआ, पोरिफेरा व सीलेंटरेटा ह्या प्राणिसंघांत पचन तंत्र असे नसते.

आ. १. अमीबा : (१) अन्नरिक्तिका.स्थूलमानाने पचन तंत्राचे मुख-मुखीय गुहा (पोकळी), ग्रसनी (घसा, ग्रसिका, जठर व आंत्र (आतडे) असे भाग पडतात. आंत्राचे लघ्वांत्र (लहान आतडे) व बृहदांत्र (मोठे आतडे) असे मुख्य दोन भाग केले जातात. बृहदांत्र  गुदद्वाराने बाहेर उघडते. मुखाने आत घेतलेल्या अन्नाचे मुखीय गुहेतील दात, जीभ ह्यांच्या साहाय्याने तुकडे करणे, चर्वण करणे, एकत्रित घास तयार करणे इ. प्रकारे यांत्रिक पचन केले जाते. ग्रसनीतून घास ग्रसिकेत व तिथून जठरात जातो. जठर जाड, मांसल भित्तीची पिशवी असल्याने त्यात काही काळ अन्न साठविले जाते. तसेच त्याचे घुसळून एकत्रित करून यांत्रिक पचन केले जाते व एंझाइमांकरवी थोडे रासायनिक पचनही जठरात होते. लघ्वांत्रात तेवढी गरज नसल्याने अन्नाचे फार थोडे यांत्रिक पचन होते. येथे विशेषतः रासायनिक पचन पूर्ण होते व अन्नाचे अभिशोषण होते. बृहदांत्रात मैला शरीराबाहेर टाकण्यापूर्वी साठवून ठेवला जातो व त्यातील बरेचसे पाणी शरीरात परत शोषून घेतले जाऊन तो गुदद्वारावाटे बाहेर टाकला जातो. जठर व आंत्र ह्यांतील अन्न क्रमसंकोचाने पुढेपुढे ढकलले जाते.

आ. २. पॅरामिशियम : (१) मुखीय खाच, (२) ग्रसिका, (३) अन्नरिक्तिका.

चन तंत्राशी दोन प्रकारच्या ग्रंथी संबंधित असतात. लाला ग्रंथी, यकृत व अग्निपिंड ह्या ग्रंथी शरीरात अन्यत्र (पचन तंत्रात नसून इतरत्र) असून नलिकांनी पचन तंत्राशी जोडलेल्या असतात; तर जठर ग्रंथी, आंत्र ग्रंथी पचन तंत्राच्या त्या त्या भागातील भित्तीत असतात. ह्या दोन्ही प्रकारच्या ग्रंथींपासून निर्माण होणाऱ्या स्रावांनी निरनिराळ्या प्रकारे अन्नपचनास मदत होते. (सविस्तर माहितीसाठी याच नोंदीतील ‘मानवी पचन तंत्र’ या शीर्षकाखालील वर्णन तसेच ‘चयापचय’ ही स्वतंत्र नोंद पहावी).

आ. ३. स्पंजाच्या देहभित्तीचा काही भाग : (१) कोअॅनोसाइट, (२) अरीय नालाचा काही भाग.

प्रोटोझोआ संघात अन्नपचनासाठी अन्नरिक्तिका (अन्नकणाभोवतील द्रवयुक्त जागा) असतात (आ.१) पॅरामिशियमामध्ये (आ. २) मुखीय खाच व ग्रसिका या निश्चित मागांतून अन्न आत घेऊन अनेक अन्नरिक्तिका तयार केल्या जात असल्या, तरी पचन तंत्र असे नसते. या प्राण्यांत कोशिकाद्रव्यापासून (पेशीतील जटिल रासायनिक संघटन असलेल्या द्रव्यापासून) निर्माण झालेल्या पाचकरसांनी अंतःकोशिका (कोशिकेच्या आत होणारे) स्वरूपाचे पचन होते व उरलेले त्याज्य पदार्थ वेळोवेळी बाहेर टाकले जातात. त्यांचात (पोरिफेरा संघ) अरीय नालाच्या (त्रिज्यीय मार्गाच्या) अस्तरात असणाऱ्या कोॲनोसाइटामध्ये (गळपट्टीसारखा भाग असणाऱ्या कशाभिकायुत-जीवद्रव्याच्या दोऱ्यासारख्या विस्तारांनी युक्त असलेल्या-कोशिकेमध्ये; कॉलर सेलमध्ये) अन्नाचे अंतःकोशिकी पचन होते (आ. ३). हायड्रा, समुद्रपुष्प इ. सीलेंटेरेटांत मुख शरीरामध्ये जठरवाहिनीगुहिकेत (आ.४) उघडते. ह्या प्राण्यांत गुद नसते. त्यामुळे अन्नपदार्थ मुखातून पाण्याबरोवर आत घेतले जातात व नको असलेले पदार्थ मुखा वाटेच बाहेर टाकले जातात. जठरवाहिनीगुहिकेस विशिष्ट कोशिकांचे अस्तर असल्याने पचन त्या कोशिकांच्या आत (अतःकोशिकी) व गुहेत (को शि का बा ह्य ) अशा दोन्ही प्रकारांनी होते.

 

आ. ४. हायड्र्याची जठरवाहिनीगुहिका

(१) मुख, (२) जठरवाहिनीगुहिका.आ. ५. यकृत पर्णाभकृमीचे पचन तंत्र : (१) ग्रसनी, (२) ग्रसिका, (३) शाखायुक्त आंत्र.प्लॅटिहेल्मिंथिस आणि इतर प्रगत अपृष्ठवंशीयांत पचन तंत्र असते. यकृत पर्णाभकृमी ह्या परजीवी (दुसऱ्या सजीवांवर उपजीविका करणाऱ्या) पृथुकृमींत (चपट्या कृमींत) आंत्र शाखायुक्त असून शरीरभर पोहोचलेले असते (आ. ५);  तर पट्टकृमीत पचन तंत्राचा पूर्ण अभाव असतो. गांडूळातील पचन तंत्र सरळ असून अन्न साठवून ठेवण्यासाठी अन्नपुट व अन्नाच्या यांत्रिक पचनासाठी पेषणी असते (आ. ६). आर्थ्रोपोडा संघातील खेकडा, शेवंडा इ. प्राण्यांत कॅल्शियमाच्या लवणांनी युक्त) दात असलेली पेषणी असते; तर झुरळ, नाकतोडे इ. कीटकांत अन्नपुट, पेषणी व मध्यांत्रास (जठरास) जो ड ले ले सहा ते आठ अंघनाल (पिशवी सारखे एका टोकाला बंद असलेले मा र्ग) अ स ता त (आ. ७). ए का य नो ड र्मा टा सं घा ती ल ⇨तारामीन हा कालवासारख्या प्रा ण्या चा (मॉ ल स्का सं घा च्या शिं पा धा री व र्गा ती ल द्वि पु टी प्राण्याचा) अन्न म्हणून वापर करताना जठराचे बहिर्वलन (आतील बाजू बाहेर काढणे) करून पचन झालेले अन्न जठरानेच परत शरीरात घेतो.

आ. ६. गांडूळाचे सरळ पचन तंत्र : (१) मुख, (२) ग्रसनी, (३) ग्रसिका, (४) अन्नपुट, (५) पेषणी, (६) आंत्र, (७) गुदद्वार.

 

निरनिराळ्या पृष्ठवंशी प्राणिवर्गात आहारसवयीनुसार (शाकाहारी, मांसाहारी वगैरे) काही बदल आढळत असले, तरी पचन तंत्राची एकूण रचना सारखीच असते. सुरुवातीस वर्णन केल्याप्रमाणेच त्याचे निरनिराळे भाग पडतात.


आ. ७. झुरळाचे पचन तंत्र : (१) अन्नपुट, (२) पेषणी, (३) मध्यांत्रास जोडलेले अंधनाल, (४) मध्यांत्र.मुख मुखीय गुहिकेत उघडते. सायक्लोस्टेम वर्गात मुख गोलाकार असून ज ब डे नसतात. बाकीच्या सर्व पृष्ठवंशीयांत जबडे असतात. मुखीय गु हि के च्या संबंधात जबडे व त्यांवरील दात आणि त्यांचे प्र का र, जी भ इत्यादींचा अभ्यास केला जातो [ ⟶ दात;  जीभ]. सरीसृपांत ( स र प ट णा ऱ्या प्राण्यांत) व मुख्यत्वे स्तनी प्राण्यांत मुखाच्या भोवती का ही से जा ड ओठ असतात. च र णा ऱ्या प्राण्यांत ओठ परिग्राही (पकडण्यासाठी उ प यो गी असलेले) असतात. पक्ष्यात जबड्यांच्या हाडावर शृंगीभवनाने (केराटीन या प्रथिनाच्या साहाय्याने कठीण होणाच्या क्रियेने) चोच तयार होते. तिचा उपयोग भराभर अन्न वेचण्यास सामान्यतः केला जातो. मुख आणि मुखीय गुहिकेचा भूचर प्राण्यात आवाजनिर्मितीस आणि विशेषतः मानवात बोलण्यास फार उपयोग होतो.

 

आ. ८. शार्क माशाचे पचन तंत्र : (१) मुख, (२) ग्रसिका, (३) जठर, (४) आंत्र, (५) सर्पिल वली, (६) गुदांत्र ग्रंथी, (७) गुदांत्र, (८) अवस्कर.मुखीय गुहिकेमागे ग्रसनी किंवा घसा हा भाग असतो आणि तो श्वसन तंत्रास व पचन तंत्राच्या ग्रसिकेस स्वतंत्रपणे जोडलेला असतो. ग्रसिका ही नळीसारखीअसून अन्न ग्रसनीतून जठरात पाठविण्यास मदत करते. ग्रसिकेपासून गुदापर्यंत असणाऱ्या नलिकेस खऱ्या अर्थाने आंत्र म्हटले जाते. ग्रीवा (मान) नसलेल्या प्राण्यांत [ उदा., मासे (आ. ८), उभयचर (जमिनीवर व पाण्यातही राहणारे प्राणी) इ.] असते. मान असलेल्या प्राण्यांत ती लांब असते. स्तनी प्राण्यांत ग्रसिका मध्यपटल (छातीची पोकळी व उदराची पोकळी यांना विभागणारे दाबयुक्त पटल) भेदून जठरास जाऊन मिळते. पक्ष्यामध्ये (आ. ९) ग्रसिकेच्या खालच्या टोकाशी अन्नपुट नावाचा अंधवर्ध (पिशवीसारखी एका टोकास बंद असलेली वाढ) असून त्यात अन्न साठविले जाते.

आ.९. कोंबडीचे पचन तंत्र : (१) चोच, (२) ग्रसिका, (३) अन्नपुट, (४) ग्रंथिल जठर, (५) पेषणी, (६) लवांत्र, (७) बृहदांत्र, (८) अवस्कर द्वार, (९) अग्निपिंड, (१०) यकृत.ठर हा एक लांबट पिशवीसारखा भाग असून त्याची भित्ती स्नायुमय व जाड असते. जठरात ग्रसिका उघडते व जठर लघ्वांत्रात अघडते. मासे, सरीसृप वगैरे प्राण्यांत जठर साधे, लांबट पिशवीसारखे इंग्रजी J अक्षराच्या किंवा अन्य काही आकारांचे असते. काही माशांत (उदा., पर्च, मॅकेरेल, स्कँबर इ.) जठरनिर्गमद्वाराशी अंधनाल जोडलेले असतात (आ. १०).

आ.११. रोमंथी प्रायांचे जठर : (१) ग्रसिका, (२) रोमंथिका, (३) जालिका, (४) तृतीय आमाशय (भंजिका), (५) जठाशय, (६) ग्रहणी, (७)रवंथ करण्यापूर्वी गिळलेल्या अन्नाचा मार्ग, (८) रवंथ केल्यानंतर पुन्हा गिळलेल्या अन्नाचा मार्ग, (तुटक रेषा – आंतले ७ व ८ मार्ग).

क्ष्यात जठराचे दोन भाग पडतात : ग्रंथिल जठर व पेषणी (आ. ९). पेषणीची भित्ती स्नायुमय व जाड असून तिच्या आतील बाजूस शृंगी द्रव्याचा (शिंगांच्या द्रव्यासारख्या कठीण द्रव्याचा) थर असतो. पेषणीत लहान लहान दगडही असतात. गाय, शेळी, मृग, जिराफ इ. रोमंथी (रवंथ करणाऱ्या) प्राण्यांत जठराची सर्वांत अधिक वाढ झालेली असते. त्याचे संरचना व कार्य ह्या दृष्टीने रोमंथिका, जालिका, तृतीय आमाशय (भंजिका) व जठराशय असे चार वेगवेगळे भाग असतात [ (आय ११); ⟶ रवंथ करणे]. उंटाच्या जठरात पाण्याच्या (पाणी असलेल्या) कोशिका असतात. त्यांत साठविलेल्या पाण्यावर तो वाळवंटात पाणी न पिताही दीर्घकाल राहू शकतो असे मानले जाते, तथापि त्यास शास्त्रीय आधार नाही. पाणघोड्यात व देवमाशात जठर अनेक कप्प्यांत विभागलेले असते, तर सायक्लोस्टोमांमध्ये व कायमीरा मत्स्यात जठर असे नसतेच.

आंत्र हा पचन तंत्राचा सर्वांत अधिक लांबीचा भाग होय. सर्वसाधारणपणे आकारमानाने लहान व मोठ्या असणाऱ्या प्राण्यांत आंत्र हे अनुक्रमे कमी व जास्त लांबीचे असते. तसेच ते शाकाहारी प्राण्यात लांब व मांसाहारी प्राण्यात काहीसे आखूड असते.

घ्वांत्राचे निरनिराळ्या प्राण्यांत दोन किंवा तीन भाग पडत असले, तरी ज्या भागात जठर उघडते आणि यकृत व अग्निपंड ह्या ग्रंथीच्या नलिका उघडतात त्या आंत्राच्या पहिल्या भागास ग्रहणी म्हणतात. शार्क (मुशी) ह्या माशात लघ्वांत्राचा अभिशोषण-पृष्टभाग सर्पिल वलीने म्हणजे घडीने (आ.८), तर स्तनी प्राण्यांत तो रसांकुरांनी (आंत्राच्या पोकळीत बोटासारख्या घुसलेल्या व ज्यांच्या तळाशी स्रावी ग्रंथींची तोंडे आहेत अशा अंकुरांनी) कितीतरी पटींनी वाढविला जातो.

आ. १२. सशाच्या पचन तंत्राचा काही भाग : (१) लध्वांत्र, (२) अंधनाल, (३) आंत्रपुच्छ, (४) बृहदांत्र, (५) गुदात्र, (६) गुदव्दार.

घ्वांत्राच्या मानाने बृहदांत्र खूपच आखूड असते. तसेच स्तनी प्राणी वगळता इतर प्राण्यांतही ते अगदी आखूड असते आणि लघ्वांत्रा पासून सुस्पष्टही (स्वतंत्र किंवा नेमके असे दाखविता येण्या सारखे) असत ना ही. काही मत्स्य, उभयचर, सरीसृप व पक्षी यांत बृहदांत्र अवस्करात (ज्यात गुद, जननवाहिन्या व मूत्रवाहिन्या उघडतात अशा समाइक कोष्ठात) उ घ ड ते, तर अ स्थि मी न व स्त नी प्राण्यांत ते गुदद्वाराने स्वतंत्रपणे शरीराबाहेर उ घ ड ते. उ पा स्थि मी नां त (ज्यांचा सांगाडा मऊ, लवचिक पण क ठी ण अशा उपास्थींचा-कूर्चांचा – ब न ले ला अ स तो अशा माशांत) गुदांत्र ग्रंथी (आ. ८) तर काही सरीसृप व पक्ष्यांत (आ.९) अंधनाल बृहदांत्राशी जोडलेले असतात. स्तनी वर्गातील घोडा, ससा (आ. १२) इ. प्राण्यांत बृहदांत्राशी जोडलेला अंधनाल हा भाग आकाराने मोठा असून त्यास काहीसे लांब आंत्रपुच्छ (ॲफेंडिक्स) जोडलेले असते. माणसात आंत्रपुच्छ केवळ अवशेषांग म्हणून असते.

---------------------------------------------------------------------------------------------

स्त्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate