অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

रक्तकोशिकाधिक्य

शरीरातील अभिसृत रक्तातील तांबड्या कोशिकांच्या (पेशींच्या) प्राकृतिक (सर्वसाधारण) संख्येपेक्षाअधिक संख्यावृद्धीला ‘रक्तकोशिकाधिक्य’ म्हणतात. ही वाढ बहुधा रक्तारुणाच्या (हिमोग्लोबिनाच्या) वाढीसहित असते. हीसंख्यावृद्धी जेव्हा शरीरातील कोशिकांचे एकूण वस्तुमान दर्शविते तेव्हा त्या रक्तकोशिकाधिक्याला पूर्ण अथवा यथार्थरक्तकोशिकाधिक्य म्हणतात. अभिसृत रक्तातील रक्तद्रव नाश पावल्यानंतर रक्त तपासल्यास जी कोशिकावृद्धी आढळते तिला‘सापेक्ष अथवा मिथ्या रक्तकोशिकाधिक्य’ म्हणतात. पूर्ण कोशिकाधिक्याचे ‘प्राथमिक व दुय्यम’ असे दोन प्रकार आहेत. प्राथमिकप्रकार हा महत्त्वाचा रोग असून तो नववृद्धिजन्य असतो. दुय्यम प्रकार शरीरक्रियात्मक असून त्याचे (१) योग्य व (२) अयोग्य असेदोन उपप्रकार आहेत. रोगाचे वर्गीकरण खाली दिले आहे.

रक्तकोशिकाधिक्य

l

l

 

l

 

पूर्ण अथवा यथार्थ (तांबड्या कोशिकांचे वस्तुमान +)

सापेक्ष अथवा मिथ्या (तांबड्या कोशिकांचे वस्तुमान

प्राकृतिक वजा रक्तद्रव घनफळ)

l

 

l

 

l

l

l

l

प्राथमिक (नववृद्धिजन्य)

दुय्यम (शरीरक्रियात्मक)

निर्जलीभवन

ताण अतिरक्तदाब

 

l

 

 

l

 

l

 

योग्य [अल्प ऑक्सिजनरक्तता, उंच (४,२०० ५,१०० मी.) प्रदेशातील रहिवासी]

 

अयोग्य (अर्बुदजन्य, एरिथ्रोपोएटीननिर्मिती

 

(ऑक्सिजनरक्तता-रक्तात ऑक्सिजनाचे प्रमाण कमी असणे; अर्बुद-नवीन कोशिकांच्या अत्याधिक वाढीमुळे निर्माण होणारी गाठ; एरिथ्रोपोएटीन-तांबड्या कोशिकांच्या निर्मितीच्या प्रक्रियेचे नियमन करणारे संयुग).

सापेक्ष अथवा मिथ्या रक्तकोशिकाधिक्य

बहुधा मध्यमवयीन पुरुषात आढळणारी ही विकृती कोणतेही विशिष्ट लक्षण नसलेलीव प्रयोगशालेय तपासणीत अकस्मात लक्षात येणारी आहे. रक्तारुण वृद्धी १८ ते २० ग्रॅ. आणि सांद्रित कोशिका घनफळ ४९ ते ५५%(प्राकृतिक १३ ते १७ ग्रॅ. व ४० ते ५०%) आढळते. दैनंदिन जीवनातील ताण कमी करणे आणि अतिरक्तदाबावरील उपचार व शांतके(मन शांत करणारी द्रव्ये) या रोगात उपयोगी पडतात. वजन कमी करणे व धूम्रपान वर्ज्य करणे हितावह असतात. सांद्रित कोशिकाघनफळ सतत वाढलेले आढळल्यास नीलावेध (नीलेतून ठराविक प्रमाणात रक्त काढून टाकणे) उपयुक्त असून हा उपचारलक्षणविरहित मध्यमवयीन आणि सांद्रित कोशिका घनफळ अत्यल्प वाढलेले असल्यास टाळावा. नीलावेधाने रक्ताची श्यानता(दाटपणा) कमी होते व संभाव्य हृद्‌रोहिणी विकार किंवा मस्तिष्क (मेंदू) वाहिनी विकार टाळता येतात.

येथे सांद्रित कोशिका घनफळाविषयी थोडक्यात माहिती देणे आवश्यक आहे. हे घनफळ मोजण्याकरिता हीमॅटोक्रिट नावाचेउपकरण वापरतात. नीला किंवा केशवाहिनीतील रक्त क्लथनरोधी (साखळण्यास प्रतिरोध करणारे) बनविल्यानंतर मिमी.च्या खुणाअसलेल्या विशिष्ट आकाराच्या काचनलिकेत ठेवून केंद्रोत्सारित करतात. काही मिनिटांनंतर कोशिका व रक्तद्रवअलग होऊन कोशिका थर तळाशी बसतो आणि अशा प्रकारे सांद्रित कोशिका घनफळ मोजतात. एकूण घनफळाच्या सापेक्ष असणाऱ्यासांद्रित कोशिका घनफळालाही हीमॅटोक्रिट म्हणतात व ते टक्क्यांमध्ये दर्शवितात.

प्राथमिक रक्तकोशिकाधिक्य

ल्वी आंरी व्हाकेझ आणि विल्यम ओसलर या वैद्यांच्या नावांवरून व्हाकेझ-ओसलर रोग यादुसऱ्या नावानेही ओळखली जाणारी ही विकृती कोणत्याही उद्दीपक कारणाशिवाय तांबड्या कोशिकांच्या स्वयंप्रेरित वृद्धीतून उद्‌भवते.ही संख्यावाढ तांबड्या कोशिका वस्तुमानात होते. या विकृतीला ‘रक्तकोशिकाधिक्य-रक्तता’ असेही म्हणतात. बहुधा रक्तातीलइतर कोशिका-श्वेत कोशिका व बिंबाणू-वाढलेल्या असतात. नववृद्धिजन्य (अर्बुदाप्रमाणे) असलेल्या या विकृतीत अस्थिमज्जेतील(लांब हाडे व विशिष्ट चपटी हाडे यांत आढळणाऱ्या वाहिनीयुक्त संयोजी ऊतकांतील म्हणजे कोशिकासमूहातील) सर्वच घटकांची वृद्धीआढळते.

अलीकडील संशोधनानुसार तांबड्या कोशिकांची अमर्याद निर्मिती अस्थिमज्जेतील एकाच स्कंध कोशिकेच्या (रक्तातील इतरकोशिका निर्माण करण्याची क्षमता असलेल्या कोशिकेच्या) पूर्वगामी तांबड्या कोशिकांपासून होते. या स्कंध कोशिकेतील जीनांच्या(आनुवंशिक लक्षणे निदर्शित करणाऱ्या एककांच्या) रचनेतील बदल तांबड्या कोशिकांच्या नियंत्रित उत्पादनात बिघाड उत्पन्नकरतात.

सर्वसाधारणपणे चाळीशी ते साठीच्या दरम्यान उद्‌भवणारा हा रोग ज्यू लोकांत अधिक प्रमाणात, तर निग्रोंमध्ये क्वचितआढळतो. पुरुष व स्त्री रुग्णांचे प्रमाण १·५ : १ असे आहे. कधीकधी रोग लक्षणविरहित असतो. सुरुवात नकळत किंवा एखाद्यास्फोटक लक्षणाने होते. शिथिलता, डोकेदुखी, एकाग्रतानाश, अंधारी येणे इ. लक्षणांसहित ७५% रुग्णांमध्ये प्लीहावृद्धी (पानथरीचीवाढ) आढळते.

प्राथमिक रक्तकोशिकाधिक्य चिरकारी (दीर्घकालीन) प्रकारची विकृती आहे. निदानानंतरवीस वर्षांपर्यंतही रुग्ण जिवंत राहू शकतो. फलानुमान (रोग्याच्या संभाव्य परिणामासंबंधीचेअनुमान) अनिश्चित असते. सांद्रित कोशिका घनफळ मापनाने निदान निश्चित झाल्यानंतरआकृतीत दर्शविलेले परिणाम संभाव्य असतात.

उपचारामध्ये नीलावेध हा सर्वोत्तम उपाय आहे. निदान अनिश्चित असले, तरी ५००मिलि. रक्त (वयस्कर रुग्णात त्याहून कमी) काढून टाकतात. जरूर पडल्यास नीलावेध पुन्हाकरता येतो. हीमॅटोक्रिट ४५ % वर येईपर्यंत हा उपचार वापरता येतो. त्यामुळे रक्ताचीश्यानता कमी होऊन संभाव्य धोके टळतात.

निश्चित निदानानंतर किरणोत्सर्गी (भेदक कण वा किरण बाहेर टाकणारा) फॉस्फरस(३२) अंतर्नीला अंतःक्षेपणाने (शिरेतील इंजेक्शनाने) देतात. या उपचाराचा परिणाम ३महिन्यांनंतर दिसू लागतो. श्वेत कोशिकांची संख्या व बिंबाणूंची संख्या मात्र लवकर कमीहोतात. रासायनी चिकित्सेत काही कोशिकानाशी औषधे उपयुक्त असतात. ब्यूसल्फान किंवा मेलफलान ही औषधे परिणामकारकआहेत; परंतु ती अधिक काळजीपूर्वक व खास देखरेखीखाली द्यावी लागतात. शिवाय रक्ततपासणी वारंवार करावी लागते.

 

संदर्भ : 1. Macleod, J., Ed., Davidson’s Principles and Practice of Medicine, Edinburgh, 1984.

2. Petersdorf, R. G. and others, Ed., Harrison’s Principles of internal Medicine, Singapore, 1983.

3. Scott, R. B., Ed., Price’s Textbook of Medicine, Edinburgh, 1978.

4. Weatheall, D. J. and others, Ed., Oxford Textbook of Medicine, Oxford, 1984.

लेखक : य. त्र्यं. भालेराव

स्त्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 6/5/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate