অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

स्थूलता

शरीरात प्रमाणाबाहेर वसा-ऊतकाची ( मेद चरबी ) निर्मिती होत असलेल्या अवस्थेस स्थूलता म्हणतात. या स्थितीची सर्व-साधारण कल्पना शरीराच्यावजनावरून येऊ शकते. उंची व वजन यांमधील संबंध दाखविणार्‍या तक्त्यात दिलेल्या वजनाच्या सरासरीपेक्षा सु. २० प्रतिशत अधिक वजन असणारी व्यक्ती स्थूल म्हणता येते उदा. १६८ सेंमी. उंचीच्या पुरुषाचे वजन ५६—७२ किग्रॅ. अपेक्षित आहे. या मर्यादेचा मध्यबिंदू ६४ किग्रॅ. असल्यामुळे त्याच्या २० अधिक म्हणजे ७६८ किग्रॅ.हून अधिक वजन स्थूलता दर्शविते. १६८ सेंमी. उंचीच्या स्त्रियांच्या बाबतीत हीच वजनाची ६७ किग्रॅ. असल्याने ७१४ किग्रॅ. हा स्थूलतेचा निर्देशक असू शकेल. स्थूलतेचे प्रमाण पाश्चात्त्य प्रगत देशांमध्ये अधिक आहे. सुमारे ३० पुरुष व ३५% स्त्रिया स्थूल असल्यामुळे आणि हे सतत वाढत असल्यामुळे या देशांमध्ये स्थूलता व तिचे तोटे यांविषयी जागरूकताही वाढत आहे. भारतासारख्या देशांतही हे प्रमाण कमी नाही. वाढत्या वयोमानाशी स्थूलता निगडित असल्याने आयुर्मर्यादेच्या वाढी-बरोबरच सर्व देशांमध्ये स्थूलतेचे प्रमाण वाढत आहे. वजनातील वाढ सरासरीपेक्षा २०४०% आणि ४०१००% अधिक असणार्‍या व्यक्ती ( सौम्य आणि गंभीर स्थूलता ) आढळणे ही आता अपवादात्मक गोष्ट राहिलेली नाही.

उंची व वजन यांच्या प्रमाणाचा

( आनुवंशिकतेनुसार व प्रकृतीनुसार कमी-जास्त )

उंची ( सेंमी.)

सडपातळ बांधा

मध्यम बांधा

सुदृढ बांधा

वजन किग्रॅ.मध्ये

( अ ) पुरुषांसाठी

१६०

५०५५

५४५८

५८६५

१६४

५४५८

५५६४

६०६८

१६६

५५६०

५८६५

६२७०

१६८

५६६०

६०७०

६५७२

१७२

६२६६

६६७०

६६७५

१७५

६५६८

७०८०

७६८२

१८०

६८७२

७२७६

७८९०

१८४

७०७४

७३८०

७८९०

१८८

७२७६

७४८२

८०९२

१९०

७३७८

७५८५

८०९४

(आ) स्त्रियांसाठी

१४८

४०४४

४३४८

४६५३

१५०

४२४६

४४५०

४८५६

१५२

४३४८

४५५१

४९५६

१५६

४५४८

४७५३

५१५९

१५८

४६५२

४८५५

५२६०

१६०

४८५४

५०५५

५३६२

१६४

५०५५

५२५९

५७६५

१६८

५२५७

५५६२

५८६७

१७०

५३५९

५६६४

६०६९

१७४

५५६०

५८६६

६२७५

१७६

५८६२

६२६९

६६७५

१७८

६०६४

६३७०

६६७६

१८०

६२६५

६४७२

६७७८

कारणे

शरीरातील ऊतकांचे मुख्यतः चार गट आहेत :

(१) स्नायू , यकृत, वृक्क यांसारखीऊतके;

() हाडे, कूर्चा, सांधे, त्वचा;

() संयोजी ऊतके इ.द्रव, रक्त, लसीकाआणि त्यांच्या वाहिन्या;

() वसा-कोशिका आणि त्यांच्या आत साठविले जाणारे वसाद्रव्य. निरोगी आणि शारीरिक कष्टाची नियमितपणे सवय असलेल्या व्यक्तींमध्ये या चार ऊतकांचे प्रमाण संतुलित असते. आहारातून घेतलेल्या ऊर्जेचाकाम करण्यासाठी होत असल्याने फारशी अतिरिक्त ऊर्जा शिल्लक राहत नाही. याउलट खर्च होणार्‍या ऊर्जेपेक्षा अधिक ऊर्जा आहारातून सतत घेत राहिल्यास आणि शारीरिक कष्ट कमी केल्यास अतिरिक्त ऊर्जेचे रूपांतर चरबीत होऊन ती वसा-कोशिकांच्या आत साठविली जाते. त्यांचेवाढत जाते. बालवयात अशा परि- स्थितीमध्ये नवीन वसा-कोशिका निर्माण होण्याचा वेगही अधिक असतो. ही सर्व प्रक्रिया इतर तीनही गटांमधील ऊतकांच्या वाढीवर आणि एकंदर वजनावर विपरीत परिणाम करीत असते. त्यामुळे त्यांचीकमी होते. साधारणपणे दर ९ कॅलरी अतिरिक्त आहारातून एक ग्रॅम वसा- द्रव्याची निर्मिती होते.

ट्रायग्लिसराइडाच्या स्वरूपात ते कोशिकेत साठविले जाते. ( ग्लिसरॉलाचा एक रेणू आणि वसाम्लाचे तीन रेणू यांचाहोऊन ट्रायग्लिसराइडाचा रेणू बनतो ).

अतिरिक्त आहार व कमी अशा सोप्या शब्दांत स्थूलतेचे कारण सांगता आले, तरी त्यामागे अनेक घटकांची पार्श्वभूमी असते. आनुवंशिक प्रवृत्तीमुळे जवळजवळ ३०% वर्तनाचेदेता येते. कुटुंबातील अनेक व्यक्तींमध्ये आढळणारी आणि जुळ्या भावंडांत समान असणारी अतिरिक्त आहाराची सवय आनुवंशिक असू शकते.मेंदूतील आहारनियंत्रक यंत्रणा कोणत्या पातळीवर कार्यान्वित होते त्या समाधान बिंदूची निश्चिती काही अंशी आनुवंशिक गुणांमुळेच होत असावी. या बिंदूची ( सेट पॉइंटची ) निश्चिती होण्यास बालपणातील आहाराच्या सवयी, अंतःस्रावी ग्रंथींचाआणि अधोथॅलॅमसामधील काही नियंत्रक केंद्रांना झालेली इजा यांचाही हातभार लागतो. बाल्यावस्थेत आग्रहाने अतिरिक्त आहार घ्यायला लावण्याच्या सवयीमुळे पालकांकडून वसा-ऊतकांची संख्या ३ ते ५ पट वाढविण्याच्या प्रक्रियेस नकळत मदत होत असते. प्रौढ व्यक्तींमध्ये स्थूलता निर्माण करण्यास कधीकधीअवसादन, तीव्र दुःख देणार्‍या घटनांप्रत घडून येणारी

व्यायामाचाहे कारण महत्त्वाचे आहे. त्यामागे मनाचा निग्रह नसणे, वेळ किंवा जागा उपलब्ध नसणे, बैठ्या कामाचा व्यायामाचा अभाव हे कारण महत्त्वाचे आहे. त्यामागे मनाचा निग्रह नसणे, वेळ किंवा जागा उपलब्ध नसणे, बैठ्या कामाचा व्यवसाय , स्थूलतेमुळे कमी होणारी हालचाल इ. अनेक कारणे असू शकतात. समाजाच्या वरच्या थरातील व्यक्तींवर लठ्ठपणाला आक्षेप घेणारे दडपण असल्यामुळे व व्यायामाच्या सुविधा उपलब्ध असल्याने स्थूलतेला वेळीच आळा घालणे शक्य होते. त्यामुळे आधुनिक काळात स्थूलतेचे प्रमाण कनिष्ठ वर्गात अधिक असल्याचे काहीसे अनपेक्षित चित्र आढळून येते.

अतिस्थूलतेमुळे निर्माण होणारी लक्षणे आणि विकार

शरीराच्या निरनिराळ्या भागांत वसा-ऊतकांचीसारख्याच प्रमाणात होत नाही. तसेच त्वचेखालील मेदवृद्धी जितक्या सहजपणे लक्षात येते तितकीइंद्रियांभोवतालची वाढ ( उदा., आतडी, वृक्क, श्रोणीमधील इंद्रिये इ. ) बाहेरून जाणवत नाही. तरीही या सर्व ठिकाणी वाढलेल्या ऊतकांमुळे काही लक्षणे निर्माण होतात. उदा., छातीच्या आणि मध्य-पटलाच्या ( छाती व पोट यांच्यामधील पडद्याच्या ) पृष्ठभागावर मेदवृद्धी झाल्यामुळे फुप्फुसावर दाब पडून श्वसनास अडथळा येतो; थोड्याशा श्रमामुळेही धाप लागते, व्यायाम घडविणार्‍या हालचाली नकोशा वाटतात; दिवसा झोपावेसे वाटते आणि झोपेतही कधीकधी श्वासास अडथळा येऊ शकतो. छाती व पोटातील मेदवृद्धीमुळेआणि कंबर दुखते, श्रोणींचे, गुडघ्याचे व घोट्याचे सांधे संधिशोथाची लक्षणे दाखवू लागतात आणि चालणे किंवा पळणे दुःसह होते. अतिशय घाम येणे, त्वचेच्या घड्यांमध्ये खाजणे किंवा संक्रामणजन्य विकार झाल्यास तो लवकर बरा न होणे, पायांवर व घोट्यांभोवती सूज येणे यांसारखी इतरही लक्षणे केवळ  स्थूलतेमुळे निर्माण होऊ शकतात.

छाती व पोट यांवरील स्थूलतेमुळे रक्तातील वसाद्रव्यांचे प्रमाण वाढून  रक्तदाब, हृदयविकार आणियांचे प्रमाण वाढत असल्याचे लक्षात आले आहे. त्यामानाने श्रोणिप्रदेशाभोवती असलेली मेदवृद्धी ( पोटावर मेद नसल्यास ) कमी हानिकारक समजली जाते. इतर मेदजन्य विकारांत पित्ताशयातील खडे, मासिक ऋतुस्रावाच्या अनियमिततेशी संबंधित विकार, मोठ्या आतड्याचा व अष्ठीला ग्रंथीचा ( प्रोस्टेटचा )आणि मानसिक समस्या यांचा उल्लेख करता येईल.


स्त्रोत मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 6/8/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate