उन्हाळा सुरु झाल्यावर ऋतूतील झालेल्या बदलांमुळे विविध प्रकारचे आजार उद्भवतात, यात प्रामुख्याने त्वचाविकार तसेच उष्माघाताचा समावेश आहे. उन्हाळ्यात आरोग्य सांभाळण्यासाठी प्रतिबंधक उपायाबरोबरच काही दक्षता
एप्रिल अखेर आणि मे महिन्यातील तापमानाची तीव्रता यंदा मार्च महिन्यापासूनच जाणवायला लागली आहे. तापमानाने चाळीशी पार केली असून राज्यात उष्णतेची लाट भडकली आहे. उष्माघात म्हणजे उष्णतेचा आघात.
वैद्यकीय पर्यटन म्हणजे वैद्यकीय उपचारांसाठी आपल्या देशातून परदेशी जाणे, इतका सोपा अर्थ. पण या उपचारांना तिथल्या आनंददायी वास्तव्याचा पैलू जोडला गेल्याने हा आता फक्त उपचाराचा भाग उरला नाही
शरीरातील अंतःस्रावी ग्रंथींना नलिकाविरहित ग्रंथी म्हणतात. या ग्रंथींमध्ये विशिष्ट रासायनिक पदार्थ म्हणजेच संप्रेरके तयार होतात.
शरीरातील एखादी ऊती, इंद्रिय किंवा इंद्रियाचा भाग शरीरपोकळीतून बाहेर येण्याच्या विकृतीला ‘अंतर्गळ’ म्हणतात. शरीरातील फुप्फुसे, हृदय किंवा आतडी अशी इंद्रिये पोकळ जागांमध्ये असतात.
अतिसार नियंत्रणासाठी घ्यायची दक्षता
एखादा बाह्य पदार्थ शरीरात गेला असता एरव्ही न होणारी विशिष्ट प्रतिक्रिया होणे म्हणजे अधिहर्षता. अशी विपरीत प्रतिक्रिया निर्माण होण्याच्या प्रवृत्तीलाही अधिहर्षता असे म्हणतात. ज्या बाह्य पदार्थामुळे अधिहर्षता होते त्यास ‘अधिहर्षताकारी’ किंवा सामान्य भाषेत ‘वावडा’ पदार्थ म्हणतात.
अफलित अंडाचा प्रौढ जीवात विकास होण्याच्या क्रियेला अनिषेकजनन म्हणतात. लैंगिक प्रजननात सामान्यपणे मादीच्या पक्व अंडाचे (अंडाणूचे) नराच्या शुक्राणूद्वारे फलन झाल्यास अंड उद्दीपित होते व त्याच्या विकासाने नवीन जीव उत्पन्न होतो.
डॉक्टर्स आणि नर्सेस एवढेच मनुष्यबळ गृहीत धरून स्वातंत्र्यानंतर भारतातली आरोग्यसेवा "विकसित' झाली आहे.
अन्न आणि औषधे यांचे प्रमाणीकरण करून, त्यांच्या निर्मितीवर व वाटपावर नियंत्रण ठेवणारी शासकीय यंत्रणा. १९३५ नंतर अन्नाची गरज खूप वाढली होती, परंतु उत्पादन मात्र कमी होत होते. अशा परिस्थितीत अन्नामध्ये इतर पदार्थांची भेसळ करण्याचे प्रमाण वाढले.
अन्नपरिरक्षणाच्या पद्धतींमुळे अन्नपदार्थांचे पोषणमूल्य, बाह्य स्वरूप, पोत, स्वाद व गुणवत्ता यांवर दुष्परिणाम घडवून आणण्यार्या घटकांवर नियंत्रण राखणे शक्य होते.
अन्नपदार्थातील काही घटक काढून घेणे. उदा. दुधातील स्निग्धांश काढून घेणे, लवंगा- वेलदोडयातील अर्क काढून घेणे
नुकत्याच घडलेल्या मॅगी प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर ‘भारतात अन्न सुरक्षिततेच्या बाबतीत सुधारणा करणे’ या विषयावर दोन लाख नागरिकांच्या ऑनलाइन गटामध्ये ‘लोकल सर्कल’च्या माध्यमातून तपशीलवारपणे चर्चा केली गेली. एवढ्या मोठ्या प्रमाणात लोकसहभाग असलेल्या या चर्चेतून काही निष्कर्ष काढण्यात आले, तसेच काही सामुदायिक समस्याही निश्चित करण्यात आल्या.
अन्नभेसळ प्रतिबंधक कायदा सगळीकडे लागू झाला आहे.
अन्नातील भेसळ ओळखायची कशी?
अन्नाचे पचन नीट न झाल्याने निर्माण होणार्या विकाराला 'अपचन' म्हणतात. अपचनाची लक्षणे निरनिराळ्या प्रकारची असून खाण्याशी निगडित असतात. पोट फुगण्यापासून पोट दुखण्यापर्यंत सर्व लक्षणांना ‘अपचन’ असे म्हणतात.
वारंवार आकडी, फेपरे वा बेशुद्धी येणे हे प्रमुख लक्षण असलेल्या दीर्घकालीन आजाराला ‘अपस्मार’ म्हणतात. याची कारणे व प्रकार अनेक असल्यामुळे हा एकच रोग आहे, असे असू शकत नाही. हा चेतासंस्थेतील बिघाड आहे.
शरीरामधील रक्तातील त्याज्य घटक बाहेर टाकण्याचे काम मुख्यतः मूत्रपिंडाद्वारे (वृक्काद्वारे) होते. काही कारणाने मूत्रपिंडे निकामी झाल्यास ती रक्तातील त्याज्य घटक ती बाहेर टाकू शकत नाहीत. अशा वेळी कृत्रिम यंत्रणा वापरून घातक घटक रक्तातून काढावे लागतात. ही यंत्रणा अपोहन तत्त्वावर कार्य करत असल्याने या पद्धतीलाही ‘अपोहन’ असे म्हणतात.
संयुक्त राष्ट्र संघटनेच्या सर्वसाधारण सभेत ७ डिसेंबर १९८७ रोजी २६ जून हा दिवस आंतरराष्ट्रीय अमली पदार्थ आणि (त्यांची) अवैध वाहतूक विरोधी दिन, मानला जावा असा ठराव पारित झाला.
अर्धशिशी म्हणजे वारंवार आणि बहुधा डोक्याच्या एकाच बाजूला होणारी तीव्र डोकेदुखी. ही बहुधा एका बाजूची तर कधी दोन्ही बाजूंची असते. डोकेदुखीबरोबर ओकार्या होतात. या रोगास चेतासंस्था कारणीभूत असली तरी रक्ताभिसरण संस्थेचा त्यात महत्त्वाचा सहभाग असतो.
शरीराच्या एखाद्या भागातील पेशींची अपसामान्य वाढ होऊन तयार होणार्या निरुपयोगी गाठीला 'अर्बुद' असे म्हणतात. पेशींच्या प्रत्येक प्रकाराप्रमाणे पेशीविभाजनासाठीची जनुके पेशीविभाजन नियंत्रित करतात. काही रसायने, किरणोत्सार, विषाणू इत्यादींमुळे पेशीविभाजनावर परिणाम घडून येतो. परिणामी पेशींची अपसामान्य वाढ होऊन पेशींच्या गाठी म्हणजेच अर्बुदे तयार होतात.
माणसाला दुर्बल करणारा वार्धक्यातील विस्मृतीचा रोग. या रुग्णाची स्पष्टपणे विचार करण्याची क्षमता नाहीशी होते. तो स्वत्व हरवतो, कार्यकारणाचा अभाव होतो व स्वत:कडे लक्ष द्यायला असमर्थ होतो. १९०७ मध्ये अॅलॉइस अल्झायमर यांनी हा रोग शोधून काढला. चोर पावलांनी येणारा हा स्मृतिभ्रंश वाढत्या वयानुसार वाढत जातो.
अवयवदान अभियान याविषयी...
अवयवदानाविषयी माहिती
अवयवदान विषयक माहिती.
अवयवदान दिन विषयक माहिती.
अवयवदानाला चालना मिळावी याकरीता राज्यस्तरावर कार्यक्रम हाती घेऊन जनजागृतीसाठी महा अवयवदान महोत्सव-२०१७.
सजीवांमधील र्हास पावलेल्या किंवा अपूर्ण वाढ झालेल्या निरुपयोगी इंद्रियांना अथवा अंगांना ‘अवशेषांग’ म्हणतात. बदलणार्या किंवा भिन्न पर्यावरणात जगण्यासाठी सजीवांत अचानक नवी ऊती, अंगे किंवा इंद्रिये उत्पन्न होऊ शकत नाहीत.
मनुष्याच्या डोळ्याच्या वरच्या पापणीत वसलेली अश्रू तयार करणारी ग्रंथी. बदामाच्या आकाराची ही ग्रंथी सतत अश्रू तयार करून ६ ते १२ नलिकांवाटे वरच्या पापणीच्या श्लेष्म त्वचेवर पसरवते. हे अश्रू डोळ्याच्या पुढच्या भागावर पसरतात व डोळ्यांच्या नाकाजवळच्या भागातील दोन छिद्रांकडे जातात.
२१ जून आंतरराष्ट्रीय योगा दिवस आणि योगाचे महत्त्व या विषयी माहिती.