लोकांनी आरोग्यविषयक गैरसमजुती, चुकीच्या सवयी टाकून त्यांना योग्य जाणीव येणे,सवयी बदलणे हे आरोग्यशिक्षणाचे उद्दिष्ट आहे. समजा, व्यायामाचा प्रसार हे काम मनात धरले तर त्यासाठी त्यांना समजेल अशा भाषेत त्याची माहिती देणे, त्यांना आवड निर्माण होईल असे प्रयत्न करणे, प्रात्यक्षिके आणि प्रशिक्षण हवे असेल तर त्याची सोय करणे वगैरे गोष्टी कराव्या लागतील. याउलट नुसते व्यायामाचे महत्त्व सांगितले तर लोक ऐकतील व सोडून देतील. हेच उदाहरण एड्स नियंत्रणाबाबत कसे लागू पडते हे आपण पाहू. मुंबईत वेश्यावस्तींमध्ये एड्स प्रसाराचा मोठा धोका आहे. वेश्या व्यवसाय करणा-या स्त्रियांना आणि गि-हाईकांनाही हा धोका समजावून सांगणे, काळजी घेण्यास प्रवृत्त करणे हे तसे मोठे आव्हान आहे.
यासाठी काही संस्थांनी प्रत्यक्ष फिरून तिथल्या वस्तीत माहिती सांगितली., निरोध मिळेल याची व्यवस्था केली, प्रत्येक घरात स्त्रियांना याचे महत्त्व,वापर करण्याची पध्दत समजावून सांगितली. गि-हाईकांचेही सतत प्रबोधन चालू ठेवले. ट्रक ड्रायव्हर्स हे सर्वसाधारणपणे नेहमीचे गि-हाईक, त्यासाठी त्यांच्या युनियन्सना विश्वासात घेऊन संघटित प्रयत्न केले. या सर्व प्रयत्नांनंतर निरोधचा वापर ही गोष्ट ब-याचजणांच्या मनात ठसली. कलकत्त्यातल्या वेश्यावस्तीत तर नव्वद टक्केपर्यंत लैंगिक संबंधात निरोध वापरला जातो. हे काम आरोग्यशिक्षणामुळेच होऊ शकले. याऐवजी वेश्याव्यवसायावर बंदी किंवा धरपकड असे प्रकार केले असते तर हा व्यवसाय बंद न होता गुप्तपणे वाढत गेला असता. यातून निरोधप्रसाराचे काम झालेच नसते. काही कामे आरोग्यशिक्षणातूनच होऊ शकतात.
लेखक : डॉ. श्याम अष्टेकर
संदर्भ : आरोग्यविद्या
अंतिम सुधारित : 10/7/2020
आपला आहार जेवढा नैसर्गिक तेवढा शरीराला तो चांगला. ...
आवेष्टन विषयी माहिती
‘नैसर्गिक निवड’
वर्षभर पद्धतशीर अवकाश निरीक्षण करणार्यास सर्व अवक...