भारतातील आरोग्यसेवांची आकडेवारी
या सर्व आजार आणि मृत्यूदरांच्या पार्श्वभूमीवर भारतातील आरोग्यसेवांची आकडेवारी आता आपण पाहू या.
- भारताच्या सकल घरेलू उत्पन्नापैकी सुमारे 5%खर्च आपण आरोग्यसेवांवर करीत असतो. या बाबतीत सर्व जगात अमेरिका आघाडीवर आहे. (15%)तरीपण तेथील आरोग्यसेवा फार चांगल्या नाहीत. दक्षिण पूर्व आशियात तिमोर हा छोटासा देश खर्चामध्ये अग्रेसर आहे. (10%)
- भारतात दर लाख लोकसंख्येस सरासरी 3 प्राथमिक आरोग्य केंद्रे आहेत. 51%स्त्रियांना प्रसूती सेवा मिळतात तर 48% प्रसूतींच्या वेळी कुशल सहाय्यक हजर असते. भारतात गरोदरपणात धनुर्वात लस मिळणा-या स्त्रियांचे प्रमाण फक्त 71%आहे.
- लसीकरणाचे प्रमाण भारतात कमीच असून बी.सीजी (73%) तिहेरी लस - 3(64%),पोलिओ-3 (70%), गोवर (56%) अशी आपली आकडेवारी आहे. अर्थातच हे प्रमाण कमीच आहे.
- भारतात दर हजार लोकसंख्येस केवळ 1रुग्णालय-खाट उपलब्ध आहे. त्यातही शहरी आणि ग्रामीण अशी तफावत आहे. कोरियामध्ये हेच प्रमाण13 रुग्णालय खाटा इतके आहे. मोनॅको या छोटयाशा देशात हे प्रमाण 196 खाटा इतके आहे.
- आधुनिक वैद्यक प्रणाली (ऍलोपथी) प्रशिक्षित डॉक्टर्सचे प्रमाण भारतात हजार लोकसंख्येस 0.7 इतके जेमतेम आहे. हेच प्रमाण क्यूबामध्ये 59 तर दक्षिण कोरियामध्ये 32 इतके आहे.
- मात्र भारतात आयुर्वेद व होमिओपथी शाखेचेही डॉक्टर असून त्यांचे एकत्रित प्रमाणही हजारी 0.7 एवढेच आहे. म्हणजे ऍलोपथी व आयुर्वेद हे दोन्ही मिळून भारतात डॉक्टरांचे प्रमाण हजारी 1.5 डॉक्टर इतकेच आहे. भारतात दर हजारी लोकसंख्येस परिचारिकांची संख्याही फक्त 0.8 म्हणजे जेमतेम 1 आहे. याउलट दक्षिण कोरियात हे प्रमाण 4 इतके पडते. याशिवाय इतर आरोग्यसेवकांचे हजारी लोकसंख्येस प्रमाण पुढीलप्रमाणे आहे. प्रसूतीसेविका (0.5), दंतवैद्य (0.06), फार्मासिस्ट (0.6), स्वच्छता सेवक (0.4), आशा (1), लॅब तंत्रज्ञ (0.02), इतर आरोग्यसेवक (0.8).
- भारतातील लोक आरोग्यसेवेवरचा खर्च बहुतेक करून (75%) स्वत:च्या खिशातून करतात तर उरलेला खर्च शासकीय असतो. खाजगी सेवांवरील एकूण खर्चापैकी 3%खर्च हा वैद्यकीय विमा योजनेमधून तर 97% खर्च ऐनवेळी येईल तसा करावा लागतो. यामुळे लोक त्रस्त झालेले आहेत.
- शासकीय सेवांमध्ये मुख्य खर्च (85%) राज्य सरकारे करतात तर केंद्र सरकार फक्त15% खर्च करते. मात्र राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य योजना सुरु झाल्यावर हळूहळू केंद्र सरकारचा वाटा वाढत आहे. तरीही केंद्र सरकार त्याच्या एकूण अंदाजपत्रकाच्या फक्त2% रक्कम आरोग्यावर खर्च करते.
- रुग्णालयात दाखल करावे लागल्यास 40% कुटुंबांना उधार उसनवार करावी लागते तेव्हा चीजवस्तू विकून बिल भरावे लागते असे ही आकडेवारी सांगते.
आकडेवारीतील निवडक मुद्दे
या संघटनेच्या आकडेवारीशिवाय इतर काही माध्यमांवरून भारताची आरोग्यविषयक आकडेवारी कळते. यातील काही आकडेवारी वरील आकडेवारीशी जुळत नाही. यातील उपलब्ध आकडेवारीतील निवडक मुद्दे खाली दिले आहेत.
- स्वच्छतेच्या सोयींचे प्रमाण (ग्रामीण) - फक्त 15% लोकसंख्या.
- एकूण लोकसंख्येपैकी स्वच्छतेच्या सोयी असलेल्यांची टक्केवारी 28%, फक्त शहरी 61%.
लेखक : डॉ. श्याम अष्टेकर
संदर्भ : आरोग्यविद्या
अंतिम सुधारित : 10/7/2020
0 रेटिंग्स आणि 0 टिप्पण्या
तार्यांवर रोल करा, नंतर दर क्लिक करा.
© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.