অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

रिकेट्‌सिया

सूक्ष्मजंतूंच्या एका मोठ्या व मिश्र गटाला रिकेट्‌सिया म्हणतात. प्रस्तुत नोंदीत वर्णन केलेल्या या सूक्ष्मजंतूंचा समावेश सूक्ष्मजंतूविज्ञानीय वर्गीकरणातील ⇨रिकेट्‌सिएलीझ गणातील रिकेट्‌सिएसी या कुलात करण्यात येतो. काही कीटकांच्या आंत्रमार्गात (आतड्यात) बहुतकरून आढणाऱ्या व मानवी रोगास कारणीभूत असणाऱ्या या अंतःकोशिय (कोशिकेच्या−पेशीच्या−आतील) परजीवी (दुसऱ्या सजीवांवर उपजीविका करणाऱ्या) सूक्ष्मजंतूंच्या गटाला एकेकाळी सूक्ष्मजंतू व व्हायरस यांच्या दरम्यानचा गट मानीत. आता ते सूक्ष्मजंतू असल्याचे सिद्ध झाले आहे. सूक्ष्मजंतूंप्रमाणेच त्यांना म्युरिनयुक्त (पेप्टिडोग्लायकान या बहुवारिकांनी म्हणजे साध्या व लहान रेणूंच्या संयोगाने बनलेल्या प्रचंड रेणूंच्या संयुगांनी युक्त) भित्ती असते. त्यांमध्ये रिबोन्यूक्लिइक अम्ल (आरएनए) व डीऑक्सिरिबोन्यूक्लिइक अम्ल (डीएनए) ही दोन्ही ⇨न्यूक्लिइक अम्ले असतात आणि द्विभाजनाने त्यांच्या संख्येत वाढ होते. याशिवाय त्यांची स्वतंत्र चयापचयात्मक (शरीरात सतत होणाऱ्या भौतिक व रासायनिक घडामोडींची) क्रियाशीलताही असते.

मानवातील रिकेट्‌सियाजन्य रोग

रिकेट्‌सिया गट

रोग

रोगोत्पादक रिकेट्‌सिया

संधिपाद रोगवाहक

पोषक प्राणी

समूहनमिळणारेप्रोटियस

भौगोलिक प्रदेश

(१) प्रलापक सन्निपात अथवा टायफस ज्वर गट

(अ)साथीचा प्रलापक सन्निपात ज्वर

रिकेट्‌सिया प्रोवाझोकी

नाही

ओएक्स – १९

जागतिक; क्वचितच अमेरिका.

 

(आ) ब्रिल-झिन-सर

रिकेट्‌सिया प्रोवाझोकी

ओएक्स− १९

अमेरिकेतील ईशान्य किनाऱ्यावरील शहरे;इझ्राएल. (पूर्वी साथीचा प्रलापक सन्निपात ज्वर होऊन गेलेल्या रुग्णात उद्‌भवणारी सौम्य विकृती).

 

(इ)मूषक प्रलापक सन्निपात ज्वर

रिकेट्‌सिया भूसेरी किंवा रि. टायफी

उंदरावरील पिसू व ऊ

उंदीर

ओएक्स −१९

जागतिक;अमेरिकेतील दक्षिण राज्ये

 

(२) उत्स्फोटक ज्वर

(अ)रॉकी मौंटन उत्स्फोटक ज्वर

रिकेट्‌सिया रिकेट्‌साया

गोचीड

कृंतक वर्ग व सस्तन प्राणी

अनिश्चित ओ-एक्स-२ किंवा ओ-एक्स-१९

उत्तर व दक्षिण अमेरिका; संबंधित रोग जगभर.

 

(आ) रिकेट्‌सियल स्फोट (देवीसारखे फोड येणारी विकृती)

रिकेट्‌सिया अकारी

माइट

घरगुती उंदीर

कोणतेही नाहीत

अमेरिकेचा पूर्व भाग

 

(३)त्सुत्सुगा-मुशी गट

उष्णकटिबंधीय प्रलापक सन्निपात ज्वर अथवा स्क्रब टायफस

रिकेट्‌सिया ओरिएंटॅलीसअथवा रि. त्सुत्सुगामुशी

माइट

कृंतक वर्ग

ओएक्स- के

पूर्व व वायव्य आशिया, उत्तर ऑस्ट्रेलिया, भारत, जपान, तैवान.

(४)क्यू ज्वर

क्यू ज्वर

कॉक्सिला बर्नेटी

क्वचित गोचीड

गुरे-ढेरे, शेळ्या-मेंढ्या

कोणतेही नाहीत

जागतिक;अमेरिकेतील पश्चिम भाग.

फक्त सूक्ष्मजंतूप्रमाणे ते ग्लुकोजचे अपघटन (रेणूचे तुकडे करण्याची क्रिया) करी शकत नाहीत. त्यांच्या बहुतेक जाती सूक्ष्मजंतुकीय गाळणीतून गाळल्या जात नाहीत व त्यांच्या गुणनाकरिता जिवंत कोशिकांची आवश्यकता असते. जैविक दृष्ट्या रिकेट्‌सियांमध्ये काही सूक्ष्मजंतूंचे व काही व्हायरसांचे गुणधर्म आहेत.एच्. टी. रिकेट्‌स (१८७१−१९१०) या अमेरिकन शास्त्रज्ञांच्या नावावरून या सूक्ष्मजंतूंना नाव मिळाले आहे. या सूक्ष्मजंतूंमुळे होणाऱ्या साथीच्या ⇨प्रलायक सन्निपात ज्वरावर (टायफस ज्वरावर) व रॉकी मौंटान उस्फोटक ज्वरावर (अमेरिकेतील रॉकी पर्वत प्रदेशात प्रथमतः आढळलेल्या व ठिपक्यासारखे फोड हे लक्षण असलेल्या तापावर) रिकेट्‌स यांनी यांच्या संप्राप्तीसंबंधी प्रथम संशोधन केले होते.

या सूक्ष्मजंतूंना व्हायरसाप्रमाणेच वाढीकरिता जिवंत कोशिकांची गरज असते. संसर्गित ऊतक-कोशिकांत (समान रचना आणि कार्य असलेल्या कोशिकांच्या समूहातील कोशिकांत) विशिष्ट रंजन पद्धती वापरून सूक्ष्मजंतू स्पष्ट दिसतात. सूक्ष्मदर्शकाखाली ते विविध रूपांनी दिसतात. सर्वसाधारणपणे आकारमानात त्यांचा व्यास ०·२ ते ०·५ मायक्रॉन (१ मायक्रॉन = १०−६ मी.) व लांबी ०·८ ते २·० मायक्रॉन असते आणि सर्व प्रकार अचल असतात.रिकेट्‌सिया प्रामुख्याने संधिपाद (सांधेयिक्त पाय असलेल्या; आर्थोपॉड) प्राण्यांमधील परजीवी असतात. ते ⇨गोचीड आणि ⇨माइटयांमध्ये जास्त आणि ⇨पिसू व ⇨ऊ यांमध्ये कमी प्रमाणात आढळतात. हे रोगवाहक प्राणी ज्या प्राण्यावर राहतात त्या प्राण्यांमध्येही रिकेट्‌सिया जन्म रोग होतात. रिकेट्‌सियांचे प्रमुख नैसर्गिक संचयस्थान संधिपाद प्राणी असतात.


स्त्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 7/24/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate