अपु-या दिवसांचे मूल- जन्मत: कमी - वजनाचे मूल
आईच्या मागील पाळीपासून ते जन्मापर्यंत 37 आठवडे होऊन गेले असतील तरच जन्मलेल्या मुलाला 'पूर्ण दिवसांचे' म्हणता येईल. 37 आठवडयांच्या आतील मूल अपु-या दिवसांचे समजले जाते. बाळाचे जन्मवजन निदान 2.5 म्हणजे अडीच किलो तरी असायला पाहिजे. यापेक्षा कमी वजनाचे बाळ कमकुवत असते. आता जन्मवजन निदान 3 किलो असावे असे म्हणतात.
अपूर्ण दिवसांचे बाळंतपण होण्याची महत्त्वाची कारणे
- कमी वयात गर्भ राहणे.
- आधी गर्भपात झालेले असणे
- वार आधीच सुटू लागणे.
- पोटावर जोरात मार लागणे.
- जुळी मुले.
- गर्भाशयाच्या पिशवीत बाळाभोवती जास्त पाणी असणे.
- गर्भाररोग, (गर्भारसूज, अतिरक्तदाब) व झटके
- आईला तंबाखू/मिश्री धूम्रपानाची सवय असणे हे बाळाचे वजन कमी असण्याचे एक प्रमुख कारण आहे.
कमी जन्मवजनाची महत्त्वाची कारणे
- आई कुपोषित व अशक्त असणे. रक्तपांढरी
- आईला गर्भारपणात काही आजार.उदा. हिवताप-मलेरिया
- जुळी मुले
- लवकर लवकर मुले होणे.
लेखक : डॉ. श्याम अष्टेकर (MBBS, MD community Medicine)
संदर्भ : आरोग्याविद्या
अंतिम सुधारित : 6/5/2020
0 रेटिंग्स आणि 0 टिप्पण्या
तार्यांवर रोल करा, नंतर दर क्लिक करा.
© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.