हा एक गुंतागुंतीचा आजार समजला जातो. 150 मुलांमध्ये एक इतके प्रमाण/हजारात6. ऑटो म्हणजे 'आत्म' मग्न असतात.
- विशेष लक्षणे
- डोळयात डोळा घालून न बघणे, लक्ष न देणे.
- परत परत त्याच हालचाली करतात. अधिक हालचाल.
- गरगर फिरणे, त्याकडे बघणे
- पाण्याचे आकर्षण
- कधीकधी हिंसक 'शिस्त' नसणे
- 'भाषा' न येणे/उशिरा येणे
- भान नसणे (बधिरता), सामाजिक जाणीव कमी/नसते.
- प्रश्नांना - तसेच प्रश्न विचारतात.
- जरतर ची भाषा त्यांना फार जड जाते-कळतच नाही. मेंदूमध्ये संदेशवहनात अडथळे नसल्याने हा आजार होतो. मेंदूच्या आत 'कनेक्टीव्हीटी' च्या अडचणी असतात.
याबद्दल एक गैरसमज होता. - या आजाराचा सगळा दोष आई नीट वाढवत नाही म्हणून. पण मुळात हे एक brain damage असते. या मुलांचा मेंदू थोडा वेगळाच असतो.
ब-याच मुलांना हा आजार 'जन्मजात' असतो. काही जणांना नंतर दोन अडीच वर्षात होतो. पालकांना हे समजायला/स्वीकारायला थोडा उशीर लागतो. त्यावेळी त्यांना धक्का बसतो.
काही केसेस थोडया सौम्य असतात. त्यात थोडी सुधारणा होते.
या मुलांना एकास एक असा शिक्षक लागतो. व्यक्तिगत शिक्षक लागतो. पण आपल्या समाजात हे अवघडच असते.
- ऑटिस्टिक मुले नेहमीप्रमाणेच दिसतात. मतिमंद दिसत नाही. मात्र एकदम काहीतरी विचित्र क्रिया करायला लागतात.
- मूल कडेवर घेताना देखील 'निर्जीव' वाटते. प्रतिसाद नसतो.
यासाठी मनोविकारतज्ज्ञ किंवा बालरोग तज्ज्ञाचा सल्ला घ्यायला पाहिजे.
- अशा मुलांना शिकवणे खूप चिकाटीचे काम असते.
- चित्रांच्या साहाय्याने शब्द उच्चारायला शिकवावे लागते.
- माणूस-मुलगा एकाचेवळी 5 इंद्रियांनी 'एकत्र' शिकत असतो.
- मुलांना इतरत्र मिसळू द्यावे, पण लक्ष द्यावेच लागते.
- पालकांनी स्वत: आनंदी राहणे आवश्यक आहे.
लेखक : डॉ. श्याम अष्टेकर (MBBS, MD community Medicine)
संदर्भ : आरोग्यविद्या
अंतिम सुधारित : 6/5/2020
अतिसार म्हणजे वारंवार मलप्रवृत्ती होणे, मल पातळ हो...
या विभागात अ जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे म्हणजेच योग...
डॉक्टर्स आणि नर्सेस एवढेच मनुष्यबळ गृहीत धरून स्वा...
एक किंवा एकापेक्षा अधिक वेळा पातळ अगर पाण्यासारखी ...