पुरेसा व योग्य आहार न घेतल्यामुळे जी अशक्तपणाची व आजारपणाची परिस्थिती निर्माण होते तीला कुपोषण म्हणतात. व त्या व्यक्तीला कुपोषित म्हणता येईल.
कुपोषण म्हणजे आजार नव्हे परंतु अयोग्य आहार, उपासमार व जीवनसत्वांचा अभाव यांचा परिणाम मुलांच्या शरीरावर होतो. असे मुल लहानश्या आजाराने सुध्दा अशक्त दिसु लागते. उदा. अंगावर सुज येणे, मुल रडके होणे. बाळाची वाढ खुंटणे, वजन व उंची वयाच्या प्रमाणात ण वाढणे यालाच कुपोषण म्हणतात.
कृश अंगकाठी, वजन कमी, पोटाचा नगारा, हातापायाच्या कड्या, केस पिंगट, उदास व खिन्न चेहरा, वजनात घट ( कधी कधी सुजेमुळे जास्त ) चामडीवर काळे डाग किंवा फोड, पायावर सुज
सौम्य प्रकार
गंभीर प्रकार
अनेक माता आपले मूल आजारी पडले असतांना किंवा त्याला जुलाब होत असतांना सकस आहार देण्याचे थांबवतात. परिणामी मुलाचा अशक्तपणा अधिकाधिक वाढून ते मृत्युमुखी पडायचा सुद्धा धोका असतो. आजारी मुलांना पोषक आहाराची जास्त गरज असते. तो देण्यासाठी सतत प्रयत्न करायला हवे.
एक वर्षावरील मुल चेहऱ्यावरून व हातापायावरून कितीही मोठे दिसत असले तरीही त्याच्या दंडाच्या मध्यभागी मोजपट्टीने घेतलेला घेर १३ सें.मी. च्या खाली जर घेर असेल तर कुपोषण गंभीर प्रकारचे आहे.
अंगावरच्या दुधाशिवाय इतर कोणतेही अन्न नसणारी मुले कित्येक वेळा दिसायला गुटगुटीत दिसली तरी सुद्धा ती कुपोषणाच्या सीमारेषेवर असतात. जुलाब, किंवा सर्दीचा एखादा सौम्य आजार देखील त्याला कुपोषित करतो. मुल सशक्त आहे की कुपोषित आहे हे समजून घेण्याचा चांगला मार्ग म्हणजे त्यांचे वजन दर महिन्याला घेणे हा होय.
स्त्रोत : पोषण आणि आहार : माहिती व शिक्षण मार्गदर्शक पुस्तिका, वॉटरशेड ऑगनायझेशन ट्रस्ट
अंतिम सुधारित : 6/5/2020
मुले हेच राष्ट्राचे भवितव्य असते. मुलांचे आरोग्य, ...
आई’ म्हटलं की डोळ्यासमोर येतो तो वात्सल्याचा झरा.....
लंडनमधल्या नॅचरल हिस्ट्री म्युझियम मध्ये मानव वंशा...
कुपोषणाच्या समस्येवर मात करण्यासाठी शासनाने गेल्या...