जुनाट मायलोसायटिक ल्यू्केमिया (CML) कोणत्या ही वयोगटाच्यास आणि लिंगाच्या व्याक्तीस प्रभावित करू शकतो पण 10 वर्षांपेक्षा लहान असलेल्या मुलांमध्यें हा असामान्य आहे. हा रोग साधारणपणे 40 ते 60 वर्षे वयाच्या प्रौढांमध्ये विकसित होतो. ह्याचे कारण बहुतेक दोन विशिष्ट गुणसूत्रांमधील पुनःव्यवस्था फिलाडेल्फिया गुणसूत्रात होणे हे आहे. फिलाडेल्फिया गुणसूत्र एका असामान्य एन्झासइमचे (टायरोसिन किनेस) उत्पादन करते, जे पांढर्या रक्तापेशींच्या असामान्य वाढीच्या प्रारूपासाठी जबाबदार असते.
सीएमएलमध्येत, ल्यूकेमिया बहुतेक पेशींची निर्मिती अस्थिमज्जा् मध्येय होते, पण काही प्लीहा आणि यकृतात वाढतात. तीव्र ल्यूककेमियाच्या उलट, ज्यामध्ये अपरिपक्वी पांढर्या रक्तपेशींची फार मोठी संख्या् असते, सीएमएलची जुनाट अवस्था म्हणजे सामान्य् दिसणार्या पांढर्या रक्तपेशी आणि क्वचित प्ले्टलेटसच्या संख्ये्त देखील उल्लेखनीय वाढ होणे. आजाराच्या दरम्यान, जास्तीत जास्त ल्यू्केमिया कोशिका अस्थिमज्जा्मध्ये प्रवेश करतात आणि इतर रक्तचप्रवाहात मिसळून जातात.
ल्यूकेमिया कोशिकांमध्ये आनुषंगिकरीत्या आणखी जास्तत परिवर्तने घडून येतात, तसेच आजार जोम धरतो आणि मग नि:संशय त्याची अवस्था गंभीर संकटपूर्ण होते. ह्या अवस्थेत प्लीहेचा आकार वाढणे सामान्य आहे, तसेच ताप येतो आणि वजन कमी होत जाते. हा रोग जुना व्हाचयच्या आधी, सीएमएल काही ही लक्षणे दर्शविणार नाही असे ही होऊ शकते. तथापि, काही लोकांना थकवा येऊ शकतो, भूक कमी होते, वजन कमी होते ताप येऊ शकतो किंवा रात्रीच्या वेळी घाम येऊ लागतो, तसेच प्लीहेचा आकार वाढल्या मुळे पोट फार भरलेले असल्यामसारखे वाटते. जसजसा रोग अंतिम चरणाकडे जातो, लाल रक्तपेशी आणि प्लेटलेट कमी झाल्यामुळे लोक जास्त आजारी पडतात, त्वोचा फिकट होते, ओरखडे होतात आणि रक्तेस्त्रावदेखील होऊ शकतो.
स्त्रोत : पोर्टल कंटेंट टिम
अंतिम सुधारित : 6/5/2020
तोंडामध्ये आकडे असलेल्या परजीवी कृमीला ‘अंकुशकृमी...
एक किंवा एकापेक्षा अधिक वेळा पातळ अगर पाण्यासारखी ...
महिलांमध्ये त्वचेवर गांधी उठण्याची तक्रार मोठ्या प...
रक्त सगळीकडे पोहोचायचे तर रक्तप्रवाहामध्ये काही दा...