कुपोषणाचे दोन मुख्य प्रकार म्हणजे सर्वांगसूज व रोडपणा. हा अचानक होणारा आजार नव्हे. दीर्घकाळपर्यंत अयोग्य आहार व उपासमार, अपुरे अन्न यांचा परिणाम मुलावर होत राहतो. असे मूल एखाद्या लहानशा आजारानेसुध्दा अचानक कुपोषित दिसू लागते. पोषण-कुपोषणाच्या सीमारेषेवर असणारी मुले जुलाब, गोवर, कांजिण्या इतकेच नव्हे तर साध्या सर्दी-खोकल्यामुळेही कुपोषणाच्या खाईत ढकलली जातात. कुपोषणांचे दोन्ही प्रकार गंभीर असतात. अशी मुले अचानक लहानसहान आजारानेही दगावतात.
सर्वांगसूज झालेले मूल वजनाने ठीक वाटते, पण ती खोटी सूज असते. या मुलांचे स्नायू अशक्त झालेले असतात. मूल उदास व निरुत्साही दिसते. मूल खायला मागत नाही. त्याचे केस पिंगट होतात. सुधारणा लवकर होत नाही.
रोडपणा असेल तर वजन कमी असते, त्त्वचा सुरकुतलेली असते, भूक लागते, मूल चिरचिरे होते. योग्य पोषणाने असे मूल लवकर सुधारते.
या दोन्हीपैकी सर्वांगसूज हा कुपोषणाचा अधिक अवघड व धोक्याचा प्रकार आहे. कारण -
अतिकुपोषित बालकांना आजार होतात किंवा झालेलेच असतात. त्यांना योग्य वैद्यकीय उपचारासाठी डॉक्टरकडे नेले पाहिजे. अशा मुलांना काही दिवस रुग्णालयात दाखल केले तर धोक्यातून बाहेर काढता येते. अशा मुलांना वैद्यकीय उपचारांबरोबरच पोषणोपचार करावे लागतात. यातील काही मुलांना टीबीचा आजार असू शकतो. अशा सर्वच मुलांना बरेच आठवडे निगराणीने उपचार करावे लागतात.
लेखक : डॉ. श्याम अष्टेकर (MBBS, MD community Medicine)
संदर्भ : आरोग्याविद्या
अंतिम सुधारित : 6/5/2020
पुरेसा व योग्य आहार न घेतल्यामुळे जी अशक्तपणाची व ...
मुले हेच राष्ट्राचे भवितव्य असते. मुलांचे आरोग्य, ...
आई’ म्हटलं की डोळ्यासमोर येतो तो वात्सल्याचा झरा.....
लंडनमधल्या नॅचरल हिस्ट्री म्युझियम मध्ये मानव वंशा...