অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

दमा

दमा फुफ्फुसाची एक पुनरावर्ती शोथ-अवस्था (ज्यायमध्ये फुफ्फसांवर सूज येते) आहे ज्यामध्ये काही उत्तेजक हेतु वायुमार्गास सूज येण्यास कारण ठरून त्यांना अस्थायी स्वरूपात संकीर्ण करतात आणि ज्यामुळे श्वास घेण्यास त्रास होऊ लागतो.

दमा

 1. दम्याचा कारणांमध्ये धूम्रपान, अत्तर, पराग कण, माती, धुळीचे कण आणि विषाणु संसर्ग ह्यांचा समावेश होतो.
 2. घरघर, खोकला, श्वतसावरोध, छातीमध्ये अडकल्यासारखे वाटणे, आणि श्वास घेण्यास त्रास होणे ही दम्याची लक्षणे आहेत.
 3. ह्याचे निदान मुलांच्या पुनरावर्ती घरघर होण्यासच्या प्रसंगांवर आणि कुटुंबातील दम्या्च्या इतिहासावर आधारित आहे.
 4. बहुतेक मुलांमधील दमा हा आजार दीर्घकालीन ठरतो.
 5. ट्रिगर्सना (दमा बळावणारे घटक) टाळून दम्यापासून बचाव होऊ शकतो.
 6. ह्या उपचारांमध्ये ब्रोन्कोकडायलेटर्स आणि इन्हेल्डच कॉर्टिको स्टिरियॉइडस् समाविष्ट आहेत.

तथापि कोणत्या् ही वयात दम्यानचा विकास होऊ शकतो, ह्याची सुरूवात बहुतेक मुलांमध्ये विशेषत: वयाच्या पहिल्या 5 वर्षांत होते. काही मुलांमध्ये दमा 5 वर्षे वयाच्या नंतर दिसू लागतो व टिकतो. इतर मुलांमध्ये, दम्याचे विघटन होते. अलिकडील काही दशकांमध्ये दमा हा एक सामान्य रोग ठरला आहे, तसेच वाढला आहे. शहरी मुलांमध्ये 25% ते 40% च्या दराने ह्याची वाढ होत आहे. मुलांमधील दमा हा त्यांच्या रुग्णालयात दाखल होण्याचे आणि प्राथमिक शालेय जीवनांतील गैरहजेरीचे एक प्रमुख असाध्यं कारण आहे. दमा असलेल्याथ काही मुलांना लहानपणीच्या सामान्य गतिविधि करता येतात, फक्त दमा बळावलेला नसतांना. काही मुलांना मध्याम किंवा गंभीर प्रकारचा दमा असतो आणि त्यांेना खेळणे किंवा सामान्यं गतिविधि करण्या साठी रोज बचावात्मिक औषधोपचार घ्यातवा लागतो. काही अज्ञात कारणांमुळे, विशिष्ट प्रकारच्या उत्तेजकांसाठी (ट्रिगर्स) दमाग्रस्तव मुलांची प्रतिक्रिया निरोगी मुलांपेक्षा वेगळी असते. पुष्करसे संभाव्यय उत्तेजक अस्तित्वां त आहेत, आणि पुष्कीळशी मुले त्यांतपैकी काहींनाच प्रतिसाद देतात. काही मुलांच्याय बाबतीत, उत्तेजकांना प्रोत्सापहन कशाने मिळते ह्याची ओळख पटलेली नाही.
ह्या सर्व ट्रिगर्सचा (कारणांचा) परिणाम एकसारखाच असतो. काही विशिष्टा कोशिका वायुमार्गात रासायनिक पदार्थ स्त्रंवतात. हे पदार्थ वायुमार्गात सूज येण्याास कारण ठरतात आणि स्नायु कोशिकांच्यार भि‍त्तिकेतील वायुमार्गास आकुंचन पावण्याणस उत्तेजन देतात. ह्या पदार्थांच्या‍ निरंतर होणार्‍या स्त्रागवामुळे वायुमार्गात श्लेष्माद जास्तय प्रमाणात तयार होतो, ज्या्ने वायुमार्गाच्या अस्तभराच्या स्वगरूपात असलेल्याम कोशिका झडतात, आणि ह्यामुळे वायुमार्गातील भित्तिका प्रसार पावतात. ह्यांतील प्रत्येयक प्रतिक्रिया वायुमार्गाचे आकस्मिक आकुंचन (दम्याचा अटॅक) होण्यामध्येस आपला वाटा उचलते. बहुतेक मुलांच्याम बाबतीत, दम्यानच्या् अटॅकच्या दरम्यान वायुमार्ग सामान्य होतो.

दम्यानची सामान्य कारणे

कारणे

उदाहरणे

ऍलर्जी घटक

धूळ किंवा कीड, बुरशी, बाहेरील परागकण, पशुंचे शेण, झुरळांची विष्‍ठा आणि पंख

व्‍यायाम

थंड हवेशी संपर्क

संसर्ग

श्‍वसनसंबंधी व्‍हायरस व सामान्‍य सर्दी-पडसे

कारक

तंबाखूचा थेट किंवा अप्रत्‍यक्ष धूर, अत्तरे, लाकडाचा धूर, स्‍वच्‍छता उत्‍पाद, सुगंधी मेणबत्त्या, बाहेरील वायू प्रदूषण, उग्र वास आणि चीड आणणार्‍या झळा

इतर

संवेदना/भावनातिरेक (जसे भीति, राग आणि उत्‍सुकता), ऍस्पिरीन आणि गॅस्‍ट्रोएसोफेगल रीफ्लक्‍स

तुम्हांला माहित होते काय ? -धुळीच्या. एका डागात - कीडीचे 40000 कण असू शकतात, जे दम्याचे मुख्यि ट्रिगर ठरू शकतात.

जोखमीचे कारक

काही मुलांना दमा कां होतो हे चिकीत्सकांना पूर्णपणे माहित नाही, तरी ही पुष्ककळशा जोखीम कारकांची ओळख पटलेली आहे.

 • दोघांपैकी एका पालकास (आई किंवा वडिलांस) दमा असल्या्स, मुलामध्ये दमा विकसित होण्याची जोखिम 25% आहे. जर आई-वडील दोघांस दमा असेल तर मुलास दमा होण्या्ची जोखिम 50% वाढते.
 • ज्या‍ मातांनी गरोदरपणी धूम्रपान केले असेल त्यांच्या मुलांना दमा होण्याची शक्यता जास्त बळावते.
 • दम्याचा संबंध आईशी संबंधित असलेल्या् इतर घटकांशी देखील जोडला जातो, जसे कमी वयातील मातृत्वध, कुपोषित गरोदरपण, आणि स्तनपानाचा अभाव.
 • वेळेपूर्वी जन्म आणि जन्माच्यावेळी असलेले कमी वजन देखील जोखीम कारक आहे.
 • शहरी वातावरणात, मुलांना दमा होण्यादची शक्यपता जास्त असते, विशेषत: जर ती मुले निम्ना सामाजिक-आर्थिक वर्गातील असतील तर त्यांकना दमा होण्यातची जास्त शक्यता असते. जरी ह्या बाबतीत पूर्णपणे काही ही समजून आलेले नसले तरी ही गरीबीमध्ये राहणे, दम्याच्या कारकांच्या संपर्कात येणे आणि आरोग्यत संगोपनाकडे एकूण दुर्लक्ष केले जाणे ही सर्व कारणे ह्या वर्गात दम्याचे प्रमाण जास्त असण्यास कारण ठरतात.
 • डस्ट माइटस् (धूळ कीड) किंवा झुरळांची विष्ठा यांसारख्या उच्चण सांद्रण कारकांच्यान संपर्कात राहणारी मुले लहानपणीच दमाग्रस्तय होण्याची शक्याता आहे.
 • लहानपणीच ब्रॉन्का यटिस झालेली मुलांची बहुतेक विषाणु संसर्गामुळे सारखी दमछाक होत असते. श्वा‍सातील ही घरघर सुरूवातीला दमा म्हाणविली जाऊ शकते पण मोठे पणी ह्या मुलांना दमा होतोच असे नाही.

लक्षण

 • दम्यालचा झाटका आल्या वर वायुमार्ग संकुचित होतो आणि मुलास श्वास घेण्याकस त्रास होऊ लागतो, विशिष्ट स्वमरूपात छातीमध्ये ताण पडतो आणि खोकला येतो आणि घरघर होऊ लागते.
 • असे मूल श्वागस घेत असतांना घरघर फार मोठ्याने ऐकू येते.
 • दम्याच्या सर्वच झटक्यां मध्ये. घरघर ऐकू येतेच असे नाही, तथापि, सौम्य दमा, विशेषत: अगदी लहान मुलांना असल्या‍स, परिणामी फक्त खोकला येऊ शकतो. काही मोठ्या वयाच्याच मुलांना सौम्या दम्यामच्यां दरम्या न फक्तय थंड हवेच्या संपर्कात आल्यावर किंवा व्यांयाम करतांना खोकला येतो. तसेच, अत्यंत गंभीर दमा असलेली मुले श्वास घेतांना घरघर ऐकू येत नाही कारण त्यां च्याघ वायुमार्गात तेवढा आवाज करण्या्साठी देखील हवा नसते. दम्याणच्यां गंभीर झटक्यागत, श्वाघस घेणे अत्यंणत कठिण झाल्या्चे स्पेष्टे दिसून येते.
 • बहुतेक वेळा घरघर जोरात ऐकू येते, मूल जोराने श्वास घेऊ लागते आणि त्याचत त्याबला फार कष्टत पडतात आणि मूल श्वाजस घेत असतांना त्याच्याव बरगड्या दिसतात.
 • गंभीर झटक्यांच्या दरम्यान, मूल श्वास घेण्यासाठी तडफडते आणि पुढे वाकून बसते. त्वरचा घामट आणि फिकट किंवा निळसर झाक असलेली होते.
 • वारंवार गंभीर झटके येत असल्या स मुलाची वाढ खुंटते, पण मोठे होत जातांना त्यांाच्याट वाढीचा दर आपोआपच वाढतो.

निदान

 • कुटुंबात दम्या्चा किंवा ऍलर्जीचा इतिहास असल्यालस मूल घरघर करून श्वातस घेण्याटचे प्रमाण वाढल्यांस डॉक्टर मुलास दमा असल्याची शंका व्यक्त करतो.
 • चिकीत्सक बहुतेक क्ष-किरण (एक्स‍-रे) करण्यास सांगतात आणि काही वेळा ते कारण शोधण्या साठी ऍलर्जी परीक्षण करण्या‍सा सांगतात.
 • वारंवार घरघर करून श्वास लागल्यास सिस्टिक फायब्रोसिस किंवा गॅस्ट्रो ऍसोफेगल रीफ्लक्सव सारख्या इतर विकारांसाठी मुलांचे परीक्षण करायला हवे.
 • क्वयचित मोठ्या मुलांचे पल्मअनरी फंक्श न टेस्टा (PFT) करावे लागते, तरी ही बहुतेक मुलांच्या बाबतीत, फ्लेअर-अपच्या दरम्या नसुध्दाक पल्म नरी फंक्शवन सामान्यत असते.
 • मोठी किंवा किशोरावस्थेततील दमा असलेली मुले बहुतेक एक पीक फ्लो मीटर (एखादी व्याक्ती किती जोराने हवा फुंकू शकते हे दाखविणारे एक लहान यंत्र) वापरतात ज्याययोगे वायुमार्गातील अवरोधाचे मोजमाप करता येते. चिकीत्सक आणि आई-वडील ह्या यंत्राचा वापर झटक्यावच्या दरम्यालन किंवा त्यासमधील काळात करू शकतात. दमा असलेल्या मुलांच्या बाबतीत झटक्यादच्यान दरम्यान क्ष-किरण करीत नाहीत जोपर्यंत चिकीत्सकाला न्युमोनिया किंवा कोलॅप्ड्ब लंग (फुफ्फुस निकामी होणे) ची शंका येत नाही.

प्रतिबंध

 • दमा असलेल्‍या बहुतेक मुलांची अवस्था बिकट होत जाते. जास्तू गंभीर आजार असलेल्या मुलांना मोठेपणी दमा होण्या्ची शक्यता जास्त असते. सातत्य आणि पुन:पतनासाठी असलेल्या जोखीम घटकांमध्ये सेक्स, धूम्रपान, लहानपणी दमा होणे आणि घरगुती धुळीची संवेदनशीलता ह्याचा समावेश होतो.
 • मुलास दम्याचा झटका येण्यालचे कारण असलेल्यास घटकांना टाळून बचाव करता येऊ शकतो. अशा प्रकारची ऍलर्जी असलेल्या मुलाच्या आई-वडिलांस पिसांच्या उशा, गालिचे, पडदे, गाद्या लावलेले लाकडी सामान, स्टफ्ड खेळणी आणि धूळ-कीडीचे इतर संभाव्यो स्त्रोत मुलाच्या खोलीपासून दूर ठेवावेत.
 • सिगरेटचा धूर दमा असलेल्याध मुलांसाठी अत्यंत घातक ठरतो, म्हणून मूल असलेल्या जागेपासून धूम्रपान कटाक्षाने दूर ठेवावे.
 • जर एखादा कारक घटक टाळणे शक्यं नसले तर, चिकीत्सका कडुन मुलास डी-सेंसेटाइझ करविण्याघसाठी ऍलर्जी विरोधी शॉटस् घ्यावेत, तथापि, ह्या ऍलर्जी प्रतिरोधक शॉटस् बाबत खात्रीलायक काही ही सांगता येत नाही.
 • व्यायाम हा मुलांच्या‍ वाढीसाठी अत्यंत महत्वपूर्ण असल्या ने चिकीत्सक सामान्यापणे मुलांना शारीरिक क्रियाकलाप, व्यावयाम आणि खेळांमध्ये सहभाग घेण्यास सांगतात आणि गरज वाटल्यालस व्यायामाच्या आधी दम्याचे औषध ताबडतोब घेण्यासस सांगतात.

चिकित्सा

गंभीर झटक्या च्याउपचारात समावेश होतो
- वायुमार्गातील अवरोध काढणे
सूज थांबविणे

 • पुष्क ळशी नाकाने ओढण्यामची औषधे (इन्हेइलर्स) श्वबसनमार्ग उघडतात. मोठी किंवा किशोरावस्थे तील मुले बहुतेक मीटर्ड डोस इनहेलरचा वापर करून औषधे घेऊ शकतात. 8 वर्षांपेक्षा लहान मुलांना होल्डिंग चेंबर जोडलेले इनहेलर वापरणे सोपे वाटते.
 • तान्हीं किंवा अगदी लहान मुले क्वाचित त्यां च्याग मापाचा मास्के जोडलेल्या एखाद्या इनहेलरचा वापर करू शकतात. जे ह्याचा वापर करू शकत नाहीत ते घरीच नेब्युचलायझरला जोडलेल्याह इनहेलिंग (नाकावाटे घ्यातयची औषधे) औषधांचा वापर करू शकतात, हे एक लहानसे उपकरण असते ज्यामध्ये हवेच्या दाबाचा उपयोग करून नाकावाटे औषधांची वाफ दिली जाते. इनहेलर्स आणि नेब्युेलायझर्स दोन्ही ही अत्यंत उपयोगी असतात आणि त्यां चा वापर तोंडावाटे करता येतो, तरी पण हा मार्ग इनहेलिंगपेक्षा कमी प्रभावी आहे आणि सामान्य पणे नेब्युलायझरचा वापर करीत नसलेल्याप तान्ह्या मुलांसाठी ह्याचा वापर करतात. संयमित गंभीर झटके येणार्‍या मुलांना तोंडावाटे कॉर्टिकॉस्टिरिऑइडस् दिली जाऊ शकतात.
 • गंभीर झटके येणार्‍या मुलांना रुग्णालयात नेब्युलायझरमध्ये. ब्रॉनकोडायलेटर्स घालून दिली जातात किंवा सुरूवातीला कमीत कमी प्रत्येलक 20 मिनिटांत इनहेलर देतात. क्वंचित प्रसंगी चिकीत्सक गंभीर झटके येणार्‍या मुलांना इनहेलर प्रभावी न ठरल्यास एपिनेफ्रिन इंजेक्शंन (एक ब्रॉनकोडायलेटर) देतात. गंभीर झटके येणार्‍या मुलांना चिकीत्सक साधारणपणे कॉर्टिकॉस्टिरिऑइडस् शिरेद्वारे देतात.
 • सौम्यु, क्वाचितच झटके येणार्‍या मुले फक्त् झटक्या च्या दरम्यानच औषधे घेतात. जास्त सातत्या्ने आणि गंभीर झटके येत असलेल्या मुलांनी झटके येत नसतांना देखील औषधे घ्यायला हवीत. झटक्यायची गंभीरता आणि सातत्यावर अवलंबून विविध औषधे दिली जातात. वारंवार आणि गंभीर झटके येत नसलेल्याभ मुलांना दररोज एखाद्या कॉर्टिकॉस्टिरिऑइडचा सौम्या डोस दिला तरीसुध्दा् त्यांचा बचाव होऊ शकतो. ही औषधे वायुमार्गातील सूज येण्या‍स कारण असलेल्याय रासायनिक पदार्थाचे निष्पाकदन रोखून वायुमार्गात सूज येऊ देत नाहीत.
 • गंभीर झटके आणि दम्या‍च्यास लक्षणांचा प्रतिरोध करण्याइसाठी औषधाच्या डोसचे प्रमाण कमी जास्तण करण्यायत येते. जर ह्या औषधांनी झटके रोखले जाऊ शकत नसतील तर मुलांना तोंडावाटे कॉर्टिकॉस्टिरिऑइड देतात. व्याऔयामाच्या दरम्यातन झटके येत असलेली मुले व्यातयामाच्यास आधी ब्रॉनकोडायलेटरचा डोस इनहेल करतात म्हजणजे नाकावाटे ओढतात.
 • दमा विविध उपचार पध्द ती असलेली एक दीर्घकालीन अवस्थाट असल्यांमुळे चिकीत्सक मुलांशी आणि त्यांच्या आई-वडिलांशी त्यांनी परिस्थिति नीट समजून घेतली असल्याची खात्री करून घेतात.
 • आई-वडिलांनी आणि चिकीत्सकांनी मुलाच्या अवस्थेबाबत शाळेच्या शिक्षकांना मूल आणि त्या-च्याण औषधोपचाराची सूचना द्यावी. काही मुलांना शाहेत गरज पडल्यास इनहेलर वापरायची परवानगी देण्यात यायला हवी, आणि इतर मुलांकडे शाळेच्या चिकीत्सकाने लक्ष द्यावे.

 

स्त्रोत : पोर्टल कंटेंट टिम

अंतिम सुधारित : 8/20/2020© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate