आपल्या देशात बालमृत्यूंचे प्रमाण हजारी 60 इतके जास्त आहे. यात निम्मे अर्भकमृत्यू असतात. जन्मताना पुरेशी काळजी न घेणे, बाळाची ऊब कमी होणे, जंतूदोष-पू, न्यूमोनिया हे अर्भकाचे प्रमुख आजार आहेत. याने अनेक बाळे दगावतात.
दात येण्यासंबंधी त्रास, तोंड येणे, उलटया, हगवण, अतिसार, पोटात कळ, कावीळ, जंत, विषमज्वर, माती खाणे, मळाचे खडे होणे, विषबाधा (रॉकेल, इ.)
सर्दी, ऍडेनोग्रंथी वाढ, टॉन्सिल्स-सूज, घसासूज, सायनससूज, श्वासनलिकादाह, न्यूमोनिया, क्षय, जंत-खोकला, बाळदमा, इत्यादी.
या वर्गीकरणात लहान मुलांचे बहुतेक आजार तक्रारींची नोंद केलेली आहे. याच प्रकरणात शेवटी लहान मुलांच्या आजारांच्या काही प्रमुख लक्षणांसंबंधी तक्ते व मार्गदर्शन दिले आहे (ताप, खोकला, उलटी, खूप रडणे, इ.). याशिवाय बहुतेक आजारांची चर्चा संबंधित शरीरसंस्थेच्या प्रकरणात केली आहे. शरीरसंस्थेच्या विभागणीत न बसणारे काही आजार या भागात दिले आहेत. या वर्गीकरणावरून असे दिसते की मुलांमध्ये पचनसंथा, श्वसनसंस्था व त्वचा यासंबंधीचे आजार व तक्रारी जास्तीत जास्त आढळतात. त्यातही जंतुदोष, जंत, इत्यादी कारणांमुळे होणारे आजार जास्त आढळतात. मोठया माणसांपेक्षा मुलांमध्ये आजारांचे प्रमाण तसे जास्त असते आणि मृत्यूचे प्रमाणही जास्त आढळते. आपल्या देशात लहान मुलांच्या आजारांमध्ये सर्वप्रथम अतिसार आणि न्यूमोनिया गटांचे आजार येतात. या दोन्हीही आजारांवर परिणामकारक उपाययोजना होऊ शकते. यामुळे बालमृत्यूचे प्रमाण घटू शकेल.
लेखक : डॉ. श्याम अष्टेकर
(MBBS, MD community Medicine)
संदर्भ : आरोग्याविद्या
अंतिम सुधारित : 10/7/2020
योनिद्वारे रक्तस्रावाची कारणे अनेक आहेत. त्यांचे य...
एक किंवा एकापेक्षा अधिक वेळा पातळ अगर पाण्यासारखी ...
अतिसाराबाबतच्या माहितीचा प्रसार करणे व तिची अंमलबज...
प्रत्येकच रोग सर्वानाच होतो असं नाही परंतु बहुतांश...