(2) विंचूदंश: दंशाच्या जागी पोटॅशियम परमँगनेट दाबणे व लिंबू पिळणे. तुरटी भाजून लावणे, लिग्नोकेन इंजेक्शन देणे.
(3) जखमा: रक्तस्राव थांबवणे (दाब किंवा चिमटा), जखमा शिवणे, बांधणे.(4) अस्थिभंग : अस्थिभंग बांधून स्थिर करणे.
5) विद्युत धक्क्याने हृदयविकार झटका: कृत्रिम हृदयक्रिया (दाब देणे), कृत्रिम श्वसन (तोंडाने किंवा छातीवर दाब देऊन). 6) बुडणे: छातीवर दाब देऊन पाणी बाहेर काढणे, घशातून द्राव काढणे (सक्शन),कृत्रिम श्वसन व हृदयक्रिया.(7) पोटात विषारी पदार्थ जाणे: उलटी करवणे (मिठाचे पाणी पाजणे, घशात बोटे घालणे) कीटकनाशके असल्यास शिरेतून चार-पाच ऍट्रोपीन इंजेक्शने देणे.
8) शोष: (अतिसार), भाजणे, उष्माघात: जलसंजीवनी देणे, शिरेतून सलाईन देणे.(9) खूप ताप चढणे: कोमट पाण्याने अंग पुसून ताप उतरवणे.
(10) बाळंतपण: नाळ बांधणे व कापणे, बाळाचा श्वसनमार्ग साफ करणे, रक्तस्राव आपोआप थांबत नसल्यास गर्भाशयचोळून, दाबून व मेथर्जिन इंजेक्शन देणे, स्वच्छ कपडा व हाताची मूठ वापरून गर्भाशय दाबणे व रक्तस्राव थांबवणे.गुदद्वारात प्रोस्टाग्लॅडिनची गोळी बसवून द्यावी.
लेखक : डॉ. श्याम अष्टेकर (MBBS, MD community Medicine)
संदर्भ : आरोग्यविद्या
अंतिम सुधारित : 6/5/2020
अचानक जर कापले किंवा खरचटले तर काय प्रथमोपचार कराव...
अन्नामध्ये काही काही वेळा जंतूंमुळे विष तयार होते,...
प्रत्येक अपघातात होणारी शारीरिक इजा कमीअधिक प्रमाण...
कोणी जख्मी झाले किंवा अचानक अजारी पडले, अशा संकटक...