हे ओळखणे सोपे असते कारण अशी व्यक्ती विजेच्या खांबाजवळ किंवा उपकरणाजवळ बेशुद्ध पडलेली असते.
प्रथमोपचार
- ज्या माणसाला शॉक बसला आहे तो जर अजूनही विजेच्या संपर्कात असेल तर त्याला अजिबात स्पर्श करायला जाऊ नका.
- ह्या व्यक्तीस हात लावण्याआधी वीज बंद करा तसे करणे शक्य नसेल तर एका जाड आणि पूर्ण कोरड्या दोरखंडाच्या सहय्याने त्या व्यक्तीला ओढून घ्यावे
- तिचा श्वास चालू असल्यास तिला विशिष्ट स्थितीत झोपवा
- श्वास थांबला असल्यास छाती चोळा आणि कृत्रिम श्वसन द्या.
- इतर काही दुस-या प्रकारे श्वास देण्यापेक्षा तोंडावाटे हवा भरणे हा सर्वमान्य प्रकार आहे.
- डॉक्टरांना बोलवा
तोंडावाटे श्वास कसा देतात?
- पाण्यातून बाहेर काढलेल्या व्यक्तीला पालथे झोपवा. त्याच्या गळ्याभोवती, छातीपाशी किंवा कमरेपाशी काही घट्ट कपडे असतील तर ते सैल करा.
- हनुवटी वर उचला आणि वरच्या बाजूनी डोके जितके मागे करता येईल तितके करा. (असे करण्यामुळे श्वासनलिकेतून फुफ्फुसात जाणारा मार्ग मोकळा होतो.)
- अकृतीत दाखविल्याप्रमाणे तुमच्या बोटांच्या सहय्यने त्या व्यक्तीच्या नाकपुड्या बंद करा. म्हणजे श्वासनलिकेतून पाणी आत जाणे बंद होईल.
- तुमचे तोंड त्या व्यक्तीच्या तोंडावर दाबून ठेऊन जमेल तितक्या जोरात हवा आत सोडा.
- तुमचे तोंड बाजूला घेऊन त्या व्यक्तीला श्वास घेण्यास प्रयत्न करण्यासाठी आणि फुफ्फुसापर्यन्त हवा जाण्यासाठी मोकळी हवा मिळू द्या.
- असे दर ५ - ६ सेकंदांनी करा.
- त्या व्यक्तीचा श्वासोच्छ्वास आणि ह्रदयाचे ठोके नीट सुरू होई पर्यन्त ही प्रक्रीया चालू ठेवा. ही प्रक्रीया कधी कधी पाच मिनिटात संपू शकते, तर कधी कधी त्याला एक तास सुद्धा जाऊ शकतो.
- हे करण्यानी तुम्ही दमून जाल तेव्हा तिस-या व्यक्तीची मदत घ्या.
- त्या व्यक्तीच्या घशात किंवा तोंडात पाणी गेले आहे असे आपल्याला आढळल्यास त्याला कुशीवर वळवावे आणि पाणी तोंडावाटे बाहेर जाईल असे बघावे.
- त्या व्यक्तीचे तोंड फडक्याने आतून पुसून घ्यावे. (शुद्ध हरपलेली व्यक्ती कधीच चावत नाही.)
- जर तुम्ही तोंडाला तोंड लावून पाणी काढण्यास तयार नसाल तर दोन तोंडांच्या मधे रुमाल ठेवा. परंतु ही प्रक्रीया तोंडाला तोंड लावून पाणी काढण्याइतकी प्रभावी नक्कीच नाही.
- जेव्हा तुमच्या खात्रीने लक्षात येईल की ती व्यक्ती थोडा थोडा श्वास घ्यायला लागली आहे, आणि ह्रदयाचे ठोके सुद्धा नीट ऐकू येत आहेत तेव्हाच कृत्रीम श्वासोच्छ्वास बंद करा. तसेच छातीच्या डाव्याबाजूला कान लाऊन व्यवस्थित ठोके ऐका.
- पाण्यातून बाहेर काढलेली व्यक्ती आता जर ठीक झाली असेल तर त्याला ऊबेत ठेवा. गार हवा लागू देऊ नका. डॉक्टर येईपर्यन्त, निदान अर्ध्या तासापुरते - हलू देऊ नका.
स्त्रोत : पोर्टल कंटेंट टिम् / मराठी आरोग्य डॉट कॉम
अंतिम सुधारित : 6/5/2020
0 रेटिंग्स आणि 0 टिप्पण्या
तार्यांवर रोल करा, नंतर दर क्लिक करा.
© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.