অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

मानसिक आरोग्या बाबत जागरूकता

मानसिक आरोग्य म्हणजे काय?

देशाच्या विकासासाठी आपले आरोग्य फार गरजेचे आहे. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (WHO) ने आरोग्याची परिभाषा अशी दिली आहे, “शारीरिक, मानसिक, सामाजिक आणि आध्यात्मिक स्वस्थता असणे आणि फक्त आजार किंवा दौर्बल्याचा अभाव नाही.” वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (WHO) ने मानसिक आरोग्याची परिभाषा अशी दिली आहे, “मानसिक स्वस्थता ज्यामध्ये एखाद्या व्यक्तीला स्वतःच्या क्षमतेचा अनुभव येतो, ती जीवनातले सर्वसामान्य ताणतणाव सांभाळू शकते, उत्पादक काम करू शकते आणि समाजाला योगदान देऊ शकते”. या निर्णायक तात्पर्याने असे म्हणता येईल की मानसिक आरोग्य हे व्यक्तीच्या स्वस्थतेची आणि सामाजिक प्रभावी कार्यासाठी संस्थापना आहे.

मानसिक आरोग्याचे प्रभाव ह्यांवर दिसतात -

  • शैक्षणिक निकाल
  • उत्पादनक्षमता
  • सकारात्मक व्यक्तिगत संबंधाचा विकास
  • गुन्हेगारीचे दर
  • मद्य आणि अमली पदार्थाचे वाईट उपयोग / व्यसन

मानसिक आरोग्य का महत्त्वाचे आहे?

४५०० लाख पेक्षा जास्त लोक मानसिक विकाराचा शिकार आहेत. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (WHO) नुसार, २०२० साली औदासीन्य (depression) चा दबाव पूर्ण जगात दुस-या क्रमांकावर असेल. (मरे आणि लोपेज, १९९६). मानसिक आरोग्याचा जागतिक दबाव हे विकसित आणि विकास होणा-या देशाच्या उपचारा क्षमता पेक्षा जास्त असेल. मानसिक विकाराच्या वाढत्या भाराशी संबंधित सामाजिक व आर्थिक खर्चा मुळे मानसिक आरोग्याचा प्रचार करण्यास आणि पायबंद व उपचार करण्यास केंद्रित झाले. म्हणून, मानसिक आरोग्य वर्तणुकीवर अवलंबून आहे, आणि शारीरिक आरोग्य व जीवनाच्या दर्जासाठी प्रामुख्याने आवश्यक आहे.

  • शारीरिक आणि मानसिक आरोग्याचा फार जवळचा संबंध आहे. आणि हे निःसंदिग्धपणे सिद्ध झाले आहे की औदासीन्यामुळे ह्रदयरोग व नाडी संबंधित रोग होऊ शकतात.
  • मानसिक विकारांचा परिणाम एखाद्या व्यक्तीच्या दररोजच्या बाबींवर होऊ शकतो, उदा. व्यवस्थित जेवणे, नियमित व्यायाम, पुरेशी झोप, सुरक्षित लैंगिक संबंध ठेवणे, मद्य आणि तंबाखूचे सेवन न करणे, औषधोपचार नियमित घेणे इ. ह्यांचा शारीरिक आरोग्यावर प्रभाव पडू शकतो.
  • मानसिक विकारांमुळे सामाजिक समस्या वाढू शकतात, उदा. बेरोजगारी, विस्कळित कुटुंब, गरिबी, अमली पदार्थाचे व्यसन आणि त्याच्याशी संबंधित गैरकृत्ये इ.
  • कमजोर मानसिक आरोग्यामुळे आपल्या रोगप्रतिकारक क्षमतेच्या कार्यावर मोठा प्रभाव पडू शकतो.
  • औदासीन्य असलेल्या रुग्णांना, औदासीन्य नसते अशा रुग्णांपेक्षा जास्त त्रास होतो.
  • मधुमेह, कर्करोग, ह्रदय रोग असल्याने औदासीन्याचे धोके वाढू शकताता.

अंमलबजावणी करण्यातकाय अडचण आहे?

मानसिक विकाराशी संबंधित कलंकांमुळे समाजात त्या लोकांवर सर्व विषयात भेदभाव केले जाते उदा. शिक्षण, रोजगार, विवाह, इ. यामुळे असे लोक औषधोपचार घेण्यास वेळ लावतात. संदिग्धता आणि निश्चित लक्षणे नसल्याने मानसिक आरोग्य व विकाराचा निदान करणे कठीण आहे.

  • लोकांना असे वाटते की मानसिक विकार हे अशा व्यक्तींना होतात ज्या मानसिक रीतीने कमजोर असतात किंवा भूत बाधित असतात.
  • खूप लोकांचे असे मत आहे की मानसिक विकार अपरिवर्तनीय आहे आणि त्यावर उपचार करण्यात काही अर्थ नाही.
  • खूप लोक असे मानतात की प्रतिबंध करणारे उपचार सफल होण्याची शक्यता कमी असते.
  • खूप लोकांचा असा विश्वास आहे की मानसिक विकाराच्या उपचारात वापरली जाणारी औषध घेतल्याने बरेच दुष्परिणाम आहेत ज्याने व्यसन होऊ शकतो आणि त्यांना ही औषधे फक्त झोप येण्यासाठी दिली जाते.
  • वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (WHO) ने गोळा केलेल्या माहितीनुसार, मानसिक आरोग्याचे जागतिक दबाव आणि संबंधित देशात उपलब्ध प्रतिबंधात्मक व उपचारा क्षमता या दोन्ही मध्ये फार अंतर आहे.
  • जगाच्या बहुतेक भागांमध्ये, अगदी अलिकडच्या काळापर्यंत, मानसिक आरोग्यासंबंधीच्या उपचारांचा इतर औषधोपचारांशी काहीही संबंध नव्हता.
  • मनोविकारी व्यक्ती आणि त्यांचे परिवार, गंभीर सामाजिक कलंक लागण्याच्या भीतीने आणि आपल्या हक्काची जाणीव नसल्यामुळे, एकत्र येत नाहीत आणि त्यामुळे दबाव गटासारखे वागू शकत नाहीत.
  • स्वयंसेवी संस्था (N.G.O.s) सुद्धा याला एक खूप कठीण काम मानतात कारण या कामाला चिकाटी लागते. आणि मनोरुग्णांसोबत काम करण्यास काही लोक घाबरतात.

मानसिक विकार कशामुळे होतो?

जैविक कारणे:

  • तंत्रिक प्रेषक ( न्यूरो ट्रांसमिटर्स):मानसिक विकाराचा संबंध आपल्या मेंदू मध्ये असलेल्या खास रसायनांच्या ज्याला तंत्रिका प्रेषक ( न्यूरो ट्रांसमिटर्स) म्हणतात यांच्या असंतुलनाशी आहे. तंत्रिक प्रेषक आपल्या मेंदूच्या पेशींना एकमेकांशी संपर्क साधण्यास मदत करतात. जर ह्या रसायनांचे संतुलन बिघडले किंवा व्यवस्थित काम केले नाही तर, मेंदूतून संदेश बरोबर पार होणार नाही, ज्याने मानसिक विकाराची लक्षणे दिसतात.
  • आनुवंशिकता (हेरिडिटी): बरेच मानसिक विकार परिवारात अनुवंशिक असतात. असे म्हणता येईल की ज्या व्यक्तीच्या परिवारातील एखाद्या व्यक्तीला मानसिक विकार असेल तर त्या व्यक्तीलाही मानसिक विकार होण्याची जास्त शक्यता आहे. अशी शक्यता जनुकांमुळे पार होते. विशेषज्ञ असे मानतात की मानसिक विकाराचा संबंध जनुकांमधील अनियमिततेशी आहे – पण फक्त एखाद्या जनुकाशी नाही. म्हणून एखादी व्यक्ती मानसिक विकाराबाबत अतिसंवेदनशील असली तरी तिला मानसिक विकार होईलच असे नाही. मानसिक विकार हे विविध जनुकांच्या अन्योन्यक्रियेने (interaction) तसेच इतर घटकांमुळे होतात उदा. तणाव, वाईट गोष्ट घडणे, किंवा धक्कादायक घटना होणे. ह्याने एखाद्या अतिसंवेदनशील व्यक्तीवर मानसिक विकाराचा प्रभाव पडू शकतो किंवा सक्रिय होऊ शकतो.
  • संसर्ग: काही संसर्ग असे आहेत की जे आपल्या मेंदूला नुकसान पोहोचवू शकतात आणि मानसिक विकार विकसित होऊ शकतो किंवा त्याची लक्षणे आणखी बिघडू शकतात. उदा. स्ट्रेपटोकोकस जीवाणूने होणारे पेडिऍट्रिक ऑटोइम्यून न्यूरोसायकिऍट्रीक डिसऑर्डर (PANDA) नावाच्या एखाद्या स्थिती मुळे लहान मुलांमध्ये ऑब्सेसिव- कंपल्सिव डिसऑर्डर (बळजबरीचा एक प्रकार) आणि इतर मानसिक विकार होऊ शकतात.
  • मेंदूत दोष किंवा इजा होणे:मेंदूत दोष किंवा मेंदूच्या काही भागास इजा होण्याचा संबंध मानसिक विकारांशी असू शकतो.

राष्ट्रीय मानसिक आरोग्य धोरणाचा संबंध फक्त मानसिक विकाराशी नाही तर मानसिक आरोग्याचा सर्वसमावेशक प्रचार आणि जागरूकतेशीदेखील असणे आवश्यक आहे. या मध्ये मानसिक आरोग्याला मुख्य प्रवाहात आणणे आणि सरकारी धोरण व कार्यक्रमांमध्ये तसेच व्यावसायिक क्षेत्रांत सामील करणे उदा. शिक्षण, मजुरी, न्याय, परिवहन, पर्यावरण, घरबांधणी, कल्याण आणि आरोग्य.

वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (WHO) चा प्रतिसाद ?

वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (WHO) ने मानसिक आरोग्य मजबूत करण्यास व प्रचार करण्यास सरकारांना पाठिंबा दिला आहे. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (WHO) ने मानसिक आरोग्य प्रचार करण्यासाठी प्रमाणाचे मूल्यांकन केलेले आहे. आणि ज्ञान पसरवण्यास व प्रभावशाली योजना धोरण आणि योजनेत सामील करण्यास शासनाबरोबर काम करत आहे. बालपणाच्या सुरूवातीला अंमलबजावणी करणे (उदा. गरोदर महिलांना घरी जाऊन भेटणे, शाळेत जाण्याआधीच्या मुलांसाठी मानसिक व सामाजिक कार्यक्रम, प्रतिकूल परिस्थितीत असणा-या लोकांना संयुक्त पोषक आणि मानसिक व सामाजिक मदत.)

  • लहान मुलांना मदत (उदा. कौशल्य विकास कार्यक्रम, बाल व किशोर विकास कार्यक्रम)
  • महिलांना सामाजिक व आर्थिक अधिकार प्रदान करणे (उदा. शिक्षण व सूक्ष्म-पतपुरवठा योजना)
  • वृद्ध लोकांना सामाजिक आधार देणे (उदा. मैत्रीपूर्ण वातावरणाची निर्मिती, समाज व वृद्धांचे दिवसाचे कार्यक्रम केंद)
  • कमजोर गटांना लक्षात ठेऊन कार्यक्रम करणे, अल्पसंख्यांक गट, स्थानिक नागरिक, भटके आणि संघर्ष व दुर्घटना ग्रस्त लोक (उदा. दुर्घटनेनंतर मानसिक व सामाजिक मदत करणे)
  • शाळेत मानसिक आरोग्य प्रचार करण्याचे कार्यक्रम (उदा. शाळेत व लहान मुलांयोग्य शाळेत पारिस्थितिनुरूप बदलासाठी कार्यक्रम)
  • कार्यस्थळी मानसिक आरोग्यासाठी कार्य करणे (उदा. तणाव रोकथाम करण्याचे कार्यक्रम)
  • गृह धोरण (उदा. गृह सुधारणा)
  • हिंसा प्रतिबंधक कार्यक्रम (उदा. सामुदायिक गस्त घालण्याचे प्रस्ताव); आणि समाज विकास कार्यक्रम (उदा. ‘काळजी घेणारे समाज’ ह्यासारखे प्रस्ताव, एकात्मिक ग्रामीण विकास)
स्त्रोत : पोर्टल कंटेंट टिम

अंतिम सुधारित : 6/5/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate