घनकच-यामध्ये ओला कचरा, सुका जैविक कचरा व अजैविक म्हणजे न कुजणारा कचरा असे तीन घटक असतात. यापैकी जैविक ओला व सुका कचरा कंपोस्ट करून (कुजवून) झाडांसाठी वापरता येतो. अजैविक कच-यात अनेक घटक आहेत - काच,पत्रा, प्लॅस्टिक इ. यांची वेगळी विल्हेवाट लावावी लागते. हे काम मात्र गावाला सामूदायिक पध्दतीनेच करावे लागेल. यासाठी पुढे स्वतंत्र प्रकरण दिले आहे.
माश्या हे कचरा व घाणीचे लक्षण आणि परिणामही आहे. विष्ठेमार्फत होणारे सर्व रोग माशी पसरवते. स्वच्छता राखल्याशिवाय माश्या हटत नाहीत. उघडे अन्न, उघडयावरील विष्ठा, केरकचरा या सर्व गोष्टींचा बंदोबस्त केल्यावरच माश्यांवर नियंत्रण राहू शकते. त्यामुळे हा प्रश्न ब-याच प्रमाणात राहणीमानाशी निगडित आहे.
लेखक : डॉ. श्याम अष्टेकर
(MBBS, MD community Medicine)
संदर्भ : आरोग्याविद्या
अंतिम सुधारित : 10/7/2020
घन कचऱ्याची निर्मिती घराघरातून होत असल्याने गोळा ह...
डोळयामध्ये कचरा, धातूचे कण, कीटक, इत्यादी जाणे ही ...
निसर्गात कोणताच कचरा नसतो. कचरा हा आपणच करतो. नि...
दूरदर्शन सह्याद्री निर्मित कचरा म्हणजे काय? कचऱ्या...