घनकचरा म्हणजे रोजच्या वापरातून उरलेला निरुपयोगी पदार्थ. ग्रामीण भागापेक्षा शहरी भागातून निघणारा घनकचरा व त्याची विल्हेवाट ही जगापुढील एक मोठी समस्या आहे. पूर्वीच्या काळी घनकचरा विल्हेवाटीची फार समस्या नव्हती; कारण लोकसंख्या कमी होती आणि घनकचरा टाकण्यासाठी जमीन मोठया प्रमाणात उपलब्ध होती. परंतु आता लोकसंख्या वाढल्यामुळे घनकचरा मोठया प्रमाणात तयार होतो व जमीन पूर्वी होती तेवढीच आहे. घनकचरा मोठया प्रमाणात निर्माण होण्याचे कारण म्हणजे शहरीकरण, औद्योगीकरण, प्लास्टिक वस्तू, उंचावलेले राहणीमान आणि त्यासाठी लागणा-या वेगवेगळया प्रकारच्या वस्तू, वाढलेल्या लोकसंख्येची अन्नाची गरज भागविण्यासाठी शेतातील वाढलेले उत्पादन व त्यापासून निघणारा घनकचरा. या सर्व घनकच-याचे व्यवस्थापन करणे दिवसेंदिवस अवघड होत चालले आहे.
घनकचरा प्रदूषण दिवसेंदिवस वाढतच आहे. भारतात दरमाणशी दर दिवसाला 0.4 कि.ग्रॅ एवढा घनकचरा तयार होतो. यावरुन घनकचरा प्रदूषणाची कल्पना आपण करु शकतो. शेतातून किंवा घरातून निघालेला घनकचरा उघडयावर टाकला जातो, तो कुजतो व त्यापासून दुर्गंधी सुटते याबरोबर कीटकांची उत्पत्ती होऊन आरोग्यास हानी पोहोचते.
फार पूर्वीपासून घनकचरा जाळूनच त्याची विल्हेवाट लावली जाते. परंतु त्यामुळे हवेचे प्रदूषण होते व पर्यावरणाचे आरोग्य धोक्यात येते. अर्थव्यवस्था सुधारते तसे कचरा जास्त निर्माण होतो. कच-याचे प्रकारही वाढत जातात. हा अनेक प्रकारचा कचरा वेगवेगळया समस्या निर्माण करतो. आजार, प्रदूषण, सौंदर्यहानी आणि पर्यावरणाचे नुकसान असे अनेक प्रश्न निर्माण होतात. म्हणूनच घनकचरा व्यवस्थापन करताना काही उद्दिष्टे आपण लक्षात ठेवायला पाहिजेत.
आरोग्य-संरक्षण, जीवनाची गुणवत्ता सुधारणे. पर्यावरण प्रदूषण टाळणे, परिसर स्वच्छता. भंगार-कच-यावर पुनर्प्रक्रिया होण्यासाठी चालना देणे. जैविक-कच-यातून ऊर्जा निर्माण करून इंधन वाचवणे. या सगळयातून काही रोजगार निर्मिती करणे. संपूर्ण स्वच्छतेसाठी कचरा व्यवस्थापन हा एक महत्त्वाचा घटक आहे. आपल्या केरकच-यात विविध पदार्थ असतात; त्यात वर्गवारी करावी लागते. वर्गवारी केल्याशिवाय घनकचरा व्यवस्थापन चांगल होऊ शकणार नाही. यासाठी पुढीलप्रमाणे वर्गवारी करता येईल.
लेखक : डॉ. श्याम अष्टेकर
(MBBS, MD community Medicine)
संदर्भ : आरोग्यविद्या
अंतिम सुधारित : 10/7/2020
थंडी संपतेवेळी येणाऱ्या आंबिया बहाराचे व्यवस्थापन ...
विशेषत: हवामानातील बदलामुळे नैसर्गिक आपत्तीत आकस्म...
करडांच्या शरीरस्वास्थ्य सुयोग्य राखण्यासाठी सकस आह...
या वर्षीच्या कमी पावसामुळे सिंचनासाठी पाण्याची उपल...