सांडपाणी घराजवळ साचून डबकी तयार होतात. हे दृश्य तसे खेड़यांप्रमाणेच शहरांतही दिसते. खरे तर सांडपाण्याची गटारे, शौचकूप (संडास) इत्यादी सोयी आपल्या देशात चार-पाच हजार वर्षापूर्वीच्या सिंधू संस्कृतीच्या वसाहतीत आढळून आल्या आहेत. जिथे शोषखड्डा किंवा परसबागेसाठी जागा आहे तिथे त्या घरापुरता सांडपाण्याचा प्रश्न सोडवता येतो. मात्र एखादे गाव मोठे असेल तर दाटीवाटीमुळे शोषखड्डे परसबागेसाठी जागा उरत नाही. अशा ठिकाणी सार्वजनिक स्वरुपाची उपाययोजना करणे आवश्यक आहे. यासाठीही कमी खर्चाच्या व परिणामकारक पध्दती उपलब्ध आहेत. मात्र गावात गटार योजना करायच्या आधी पुरेसा विचार व नियोजन करणे आवश्यक आहे. शक्यतोवर सांडपाण्याची विल्हेवाट घरगुती तत्त्वावर लावता आली तर चांगले असते. यासाठी शोषखड्डा व परसबाग हे तंत्रज्ञान उपलब्ध आहे. सामूहिक योजना खर्चिक व नंतर उपद्रवी ठरतात.
डासांची निर्मिती पाण्याशिवाय होत नाही. सांडपाण्यावर वाढणा-या डासांमुळे हत्तीरोग, तर स्वच्छ पाण्यावर वाढणा-या डासांमुळे मलेरिया पसरतो. म्हणून शहरापेक्षा ग्रामीण भागातच हिवतापाचे प्रमाण जास्त असते. बागायती शेती, कालवे, तलाव असलेल्या ठिकाणी हिवतापाचे डास साहजिकच जास्त असतात. पावसाळयात हे डास सर्वत्र वाढतात. या उलट शहरी भागात क्युलेक्स व ईडास जास्त असतात
लेखक : डॉ. श्याम अष्टेकर
(MBBS, MD community Medicine)
संदर्भ : आरोग्याविद्या
अंतिम सुधारित : 10/7/2020
जनावरांमध्ये संसर्गजन्य रोगाचा प्रसार हवा, पाणी, प...
घराभोवती व रस्त्यालगत साठवलेल्या कचऱ्याच्या ढिगांम...