पाणी नुसत्या साध्या डोळयांनी पाहून शुध्द की अशुध्द हे सांगणे अवघड आहे. यासाठी प्रयोगशाळेत तपासणी करावी लागेल. तपासणीसाठी सुमारे अर्ध्या लिटरच्या बाटलीत (बाटली 10-15 वेळा त्याच पाण्याने धुवून) पाणी भरून 24 तासांच्या आत ते आरोग्य प्रयोगशाळेत पाठवावे लागते. यासाठी पक्के बूच असलेली बाटली निवडावी. सर्व जिल्ह्यांच्या ठिकाणी अशा प्रयोगशाळा आहेत. पण अधिक निश्चित माहितीसाठी जवळच्या आरोग्य केंद्रावर विचारा.
प्रयोगशाळेत निरनिराळया तपासण्या करून, पाण्याच्या नमुन्यात रोगजंतू आहेत काय,मैला पाणी मिसळले आहे काय, ते पिण्याजोगे शुध्द आहे काय, याचा अहवाल मिळतो. पटकीचे (कॉलरा) जंतू आढळल्यास तारेने कळवले जाते. तपासणी शक्य नसल्यास पाणी शुध्द करून वापरावे.
हल्ली पाणी तपासणीसाठी तयार किट्स मिळतात. शासकीय प्राथमिक आरोग्य केंद्रात कोली जीवाणूंसाठी पट्टी मिळते. ही पट्टी पाण्यात बुडवल्यावर तिचा रंग सेकंदानंतर बदलल्यास जीवाणू आहेत असे समजावे. याचा अर्थ म्हणजे पाणी दूषित आहे. असे पाणी शुध्द करूनच वापरावे. यासाठी ब्लिचिंग पावडर वापरावी लागेल.
बॅक्टोस्कोप ही सत्वर पाणी तपासणीची एक पध्दत आहे. हे किट पाबळ येथील विज्ञानाश्रमाने वापरलेले असून काही खाजगी प्रयोगशाळेतून हे प्राप्त करता येते. या किटमध्ये छोटया बाटल्यांमध्ये जंतू उगवण द्रव्य (अगार) असते. तपासायचे पाणी ठरावीक खुणेपर्यंत या बाटलीत भरावे आणि झाकण बंद करावे. 5 मिनिटेपर्यंत ही बाटली सावकाश हलवावी. यानंतर ही बाटली 24-48 तासपर्यंत खोलीत ठेवावी. (350से. तापमान) खूपच थंड हवा असल्यास झोपताना खिशात ठेवावी म्हणजे ऊब मिळेल. यानंतर बाटलीचे निरीक्षण करावे. काय दिसते त्याप्रमाणे निकाल समजून घ्यावा.
(अ) बाटलीत काहीही रंगबदल नाही - जंतू नाहीत.
(ब) पाणी काळे पडते - जंतू आहेत, हे पाणी पिऊ नये.
पिण्याच्या पाण्यामध्ये अनेक क्षार व रसायने असू शकतात. पाणी पिण्यासाठी योग्य आहे की नाही हे ठरवण्यासाठी त्याची रासायनिक तपासणी करावी लागते. ही तपासणी जागच्या जागी करण्यासाठी केंद्र सरकारच्या वतीने एक मास्टर किट तयार करण्यात आले आहे. काही प्रयोगशाळा हे किट विकतात. एका किटमध्ये 100 रासायनिक तपासणी पट्टया असतात. याची किंमत अंदाजे 3000रु. असते. या किटचा वापर करून पुढील रासायनिक द्रव्यांची तपासणी करता येते.
या प्रश्नाचे उत्तर ऑर्थोटॉल्यूडीन चाचणीने मिळते (O.T. Test ) पध्दत
1. परीक्षानळीत 1 मिली. पाणी घेऊन त्यात 0.1 मिली ऑर्थोटॉल्यूडीन द्रव मिसळतात.
2. पाण्यात मुक्त क्लोरिन असल्यास पिवळा रंग येतो.
3. पिवळया रंगाच्या फिकट अथवा गडदपणानुसार त्यात किती क्लोरिन आहे हे बाजारात मिळणा-या तबकडीच्या रंगाशी तुलना करून समजते.
उदा. 0.1पी.पी.एम, 0.5पी.पी.एम., 1पी.पी.एम,
लेखक : डॉ. श्याम अष्टेकर (MBBS, MD community Medicine)
संदर्भ : आरोग्याविद्या
अंतिम सुधारित : 6/11/2020
दूरदर्शन सह्याद्री निर्मित उपलब्ध पाण्याचा कार्यक्...
या वर्षीच्या कमी पावसामुळे सिंचनासाठी पाण्याची उपल...
उस शेतीमध्ये पाण्याचा कार्यक्षम काटेकोरपणे, नियोजन...
एक किंवा एकापेक्षा अधिक वेळा पातळ अगर पाण्यासारखी ...