निर्मळता हा मानवी संस्कृतीचा आणि आरोग्याचा पाया आहे. मात्र आपल्या देशात खेडयांमध्ये आणि अनेक शहरांमध्ये गलिच्छतेचे साम्राज्य दिसते. रस्त्यावर वाहते सांडपाणी, डबकी, उघडयावर मलमूत्रविसर्जन, कचरा, प्रदूषण या सर्वांमुळे एक गलिच्छ वातावरण निर्माण होते. यातून आरोग्याला धोका तर आहेच, पण मानवी संस्कृतीवरच तो एक डाग आहे. संपूर्ण स्वच्छता अभियान ही एक सरकारी योजना आहे. पण सामाजिक चळवळीप्रमाणे ती चालली तरच यशस्वी होईल. स्वातंत्र्यापूर्वी आपल्या देशात ग्रामस्वच्छतेसाठी चळवळी झाल्या. भंगीमुक्ती चळवळ हे त्याचे एक टोक होते. मानवाने मानवाची विष्ठा वाहून नेणे हा त्या संपूर्ण समाजालाच कलंक आहे. जोपर्यंत रस्त्यावर मलविसर्जन होत राहील तोपर्यंत संपूर्ण भंगीमुक्ती साध्य होणार नाही. स्वच्छता अभियानाची सुरुवात स्वत:पासून करायला पाहिजे. कुटुंब, वस्ती, गाव-शहर या सर्व पातळयांवर स्वच्छता निर्माण व्हायला पाहिजे. संस्कृती, आरोग्य, मानवी प्रतिष्ठा, आर्थिक प्रगती या सर्वांसाठी स्वच्छता फार महत्त्वाची आहे.
केंद्र सरकारने 2000 साली याचसाठी संपूर्ण स्वच्छता अभियान सुरु केले आहे. खेडी आणि शहरे दोन्ही स्वच्छ व्हायला पाहिजेत. घरगुती संडास या अभियानाचा केंद्रबिंदू आहे. गरीब, श्रीमंत सर्वांसाठी हे अभियान आहे. लोकसहभाग हे याचे मुख्य सूत्र आहे.
लेखक : डॉ. श्याम अष्टेकर
(MBBS, MD community Medicine)
संदर्भ : आरोग्यविद्या
अंतिम सुधारित : 10/7/2020
करडांच्या शरीरस्वास्थ्य सुयोग्य राखण्यासाठी सकस आह...
थंडी संपतेवेळी येणाऱ्या आंबिया बहाराचे व्यवस्थापन ...
विशेषत: हवामानातील बदलामुळे नैसर्गिक आपत्तीत आकस्म...
या वर्षीच्या कमी पावसामुळे सिंचनासाठी पाण्याची उपल...