संडासमध्ये पाण्याची बचत करण्यासाठी युक्त्या
संडासमध्ये कमीत कमी पाणी वापरुन स्वच्छता करण्यासाठी या सूचनांचा विचार करा.
1. मलपात्राचा उतार व गुळगुळीतपणा
मलपात्राचा उतार व गुळगुळीतपणा जास्त असला की विष्ठा लवकर घसरुन जाते. यासाठी निदान 40 अंश उतार असलेले व लहान भांडे चांगले.
2. जलबंद लहान ठेवणे
कोंबडा पाईप (जलबंद) 75 से.मी. ऐवजी 20 सेंमी ठेवला तर 5-7 लिटर ऐवजी 2 लिटर पाणी सफाईसाठी पुरते. जलबंद S टाईपचा ठेवण्याऐवजी J (इंग्रजी जे) किंवा P (इंग्रजी पी) आकाराचा चालतो. यात कमी पाणी लागते.
3. जलबंदाऐवजी झडप बसवणे
मलपात्राच्या नळीच्या शेवटी जलबंदाऐवजी झडप वापरल्यास केवळ 1 लिटर पाणी पुरते. ही झडप स्टेनलेस स्टीलची असते. बिजागिरी गंजू नये म्हणून पितळ व तांब्याची बनवली जाते.
पावलांसाठी उंचवटे नको
पूर्वी संडास बांधताना पावलांसाठी उंचवटे बनवले जात असत. ही पध्दत स्वच्छतेसाठी आणि मुलांना गैरसोयीची म्हणून बंद केली आहे.
लेखक : डॉ. श्याम अष्टेकर (MBBS, MD community Medicine)
संदर्भ : आरोग्यविद्या
अंतिम सुधारित : 12/14/2019
0 रेटिंग्स आणि 0 टिप्पण्या
तार्यांवर रोल करा, नंतर दर क्लिक करा.
© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.