অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

स्तन

स्तन

पृष्ठवंशी ( पाठीचा असलेल्या ) प्राण्यांमधील एका वर्गात नवजात अर्भकाला मातेकडून पोषण मिळण्यासाठी स्तन ही ग्रंथी विकसित झालेली आहे. स्तनी किंवा सस्तन प्राणी या नावाने ओळखल्या जाणार्‍या या वर्गात व्हेल व डॉल्फिन हे जलचर, वटवाघूळ हा पंखधारी वृक्षनिवासी, व गायबैलांसारखे सर्व खूर असणारे शाकाहारी, उंदरा-सारखे( कुरतडणारे ), वाघ-सिंहासारखे शिकारी प्राणी आणि नरवानर गणातील मानवासह सर्व फलाहारी किंवा आहारी प्राणी अशा विविध सजीवांचा होतो.काटेरी नवजात अर्भकाची पचन संस्था ( दात, जठर,इ.) आणि चयापचयी यंत्रणा यांची पुरेशी वाढ होऊन स्वतंत्रपणे अन्नग्रहण करून ते पचविण्याचीनिर्माण होईपर्यंत स्तनातील दुधावर असे प्राणी अवलंबून असतात.द्रव्यांबरोबर काही रोगप्रतिकारक घटकही प्रतिपिंडांच्या रूपात मातेकडून अर्भकास मिळत असतात. मानवी अर्भकात ही— स्तनपानाद्वारे — सु. ६ महिने चालू राहते. या काळात मातेच्या आहारातील पोषक घटक, औषधी द्रव्ये, घातक पदार्थ इत्यादींचे( किंवा स्रवणे ) तिच्या दुधात होत असल्यामुळे अर्भकावर त्याचे बरे-वाईट परिणाम होणे सहज शक्य असते. यांखेरीज मातेमधील जंतुसंक्रामण दुधावाटे बालकाकडे जाऊ शकते (  उदा., एचआयव्ही ); परंतु अशा संक्रामणजन्य विकारांची फार कमी असते.

सस्तन प्राण्यांमधील स्तनांची संख्या आणि त्यांची छाती किंवा पोटा-वरील जागा यांत काहीशी विविधता आढळते. मानवी स्तन मात्र दोनच असून छातीच्या पिंजर्‍यावरील वरच्या भागात असलेल्या स्नायूच्या पातळीवरील त्वचेखालील अधस्त्वचीय ऊतकात ( समान रचना व कार्य असणार्‍या कोशिकांच्या समूहात ) ते आढळतात. पुरुषांमध्ये आणि लहान मुलींमध्ये त्यांची जागा चौथ्या किंवा पाचव्या बरगडीच्या पातळीवर दिसणारी स्तनागे्र आणि त्याच्या भोवतालचे स्तनाग्र-परिवलय ( बोंडी ) यांच्यामुळे सहज लक्षात येऊ शकते. बाल्यावस्था संपून मुलगी यौवनावस्थेत पदार्पण करते तेव्हा पोष ( पिट्युटरी ) ग्रंथींमधून निर्माण होणार्‍या उत्तेजक हॉर्मोनांच्या प्रभावामुळे अंडकोशांची वाढ होऊ लागते. अंडकोशांमध्ये निर्माण होणार्‍या स्त्रीमदजन ( इस्ट्रोजेन ) हॉर्मोनाचा परिणाम सर्व शरीरभर दिसू लागतो. त्यात स्तनाग्र, त्याचे परिवलय आणि त्वचेखालील स्तनाचे( दुधाच्या ग्रंथी, वाहिन्या आणि त्यांच्या आसपासची वसा-ऊतके ) यांची वाढ प्रामुख्याने प्रथम लक्षात येते. स्तनाग्रकलिका दिसू लागल्यावर सु. दोन वर्षांनी रजोप्राप्ती ( रजःस्रावाचा प्रारंभ ) होते.

 

स्त्रोत : मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate