कुटुंब नियोजन साधनांचा उपयोग
प्रस्तावना
कुटुंब नियोजन साधनाचा उपयोग वेगवेगळ्या कारणासाठी केला जातो
कुटुंब नियोजन साधनांचा उपयोग
- गरोदरपण लांबवण्यास उपयोग होतो.
- संतती नियमाच्या साधनांचा उपयोग दोन मुलांमध्ये योग्य अंतर ठेवण्यासाठी होतो.
- अनेक वेळा गरोदर राहिल्यानंतर पुढील गर्भधारणा टाळण्याकरिता होतो.
- प्रसुतिपश्चात मातेची योग्य काळजी घेणे आवश्यक आहे.
- प्रसुतिनंतर प्रशिक्षित व्यक्तिकडून (डॉक्टर, नर्स,प्रशिक्षित दाई ) यांचेकडून नियमित तपासणी होणे आवश्यक आहे. पहिले ८ ते १० दिवस रोज तपासणी होणे आवश्यक आहे. त्यानंतर ६ आठवड्यांपर्यंत दर आठवडयाला तपासणी होणे आवश्यक आहे. त्यानंतर सहा महिन्यांपर्यंत दर महिन्याला तपासणी होणे आवश्यक आहे.
- प्रसुतिपश्चात काळात जनेनेन्द्रीयांचा जंतूदोष टाळण्यासाठी स्वच्छ कपडे व वैयक्तिक स्वच्छता याकडे विशेष लक्ष देणे आवश्यक आहे.
- प्रसुतिनंतर लवकरात लवकर (त्वरीत) स्तनपान चालू करावे. ते माता व बालक या दोघांच्याही फायदयाचे आहे. प्रसुतीनंतर लगेच किंवा नंतर केव्हाही रक्तस्रावाचे प्रमाण जास्त वाटल्यास त्वरीत वैद्यकीय सल्ला घेणे आवश्यक आहे.
- जास्त प्रमाणात ताप येणे, झटके येणे, शुद्ध हरपणे, अशी लक्षणे असल्यास तात्काळ डॉक्टरांकडून तपासणी होणे आवश्यक आहे.
- प्रसुतिपश्चात काळात पुरेसा चौरस व सकस आहाराची गरज आहे. व तो मातेला दिला पाहिजे.
- रक्तक्षयाच्या प्रतिबंधासाठी १०० दिवसांपर्यंत लोहयुक्त गोळ्या घेणे आवश्यक आहे.
- १ ते २ महिन्यानंतर हळूहळू पूर्वीचे सर्व कामकाज सुरु करावे.
- प्रसुतिपश्चात काळात मातेची योग्य काळजी घेऊन मातामृत्युचे प्रमाण निश्चितपणे कमी होऊ शकते.
- पाळणा लांबविण्याचा वा थांबविण्याचा योग्य सल्ला देऊन त्यासाठी मातेला प्रवृत्त करणे आवश्यक आहे.
- कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया स्त्री व पुरुष या दोघांना करता येऊ शकते.
स्त्रोत : कुटुंब नियोजन, माहिती व शिक्षण मार्गदर्शक पुस्तिका, वॉटरशेड ऑगनायझेशन ट्रस्ट
अंतिम सुधारित : 1/29/2020
0 रेटिंग्स आणि 0 टिप्पण्या
तार्यांवर रोल करा, नंतर दर क्लिक करा.
© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.