অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

औषधे आणि गर्भावस्था

औषधे आणि गर्भावस्था

काही वेळा गर्भवती आणि तिच्या पोटातील गर्भाच्या आरोग्यासाठी औषधे द्यावी लागतात. मात्र अशा वेळी कोणतेही औषध घेण्यापूर्वी (अगदी औषधांच्या दुकानात पटकन मिळणार्याप औषधांसहित) किंवा पूरक आहार इ. (आयुर्वेदिकदेखील) खाण्यापूर्वी गर्भवतीने आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. गर्भावस्थेमध्ये काही जीवनसत्वे आणि खनिजे पूरक स्वरूपात घेण्याचा सल्ला डॉक्टर देऊ शकतात.

गर्भावर औषधांचा होणारा परिणाम

गर्भवतीने घेतलेली औषधे तिच्या पोटातील गर्भापर्यंत पोहोचण्याचा मार्ग म्हणजे नाळ (वार उर्फ प्लॅसेंटा). गर्भाच्या वाढीसाठी आणि पोषणासाठी गरजेचा असलेला प्राणवायू आणि इतर पोषकद्रव्ये ह्या नाळेमार्फतच गर्भापर्यंत पोहोचवली जातात. गर्भवतीने घेतलेल्या औषधांचे विविध परिणाम गर्भावर होऊ शकतात. उदाहरणार्थ -

  • गर्भावर थेट नुकसान, अनैसर्गिक वाढ इ. (ह्यांमुळे बाळात जन्मतःच दोष असू शकतात) किंवा मृत्यू देखील होऊ शकतो.
  • नाळेच्या कामात बदल होणे किंवा अडथळा येणे. नाळेतील रक्तवाहिन्या अरुंद झाल्याने आईकडून गर्भाला होणारा प्राणवायूचा आणि इतर पोषकद्रव्यांचा पुरवठा कमी होतो. परिणामी बाळाचे वजन कमी असू शकते किंवा ते अविकसित असू शकते.
  • कधीकधी गर्भाशयांच्या स्नायूंचे जोरदार आकुंचन होऊन गर्भाला होणारा रक्तपुरवठा कमी होतो व त्याचे अप्रत्यक्ष नुकसान होते. ह्याने क्वचित कळा वेळेआधीच सुरू होऊन अपुर्या दिवसांचे बाळ जन्माला येऊ शकते.

व्हिलीमधील गर्भाची रक्ताभिसरण यंत्रणा व इंटरव्हिलस जागेमधली आईची रक्ताभिसरण यंत्रणा ह्यांमध्ये फक्त एक अतिशय पातळ अर्धपटल (प्लॅसेंटल मेंब्रेन) असते. आईच्या रक्तात मिसळलेली औषधे हे अर्धपटल सहजपणे पार करून व्हिलीतील रक्तवाहिन्यांमध्ये येतात आणि नाळेमधून गर्भापर्यंत पोहोचतात.
एखाद्या औषधाचा गर्भावर होणारा परिणाम त्या औषधाची शक्ती व मात्रा (डोस) आणि गर्भाच्या विकासाच्या स्थितीवर अवलंबून असतो. गर्भधारनेच्या अगदी सुरुवातीला म्हणजे फलनानंतर २० दिवसांत घेतलेली काही औषधे गर्भ नष्टही करू शकतात अथवा त्यांचा गर्भावर काहीही परिणाम होत नाही! इतक्या लहान वयाचा गर्भदेखील ज्न्मजात व्यंगांना विरोध करू शकतो. परंतु फलनानंतरच्या तिसर्या आठवड्यापासून आठव्या आठवड्यापर्यंतचा गर्भ जन्मजात व्यांगांना बळी पडू शकतो. ह्या काळात गर्भापर्यंत पोहोचलेल्या औषधांमुळे एकतर गर्भावर काहीही परिणाम होत नाही किंवा चक्क गर्भपातच होऊ शकतो! किंवा अशा बाळास जन्मतः काही व्यंग असू शकते किंवा एखादे लपलेले व्यंग त्याच्या नंतरच्या आयुष्यात उघड होऊ शकते. गर्भाचे अवयव विकसित होऊ लागल्यानंतरच्या दिवसांत घेतलेल्या औषधांचा परिणाम जन्मजात व्यंगांमध्ये सहसा होत नाही परंतु सर्वसामान्य अवयव आणि उतींच्या वाढीवर तसेच कामावर होऊ शकतो.

अन्न आणि औषध प्रशासनातर्फे (फूड ऍँड ड्रग ऑथॉरिटी – FDA) औषधांचे वर्गीकरण, ती गर्भावस्थेत घेतली गेल्यास, गर्भास असलेल्या संभाव्य धोक्यानुसार केले जाते. काही औषधे अतिशय विषारी असतात व गर्भवतींनी ती कधीही घेऊ नयेत कारण त्यांमुळे जन्माला येणार्याष बाळामध्ये गंभीर व्यंगे उद्भवू शकतात – उदा. थॅलिडोमाइड (थॅलोमिड). बर्यााच दशकांपूर्वी गर्भवती हे औषध घेत असत परंतु ह्याचा दिसून आलेला दुष्परिणाम म्हणजे जन्माला येणार्याव मुलांचे हातपायांची वाढच झालेली नसायची. तसेच त्यांच्या आतड्यांमध्ये, हृदयात आणि रक्तवाहिन्यांमध्ये गंभीर दोष असायचे. काही औषधांची प्राण्यांवर चाचणी केली असता त्यांच्या गर्भांमध्ये दोष आढळले परंतु मानवी गर्भांवर तेच दुष्परिणाम झालेले आढळले नाहीत – उदा. मेक्लिझिन (उर्फ ऍँटिव्हर्ट) हे औषध बरेचदा उलट्या, गाडी लागणे, मळमळणे ह्यांवर घेतले जाते.

गर्भधारनेच्या वेळी घेतलेल्या औषधांपासूनच्या संभाव्य धोक्याची वर्गवारी

वर्ग वर्णन

ही औषधे सर्वांत सुरक्षित असतात. विविध व्यक्तींच्या सखोल अभ्यासानंतरही ह्यांच्यामुळे गर्भास धोका आढळलेला नाही.

प्राण्यांवरील प्रयोगामध्ये त्यांच्या गर्भास काहीही धोका आढळला नाही परंतु मानवाचा असा सखोल अभ्यास झालेला नाही.
किंवा
प्राण्यांवरील प्रयोगामध्ये त्यांच्या गर्भास धोका आढळला परंतु मानवाच्या सखोल अभ्यासानंतर धोका आढळला नाही.

प्राणी किंवा मानवावर पुरेसा अभ्यास झालेला नाही.
किंवा
प्राण्यांच्या अभ्यासामध्ये ह्या औषधाच्या वापराने गर्भास काही धोका आढळला नाही परंतु मानवी गर्भावर ह्याचा काय परिणाम होतो ह्याबाबतची माहिती उपलब्ध नाही.

मानवी गर्भास धोका असल्याचा पुरावा मिळाला आहे परंतु, विशिष्ट परिस्थितीमध्ये, औषधाच्या वापरामुळे होणारे फायदे ह्या धोक्यापेक्षा खूपच जास्त असू शकतात. उदा. आईमध्ये एखादी जीवघेणी विकृती असू शकते किंवा ही विकृती सुरक्षित औषधांनी बरी होणारी नसते.

क्ष

गर्भास गंभीर धोका असल्याने औषधाच्या संभाव्य फायद्यांचा विचारही करता येणार नाही.

बरेचदा एखाद्या औषधाने गर्भावस्थेत काही धोका उत्पन्न होण्याची शक्यता वाटल्यास त्याऐवजी सुरक्षित औषध देता येते. एखाद्या स्त्रीच्या थायरॉइड ग्रंथी जास्तच सक्रिय असल्यास साधारणपणे तिला प्रॉपिल्थियोरासिल प्राधान्याने दिले जाते. रक्तात गुठळ्या होणे (ब्लड क्लॉट) थांबवण्यासाठी हिपारिन वापरतात. पेनिसिलिनसारखी अनेक सुरक्षित प्रतिजैविकेही (ऍँटिबायोटिक्स) मिळतात.
काही औषधे घेणे थांबवल्यवर दुष्परिणाम दिसून येतात. उदा., आयसोट्रेटिनॉइन (उर्फ ऍक्युटेन). ह्याचा वापर त्वचारोगांवर केला जातो. हे औषध शरीराद्वारे त्वचेखालील चरबीमध्ये साठवले जाते व गरजेनुसार हळूहळू वापरले जाते. परंतु, आयसोट्रेटिनॉइन (उर्फ ऍक्युटेन) थांबवल्यानंतर 2 आठवड्यांच्या आत एखादी स्त्री गर्भवती राहिल्यास, जन्माला येणार्याे बाळास व्यंग असू शकते. म्हणूनच हे औषध घेणार्याी महिलांनी, गर्भवती होण्याआधी, किमान 3 ते 4 आठवड्यांचा अवधी द्यावा असा सल्ला दिला जातो.

गर्भवतींना किंवा गर्भवती असण्याची शक्यता असलेल्या महिलांना जिवंत विषाणूच्या सहाय्याने बनवलेली औषधे – उदा. रुबेला, व्हेरिसेला इ. - देत नाहीत. इतर औषधेदेखील (कॉलरा, हेपेटायटिस A आणि B, प्लेग, रेबीज (श्वानदंश), टिटॅनस (धनुर्वात), डिप्थेरिया, टायफॉइड (मुदतीचा ताप) इ. वर दिली जाणारी औषधे), त्या रोगाने संबंधित स्त्री गंभीररीत्या आजारी पडण्याची शक्यता असल्यासच देतात. अर्थात इन्फ्लुएंझा (फ्लू) च्या दिवसांत ज्या गर्भवतींचा सहावा किंवा नववा महिना असेल अशांना फ्लूविरोधी लस दिली जातेच.
गर्भ राहण्याआधीच उच्च रक्तदाबाचा त्रास असलेल्या किंवा गर्भावस्थेत हा त्रास उत्पन्न झाल्यास, महिलांना उच्च रक्तदाब घटवणारी औषधे (ऍँटिहायपरटेन्सिव्हज) एखादेवेळी द्यावी लागतात. उच्च रक्तदाबाच्या दोन्ही प्रकारांमुळे गर्भवती आणि गर्भास त्रास होऊ शकतो. परंतु अशा ऍँटिहायपरटेन्सिव्ह औषधांमुळे गर्भवतीचा उच्च रक्तदाब फारच वेगाने खाली आल्यास नाळेला होणार्यान रक्पुरवठ्यावर त्याचा वाईट परिणाम होतो. म्हणून ही औषधे घेणार्यान गर्भवतींवर बारीक नजर ठेवावी लागते. ऍँटिहायपरटेन्सिव्हजचे दोन प्रकार —ऍँजिओटेस्टिन कन्व्हर्टिंग एन्झाइम (ACE) प्रतिबंधक आणि थायाझाइड डाययुरेक्टिक्स - गर्भवतींना साधारणपणे दिले जात नाहीत कारण त्यांच्यमुळे गर्भाला गंभीर धोका पोहोचू शकतो.

हृदय बंद पडणे किंवा हृदयाच्या ठोक्यांतल्या अनियमिततेवर वापरले जाणारे डायगोक्झिन (उर्फ लॅनोक्झिन) सहजपणे नाळेत प्रवेश करू शकते. परंतु बाळावर त्याचा परिणाम जन्माआधी किंवा नंतर फारसा होत नाही.

गर्भावस्थेदरम्यान ज्यांमुळे त्रास होऊ शकतो अशी काही औषधे

प्रकार

उदाहरणे

होणारा त्रास

ऍंटिऍँक्झायटी (अस्थिर-चित्तरोधक) औषध

डायझेपाम (उर्फ -
डाएस्टॅटव्हॅलिअम)

हे औषध गर्भावस्थेमध्ये उशीराच्या दिवसांत घेतल्यास बाळामध्ये चिडचिड, खिन्नता, थरथर किंवा उच्चवेगीय प्रतिक्षिप्त क्रिया (exaggerated reflexes) इ. लक्षणे दिसतात.

प्रतिजैविके

क्लोरमफेनिकॉल (क्लोरांफेनिकॉल)

ग्लुकोज-6-फॉस्फेट डीहायड्रोजेनासी (G6PD) कमतरता असणार्याट स्त्री किंवा बाळात ग्रे बेबी सिंड्रोम (लाल रक्तपेशींचे विघटन)

फ्लुरोक्विनोलोन्स - उदा. सिप्रोफ्लोक्झासिन (सायलोझांसिप्रो), ओफ्लोक्झासिन (फ्लॉक्सिनोक्युफ्लॉक्स), लिव्होफ्लोक्झासिन (लिव्हाक्विनक्विक्झिन) आणि नॉरफ्लोक्झासिन (नोरोक्झिन)

सांध्यांमधील अनियमितता (फक्त प्राण्यांमध्येच आढळते)

 

कानामायसिन

गर्भाच्या कानाचे नुकसान (होणारे मूल बहिरे असू शकते)

नायट्रोफ्युरेंटाइन
(फ्युराडेंटिनमॅक्रोडेंटिन)

ग्लुकोज-6-फॉस्फेट डीहायड्रोजेनासी (G6PD) कमतरता असणार्याट स्त्री किंवा बाळात ग्रे बेबी सिंड्रोम (लाल रक्तपेशींचे विघटन)

स्ट्रेप्टोमायसिन

गर्भाच्या कानाचे नुकसान (होणारे मूल बहिरे असू शकते)

गर्भाच्या कानाचे नुकसान (होणारे मूल बहिरे असू शकते)

गर्भावस्थेच्या उशीराच्या दिवसांत दिल्यास होणार्याय बाळास कावीळ अथवा मेंदूचा विकार असू शकतो

 

टेट्रासायक्लिन (सुमायसिन)

हाडांची वाढ मंदपणे होणे, दात कायमचेच पिवळे होणे, बाळाच्या शरीरावर खळगे (कॅव्हिटीज) निर्माण होण्याची शक्यता जास्त
कधीकधी गर्भवतीचे यकृत बंद पडणे(लिव्हर फेल्युअर)

रक्त साकळणे-विरोधक (ऍंटिकॉग्युलंट्स)

हिपारिन

हे औषध दीर्घकाळ घेतल्यास गर्भवतींमध्ये ओस्टिओपोरॅसिस (हाडे ठिसूळ होणे) आणि प्लेटलेट्सची संख्या घटणे (प्लेटलेट्स रक्त साकळण्यात मदत करतात)

 

वार्फारिन (कौमाडिन)

जन्मजात दोष; गर्भवती तसेच गर्भात रक्त वाहणे

आकडी-रोधक (ऍँटिकन्व्हल्जंट्स)

कार्बामाझेपाइन (टेग्रेटॉल)

जन्मजात दोषांची शक्यता. नवजातांमध्ये रक्त वाहण्याची शक्यता, परंतु गर्भवतींनी, जन्म देण्यापूर्वी, एक महिन्यासाठी दररोज तोंडावाटे के जीवनसत्व घेतल्यास किंवा बाळाला जन्मानंतर लगेच के जीवनसत्वाचे इंजेक्शन दिल्यास हे टाळता येते.

 

फेनोबार्बिटाल(ल्युमिनाल)

कार्बामाझेपाइनसाठीच्या लक्षणांप्रमाणेच

 

फेनिटॉइन (डायलँटिन)

कार्बामाझेपाइनसाठीच्या लक्षणांप्रमाणेच

 

ट्रायमेथाडिओन (ट्रायडायोन)

गर्भपाताचा धोका अधिक जन्मजात विकृतींची शक्यता जास्त (70% पर्यंत) – क्लेफ्ट पॅलेट (टाळू वाकडी असणे) अथवा हृदय, चेहरा, कवटी, हात किंवा पोटातील अवयवांच्या बाबतीत

 

व्हालप्रोट (डिपॅकॉन)

जन्मजात व्यंगाची किंचित शक्यता (1%) क्लेफ्ट पॅलेट (टाळू वाकडी असणे) अथवा हृदय, चेहरा, कवटी, हातपाय किंवा पाठीच्या कण्याच्या बाबतीत

ऍँटिहायपरटेन्सिव्ह्ज्

ऍँडिओटेन्सिन-कन्व्हर्टिंग एंझाइम
(ACE) रोधक

ही औषधे गर्भावस्थेच्या काळात उशीराने घेतल्यास गर्भाच्या मूत्रपिंडांचे नुकसान होऊ शकते, वाढत्या गर्भ द्रवाची (ऍम्नियॉटिक फ्लुइड) पातळी कमी होऊ शकते तसेच चेहरा, हातपाय आणि फुफ्फुसांचे विकार असू शकतात

 

बीटा-ब्लॉकर्स

गर्भारपणी घेतलेल्या काही बीटा-ब्लॉकर्समुळे गर्भाच्या दृदयाच्या स्पंदनाचा वेग कमी होऊ शकतो, त्याच्या रक्तातल्या साखरेचे प्रमाण कमी होऊ शकते आणि एकंदर वाढ मंद होते

 

थायाझाइड डाययुरेक्टिक्स

गर्भाच्या रक्तातील प्लेटलेट्स तसेच ऑक्सिजन, सोडिअम, पोटॅशिअमच्या प्रमाणात घट. वाढ मंदावणे

केमोथेरेपी औषधे

ऍक्शनोमायसिन

जन्मजात व्यंगांची शक्यता (फक्त प्राण्यांमध्येच आढळली आहे)

 

बुसुल्फान (मायलेरान)

जन्मजात व्यंगे उदा. खालच्या जबड्याची वाढ खुंटणे, क्लेफ्ट पॅलेट, कवटीच्या हाडांचा अनैसर्गिक विकास, पाठीच्या कण्याचे दोष, कानांचे दोष, क्लबफूट वाढ मंदावणे

 

क्लोरांबुसिल (ल्युकेरान)br />

बुसुल्फनच्या परिणामांप्रमाणेच

 

सायक्लोफॉस्फामाइड (लायोफिलिझेड
सायटोक्झान)

बुसुल्फनच्या परिणामांप्रमाणेच

 

मर्काप्टोप्युरिन (प्युरिनेंथॉल)

बुसुल्फनच्या परिणामांप्रमाणेच

 

मेथोट्रेक्झेट (ट्रेक्साल)br />

बुसुल्फनच्या परिणामांप्रमाणेच

 

विनब्लास्टिन

जन्मजात व्यंगे शक्य(फक्त प्राण्यांमध्येच आढळली आहे)

 

विनक्रिस्टिन

जन्मजात व्यंगे शक्य (फक्त प्राण्यांमध्येच आढळली आहे)

मनस्थिती सावरणारी औषधे

लिथिअम (लिथोबिड)

नवजात बाळामध्ये जन्मजात व्यंगे (विशेषतः हृदयाची), आळशीपणा, स्नायूंची कार्यक्षमता घटणे, अन्न नीट घेता न येणे, थायरॉइड ग्रंथींचे काम कमी होणे तसेच नेफ्रोजेनिक डायबेटिस इंसिपिडस

नॉन-स्टेरॉइडल ऍँटिइंफ्लेमेटरी ड्रग्ज (NSAIDs)

ऍस्पिरिन आणि सॅलिसायलेट प्रकारची इतर औषधे
इबुप्रोफेन (ऍडव्हिलमॉट्रिन)

नॅप्रोक्झेन (
एलेव्हियनाप्रोक्झ्नाप्रोसिन)

ही औषधे मोठ्या प्रमाणात घेतल्यास कळा उशीरा सुरू होऊ शकतात, गर्भाची अरोटा आणि फुफ्फुसांपर्यंत जाणारी रोहिणी (डिक्टस आर्टेरियस) ह्यांमधील जोड वेळेआधीच बंद होऊ शकतो, कावीळ तसेच(कधीकधी) मेंदूला इजा होऊ शकते. तसेच बाळ आणि बाळंतिणीला (प्रसूतीआधी किंवा नंतर) रक्तस्त्राव होऊ शकतो.
ही औषधे गर्भारपणात उशीराने घेतल्यास वाढणार्या गर्भा भोवतीच्या द्रवाचे प्रमाण कमी होऊ शकते.

तोंडावाटे घेण्याची हायपरग्लायसेमीरोधक औषधे

क्लोरप्रोप्रामाइड (डायाबिनिज)

नवजाताच्या रक्तात साखरेचे प्रमाण अत्यंत कमी
गर्भवतीच्या मधुमेहाचे पुरेसे नियंत्रण नाही
टाइप 2 प्रकारचा मधुमेह असलेल्या गर्भवतीने हे औषध गर्भारपणाच्या सुरुवातीला घेतल्यास जन्मजात व्यंगांची शक्यता वाढते

 

टोलब्युटामाइड

क्लोरप्रोप्रामाइडच्या परिणामांप्रमाणेच

लैंगिक संप्रेरके

डॅनाझॉल

गर्भवतीने हे औषध गर्भारपणाच्या अगदी सुरुवातीला घेतल्यास स्त्री गर्भाच्या जननेंद्रियांचे रूपांतर पुरुषी जननेंद्रियांमध्ये होऊ शकते व हे टाळण्यासाठी कधीकधी शस्त्रक्रिया करावी लागते

 

डायएथिलस्टिलबेस्ट्रॉल (DES)

मुलींना, भावी काळात, गर्भाशयाची व्यंगे, पाळीच्या तक्रारी, योनीच्या कर्करोगाचा वाढता धोका तसेच बाळंतपणाचे वेळी गुंतागुंत.
मुलाच्या लिंगामध्ये दोष असण्याची शक्यता

 

कृत्रिम प्रोजेस्टिन्स (परंतु तोंडावाटे घेण्याच्या गर्भनिरोधकांत वापरतात तितकी कमी मात्रा नव्हे)

डॅनाझॉलच्या परिणामांप्रमाणेच

त्वचा-उपचार

इट्रेटिनेट

जन्मजात व्यंगे, उदा. हृदयाच्या समस्या, कान छोटे असणे, हायड्रोसेफालस (मेंदूत पाणी होणे)

 

आयसोट्रेटिनॉइन (ऍक्युटेन)

इट्रेटिनेटच्या परिणामांप्रमाणेच मानसिक वाढ अपुरी
गर्भपाताचा धोका

थायरॉइडवरील औषधे

मेथिमॅझोल (टापाझोल)

गर्भाची थायरॉइड ग्रंथी आकाराने वाढलेली किंवा कमी कार्यक्षम
नवजाताच्या कवटीमध्ये समस्या

 

प्रॉपिलथिओयुरॅसिल

गर्भाची थायरॉइड ग्रंथी आकाराने वाढलेली किंवा कमी कार्यक्षम

 

किरणोत्सर्गी (रेडिओऍक्टिव्ह)
आयोडिन

गर्भाची थायरॉइड ग्रंथी नष्ट होणे
गर्भारपणाच्या पहिल्या तीन महिन्यांच्या अखेरीस हे औषध दिल्यास गर्भाची थायरॉइड ग्रंथी आकाराने वाढलेली किंवा नको तितकी कार्यक्षम बनते

 

ट्रायआयोडोथायरॉनिन (थायरोलार)

गर्भाची थायरॉइड ग्रंथी आकाराने वाढलेली किंवा नको तितकी कार्यक्षम

लसी (जिवंत विषाणू)td>

जर्मन गोवर (रुबेला) आणि कांजिण्यांवरील (व्हेरिसेला) लसी

नाळ तसेच वाढत्या गर्भास संसर्गाचा संभाव्य धोका

 

गालगुंड, गोवर, पोलिओ किंवा पिवळा ताप यांवरील लसी

धोक्यांची शक्यता परंतु ह्यांबाबत जास्त माहिती नाही

* तशीच तातडीची निकड नसल्यास गर्भारपणात औषधे घेऊच नयेत. अर्थात काही वेळा गर्भवती आणि गर्भासाठी औषधे घेणे आवश्यक असते. अशावेळी संबंधित महिलेने आपल्या आरोग्यसेवकाशी बोलून औषधांचे फायदे-तोटे समजून घ्यावे.

सामाजिक पातळीवरील औषधे

धूम्रपान व तंबाखू

सिगारेट किंवा विडी ओढल्यामुळे गर्भवती तसेच गर्भाला अपाय होतो हे चांगले माहीत असले तरीही धूम्रपान करणार्याय महिलांपैकी फक्त 20% प्रत्यक्ष गर्भारपणात धूम्रपान सोडतात. गर्भावस्थेत धूम्रपान केल्यास गर्भावर ठळकपणे दिसणारा परिणाम म्हणजे नवजाताचे वजन अत्यंत कमी असणे. गर्भवती जितके जास्त धूम्रपान करेल तितक्या प्रमाणात नवजाताचे वजन कमी होत जाते. गर्भावस्थेत धूम्रपान करणार्यांरनी जन्म दिलेल्या बाळांचे वजन, धूम्रपान न करणार्यां नी जन्म दिलेल्या बाळांच्या वजनापेक्षा सुमारे 170 ग्रॅमने कमी असते. दीर्घकाळ धूम्रपान करणार्यां महिलांच्या नवजातांचे वजन अधिकच कमी भरते असे दिसते.
धूम्रपान करणार्याे महिलांच्या नवजातामध्ये हृदय, मेंदू व चेहर्या ची जन्मजात व्यंगे असण्याचे प्रमाण, धूम्रपान न करणार्याय महिलांच्या नवजातांच्या तुलनेने जास्त असते. तसेच नवजाताच्या अचानक मृत्यूचे (सडन इंफंट डेथ सिंड्रोम - SIDS) प्रमाण वाढू शकते. नाळेची जागा बदलणे (प्लॅसेंटा प्रीव्हिया), वेळेआधीच नाळ तुटणे, गर्भ असलेले अर्धपटल (मेंब्रेन) वेळेआधीच फाटणे, कळा आधीच सुरू होणे, गर्भाशयाचा जंतुसंसर्ग, गर्भपात, मृत मूल जन्माला येणे, वेळेआधीच जन्म होणे इ. बाबींची शक्यता वाढते. ह्याशिवाय, धूम्रपान करणार्याय महिलांची मुलांचा शारीरिक, बौद्धिक तसेच वर्तणूकविषयक विकास इतर मुलांच्या मानाने किंचित परंतु जाणवण्याइतपत कमी असतो. हे परिणाम बहुधा धुरातील कार्बन मोनोक्साइड आणि निकोटिनमुळे होत असावे. गर्भवतींनी इतरांकडून त्यांच्याकडे येणारा धूरदेखील (सेकंडहँड स्मोक) टाळावा कारण त्यामुळेही गर्भावर असेच घातक परिणाम होऊ शकतात.

मद्यार्क (दारू):

नवजातात जन्मजात व्यंगे आढळण्या मागील प्रमुख कारण म्हणजे गर्भावस्थेत मद्यपान करणे. फीटल अल्कोहोल सिंड्रोमसाठी आवश्यक ती दारूची मात्रा संशोधकांना अद्याप माहीत झाली नसल्याने गर्भवतींनी एकंदरीनेच मद्यपान टाळावे हे उत्तम. गर्भावस्थेत दारू पिण्याने फार मोठे परिणाम होतात.
गर्भावस्थेदरम्यान दारू पिणार्या महिलांच्या बाबतीत गर्भपाताची शक्यता, न पिणार्याप गर्भवतींच्या मानाने, जवळपास दुप्पट असते – मोठ्या प्रमाणात पिणार्यानचे बाबतीत अजूनच जास्त. बरेचदा गर्भावस्थेत नियमितपणे दारू पिणार्यां्च्या नवजातांचे वजन इतर बाळांपेक्षा खूपच कमी असते – उदा. मोठ्या प्रमाणात दारू पिणार्यांजच्या नवजातांचे सरासरी वजन फक्त 4 पौंड भरते. सामान्यतः हे वजन 7 पौंड असते. तसेच गर्भावस्थेत दारू पिणार्यांनच्या नवजातांची वाढ नीट होत नाही व ते काही काळातच मरून जाण्याची शक्यता असते.

गर्भावस्थेमध्ये दारू पिण्याने होणारा सर्वांत गंभीर परिणाम म्हणजे फीटल अल्कोहोल सिंड्रोम. अधूनमधून म्हणजे दिवसाला तीन पेग्ज घेतल्यानेही हा आजार होऊ शकतो. 1,000 जिवंत नवजातांपैकी सुमारे दोघांमध्ये ही लक्षणे आढळतात. ह्या आजाराची लक्षणे म्हणजे जन्माआधी किंवा जन्मानंतरची अपुरी वाढ, चेहर्यााची व्यंगे, डोके छोटे असणे (बहुधा मेंदूची वाढ कमी झाल्याने), अपुरी मानसिक वाढ तसेच वर्तणूकविषयक विकास नीटपणे न होणे. कधीकधी सांध्याची जागा व वाढ नेहमीसारखी नसते आणि हृदयाचे दोषही आढळतात.
गर्भावस्थेत दारू पिणार्याू महिलांची बाळे किंवा वाढत्या वयाच्या मुलांमध्ये वर्तणूकविषयक बर्यावच समस्या दिसतात. उदा. सामाजिकदृष्ट्या अयोग्य वागणे किंवा लक्ष न लागणे (स्थिरचित्त नसणे – अटेंशन डेफिसिट डिसॉर्डर). अशा बाळाला उघड दिसणारी जन्मजात व्यंगे नसली तरीही ह्या समस्या असू शकतात.

कॅफीन:

गर्भावस्थेत कॅफीन म्हणजेच कॉफी प्यायल्याने गर्भाला अपाय होतो की नाही हे अजून निश्चित माहीत नाही. असे दिसते की गर्भावस्थेत कमी प्रमाणात कॅफीन घेतल्याने (उदा. दिवसाला एक कप कॉफी) गर्भाला फारसा धोका नसतो. कॅफीन हे द्रव्य कॉफी, चहा, काही प्रकारचे सोडा, चॉकलेट आणि काही औषधांमध्ये आढळते. कॅफीन हे उत्तेजक (स्टिम्युलंट) आहे व ते नाळेला सहजपणे पार करून गर्भापर्यंत पोहोचते. ह्यामुळे गर्भापर्यंत उत्तेजना पोहोचून त्याच्या हृदयाचे ठोके वाढतात. कॅफीनमुळे कधीकधी नाळेतून होणारा रक्तप्रवाहदेखील कमी होतो आणि लोह शोषले जाण्याचे पमाणदेखील घटते – ह्यामुळे पंडुरोग उर्फ ऍनिमिया होण्याची शक्यता वाढते. काही वेळा असे दिसले आहे की दररोज सातपेक्षा जास्त कप कॉफी प्यायल्यास मृत मूल जन्माला येण्याचा, अकाली प्रसव होण्याचा, नवजाताचे वजन कमी असण्याचा किंवा गर्भपाताचा धोका वाढतो. काही तज्ञांच्या म्हणण्यानुसार कॉफीपान मर्यादेत ठेवणे किंवा डीकॅफिनेटेड् म्हणजे कॅफीनचा अंश काढून टाकलेली पेये पिणे चांगले.

ऍस्पार्टेम:

ऍस्पार्टेम हा कृत्रिमरीत्या गोडी वाढवणारा पदार्थ (आर्टिफिशिअल स्वीटनर) आहे. हा गर्भावस्थेत अगदी थोड्या प्रमाणात घेतल्याने फारसा धोका नसतो. उदा. असा पदार्थ असलेले नेहमीचे अन्न वा पेये. परंतु फेनिलकेटूर्निया ह्या वेगळाच आजाराने ग्रस्त असलेल्या गर्भवतींनी कोणत्याही परिस्थितीत ऍस्पार्टेम घेऊ नये.

स्तनपान करवताना औषधे घेणे

बाळास अंगावर पाजणार्याख मातेला एखादे औषध घेणे गरजेचे असल्यास तिने स्तनपान करणे थांबवावे अथवा नाही हे खालील बाबींवर अवलंबून आहे -

  • औषध दुधात मिसळण्याचे प्रमाण किती आहे
  • हे औषध प्रत्यक्ष बाळापर्यंत पोहोचते आहे काय
  • बाळावर औषधाचा काय परिणाम होऊ शकतो
  • बाळ किती दूध पिते आहे (हे प्रमाण बाळाचे वय आणि त्याला दिले जाणारे इतर अन्न ह्यावर अवलंबून राहील)
  • काही औषधे आईच्या दुधात मिसळत नाहीत. उदा. एपिनेफ्रिन, हिपारिन, इन्शुलिन इ. (ह्यूम्यूलिनोव्होलिन) व त्यामुळे ती घेणे सुरक्षित आहे. बहुसंख्य औषधे आईच्या दुधात मिसळतात परंतु त्यांचे प्रमाण अगदीच कमी असते. अर्थात काही औषधांचे प्रमाण अगदी कमी असले तरीही बाळास अपाय होऊ शकतो. काही औषधे आईच्या दुधात मिसळतातही परंतु प्रत्यक्ष बाळापर्यंत पोहोचणारे प्रमाण नगण्य असल्याने फारसा फरक पडत नाही. उदा. जेंटामायसिन, केनामायसिन स्ट्रेप्टोमायसिन तसेच टेट्रासायक्लिन ही प्रतिजैविके.

सुरक्षित मानली जाणारी औषधे साधारणतः डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय मिळणारी (नॉन-प्रिस्क्रिप्शन ड्रग्ज) असतात. परंतु ऍँटिहिस्टामाइन्स ह्याला अपवाद आहेत (सर्दीपडशावरील औषधे, वावड्यावरील (ऍलर्जी) औषधे, गाडी लागण्यावरील औषधे, झोप येण्यासाठीची औषधे इ.मध्ये ही असतात). ऍस्पिरिन आणि इतर सॅलिसायलेट्सचाही समावेश, दीर्घकाळपर्यंत घेतल्यास, ह्यांमध्ये होतो.

त्वचा, डोळे किंवा नाकाला लावली जाणारी औषधे अथवा श्वासावाटे आत घेतली जाणारी औषधे साधारणपणे सुरक्षित असतात. ऍँटिहायपरटेंसिव्ह प्रकारची बहुसंख्य औषधे आईचे दूध पिणार्याा बाळांच्या दृष्टीने बर्यालपैकी सुरक्षित असतात. स्नपान करवणार्याध स्त्रिया बीटा-ब्लॉकर्स घेऊ शकतात परंतु बाळावर त्याचे इतर परिणाम (साइड-इफेक्ट्स) होत नाहीत ना हे वारंवार तपासावे लागते. उदा. हृदयाच्या स्पंदनाचा वेग घटणे, रक्तदाब कमी असणे इ. पूर्ण दिवसांचे व निरोगी बाळ असल्यास (कौमाडिन) घेतले तरी चालते परंतु त्यावर नजर ठेवावी लागते. कॅफीन आणि थिओफायलिन (थिओलेयर) मुळे आईचे दूध पिणार्याे बाळांना त्रास होत नाही परंतु कधीकधी ती चिडचिडी बनतात. बाळाच्या हृदयाच्या स्पंदनाचा तसेच श्वासाचा दर वाढू शकतो. आईचे दूध पिणार्याय बाळांसाठी काही औषधे सुरक्षित मानली जात असली तरीदेखील असा महिलांनी कोणतेही औषध – अगदी औषधाच्या दुकानातील साध्या गोळ्या किंवा वनौषधींदेखील - घेण्यापूर्वी आरोग्यसेवकाचा सल्ला घ्यावा. सर्व औषधांची नावे, लेबल्स इ. तपासून त्यांवर स्नपान करवणार्याी महिलांसाठी काही धोक्याची सूचना इ. नाही ना हे पहावे.

काही औषधे डॉक्टरांच्या देखरेखीखाली घ्यावी लागतात. स्तनपान करवण्याच्या काळात ती घ्यायची असल्यास गरजेप्रमाणे त्यांचा डोस (मात्रा) कमीजास्त करावा लागतो, त्यांच्या वापरावर काही कालमर्यादा घालावी लागते किंवा ती घेण्याची वेळ स्नपानाच्या वेळेनुसार ठरवावी लागते. बरीचशी ऍँटि-ऍँक्झायटी (चिंतारोधक), ऍँटि-डिप्रेसंट (निराशारोधक) तसेच ऍँटिसायकॉटिक (मनस्थितीविषयक) औषधे डॉक्टरांच्या देखरेखीखाली घ्यायची असतात – त्यांचा बाळावर फारसा विपरित परिणाम होणार नसला तरीही. मात्र ही औषधे शरीरत बराच काळपर्यंत राहतात आणि बाळाला, त्याच्या आयुष्याच्या पहिल्या काही महिन्यांत, ही औषधे शरीरबाहेर टाकणे कठीण जाते आणि अशा वेळी त्यांचा परिणाम बाळाच्या चेतासंस्थेवर होऊ शकतो उदा. (चिंतारोधक) डायझेपाम (डाएस्टॅटव्हॅलिअम) ह्या बेंझोडायझेपिन प्रकारच्या औषधामुळे आईचे दूधपित्या बाळांमध्ये आळशीपणा, मंदपणा किंवा वजन घटण्यासारख्या समस्या दिसू शकतात. आकडीरोधक (ऍँटिकंव्हल्संट) आणि बार्बिट्युरेट असलेले फेनोबार्बिटाल (ल्युमिनाल), हे औषध शरीरातून बाहेर जाण्यास वेळ लागत असल्याने बाळाचा झोपाळूपणा फारच वाढतो. अशा परिणामांमुळे डॉक्टर बेंझोडायझेपिन आणि बार्बिट्युरेट्सचा डोस कमी करतात आणि स्तनपान करवणार्या स्त्रियांनी केलेल्या ह्या औषधांच्या वापरावर नजर ठेवतात.

महत्त्वाच्या खबरदार्या

  • स्नपान करवणार्‍या मातांना त्यांच्या बाळाला अपाय करू शकेल असे एखादे औषध घेणे आवश्यकच असल्यास त्यांनी स्नपान थांबवणे गरजेचे आहे. परंतु औषधाचा वापर करणे थांबवल्यानंतर त्यांनी पुनः बाळास आपले दूध पाजायला हरकत नाही. औषध घेत असण्याच्या काळात अशा स्त्रिया आपले दूध पिळून काढून टाकू शकतात.
  • धूम्रपान करवणार्‍या स्त्रियांनी धूम्रपानानंतर किमान 2 तास थांबूनच स्तनपान करवावे. तसेच बाळासमोर कधीही धूम्रपान करू नये - मग त्यावेळी त्या स्तनपान करवीत असोत अथवा नसोत. धूम्रपानामुळे आईस येणार्‍या दुधाचे प्रमाण कमी होते शिवाय त्यामुळे बाळाचे वजन वाढण्याच्या क्रियेत अडथळे येतात.
  • मोठ्या प्रमाणात मद्यपान केल्याने बाळ झोपाळू बनते आणि त्यास मोठ्या प्रमाणात घाम येऊ शकतो.

अवैध औषधे

गर्भारपणात अवैध औषधांचा वापर – विशेषतः मादक किंवा नशा आणणार्याय – केल्याने प्रसूतीमध्ये गुंतागुंत वाढू शकते तसेच गर्भामध्ये किंवा नवजातामध्ये गंभीर समस्या असू शकतात. गर्भवतींनी अशी औषधे इंजेक्शनच्या सहाय्याने अंगात टोचून घेतल्याने त्यांना असलेला जंतुसंसर्गाचा धोका वाढतो किंवा असे संसर्ग गर्भापर्यंत पोहोचू शकतात. अशा संसर्गांमध्ये हेपेटायटिस व लैंगिक आजारांचा समावेश असू शकतो (एड्ससहित). शिवाय गर्भवतींनी अवैध व नशाकारक औषधे घेतल्याने गर्भाची वाढ अपुरी होण्याची शक्यता वाढते आणि वेळेआधीच प्रसूतीदेखील होऊ शकते.
कोकेनसारखी मादक द्रव्ये घेणार्याथ आयांची मुले बरेचदा समस्याग्रस्त असतात खरी परंतु कोकेन हेच ह्या समस्यांचे कारण आहे काय हे अद्याप स्पष्ट नाही. धूम्रपान, इतर अवैध औषधांचा वापर, गर्भावस्थेत इतर काळजी न घेणे किंवा गरीबी हीदेखील कारणे असू शकतील.

ओपिऑइड्स (मादक द्रव्ये)

हेरॉइन, मेथॅडोन आणि मॉर्फिनसारखी मादक द्रव्ये नाळेतून सहजपणे पार होतात. परिणामी गर्भालाही त्यांची नशा चढते आणि असे बाळ जन्मानंतर 6 तास ते 8 दिवस एवढ्या काळात तशी लक्षणे (वुइथड्रॉवल सिंप्टम्स) दाखवू शकते. परंतु मादक द्रव्यांमुळे जन्मजात व्यंगे उद्भवत नाहीत. गर्भावस्थेत मादक द्रव्ये घेतल्याने प्रसूतीसंबंधीची गुंतागुंत वाढते - उदा. गर्भपात, मूल चुकीच्या स्थितीत असणे, वेळेआधीच प्रसूती इ. तसेच हेरॉइन घेणार्यांदची बाळे आकाराने लहान असतात.

ऍँफेटामाइन्स

गर्भावस्थेत ऍँफेटामाइन्स वापरल्याने बाळामध्ये जन्मजात व्यंगे उद्भवू शकतात, विशेषतः हृदयाची.

मारीवाना (अफू)

गर्भावस्थेत अफू घेतल्याने गर्भास अपाय होतो काय हे अद्याप स्पष्ट नाही. ह्या मादक द्रव्याचा मुख्य घटक टेट्राहायड्रोकॅनाबिनॉल नाळेत प्रवेश करून गर्भावर परिणाम करू शकतो. परंतु अफूमुळे जन्मजात व्यंगे किंवा गर्भाची वाढ मंदावण्याची शक्यता आहे काय हे स्पष्ट नाही. गर्भावस्थेत अतिरेकी प्रमाणात अफू न घेतल्यास नवजातामध्ये वर्तणूकविषयक समस्या निर्माण होत नाहीत.

कळा तसेच प्रसूतीदरम्यान वापरलेली औषधे

स्थानिक पातळीवर भूल देणारी औषधे (लोकल ऍनास्थेटिक्स), मादक द्रव्ये, तसेच ऍनाल्जेसिक प्रकारची इतर औषधे नाळ पार करून गर्भावर विविध परिणाम करू शकतात. उदा. त्यांच्यामुळे एखाद्या नवजाताची श्वास घेण्याची ऊर्मीच कमी होते. म्हणूनच प्रसूतिपूर्व काळात ही औषधे गरजेची असली तरी त्यांचे प्रमाण, परिणाम होईल इतकेच, कमीतकमी ठेवावे. अन्यथा बाळाची लांबी नेहमीप्रमाणे वाढणार नाही परंतु वजन मात्र वाढेल.

स्त्रोत : पोर्टल कंटेंट टिम्

अंतिम सुधारित : 7/22/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate