अनेक औषधांचा गर्भावर वाईट परिणाम हित असतो. म्हणून कोणतेही औषध गरोदरपणी घेऊ नये. पण अगदीच गरज पडल्यास तज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधे घ्यावीत.
‘क्ष’ किरणाचा गर्भावर वाईट परिणाम होतो व त्यामुळे गर्भात व्यंग निर्माण होऊ शकते. म्हणून ‘क्ष’ किरण तपासणी करू नये. त्याऐवजी डॉक्टर सोनोग्राफी करून घेण्याचा सल्ला देतात. त्यामुळे गर्भाची स्थिती, वाढ, जूळ आहे का ? गर्भाचे दोष, व्यंग इ. अनेक गोष्टी समजू शकतात.
शेवटची मासिक पाळी कधी आली होती हे पाहतात. त्या तारखेत ९ ते ७ दिवस मिळवतात म्हणजे बाळंतपणाची संभाव्य तारीख कळते. उदा. १५ जाने २०११ ही शेवटच्या मासिक पाळीची तारीख असेल तर २२ ऑक्टोबर २०११ ही बाळंतपणाची संभाव्य तारीख असेल. दोन-चार दिवस इकडे- तिकडे होऊ शकतात.
स्त्रोत : गरोदरपण, माहिती व शिक्षण मार्गदर्शक पुस्तिका, वॉटरशेड ऑगनायझेशन ट्रस्ट
अंतिम सुधारित : 1/29/2020
अतिसार म्हणजे वारंवार मलप्रवृत्ती होणे, मल पातळ हो...
एक किंवा एकापेक्षा अधिक वेळा पातळ अगर पाण्यासारखी ...
डॉक्टर्स आणि नर्सेस एवढेच मनुष्यबळ गृहीत धरून स्वा...
म्हातारपण किंवा दीर्घ आजारपण यामुळे माणूस अंथरुणाल...