आंघोळ करताना स्तन व स्तनांची बोंडे नीट धुवावीत. दबलेली बोंडे बाहेर ओढून स्वच्छ करावीत. तसेच चिरा पडल्या असल्यास रोज तेल लावावे म्हणजे बाळाला पुढे दूध पिताना त्रास होणार नाही.
गरोदरपणात दातांची काळजी घेणे आवश्यक असते. दात रोज दोन वेळा ब्रश किंवा पावडरने स्वच्छ घासावीत. एकदा सकाळी उठल्याबरोबर रात्री झोपण्यापूर्वी स्वच्छ करावेत. काही खाल्ल्यानंतरही गुळणा करण्याची सवय चांगली असते. त्यामुळे दातांच्या भेगात अडकलेले अन्नाचे कण बाहेर पडतात. हिरड्यासुद्धा बोटाने चोळाव्यात.
गरोदरपणात चौथ्या महिन्यात पहिल्या व नंतर एक महिन्याने दुसरा डोस घ्यावा. त्यामुळे बाळाचे व आईचे धनुर्वातापासून संरक्षण होते.
आहारामध्ये दूध, पालेभाज्या, फळे यांचे प्रमाण कमी लोहाची कमतरता जाणवते. गरोदर स्त्रियांमध्ये रक्ताशयाचे/ आनिमियाचे बरेच प्रमाण दिसून येते. म्हणूनच त्यासाठी लोहाच्या गोळ्या दिल्या जातात. प्रत्येक गरोदर स्त्रीने निदान १०० दिवस तरी लोहाच्या गोळ्या घ्यायला पाहिजेत म्हणजे रक्ताक्षयाचा धोका टाळता येतो. लोखंडी कढईचा दररोजचे जेवण बनविण्याकरीता वापर केला तर त्या मध्ये जास्त प्रमाणात लोह मिळते. म्हणून गोळ्या घेत असतांना अशा प्रकारचे घरगुती उपाय देखील महत्त्वाचे ठरतात.
अशावेळी गरोदरपण हे जोखमीचे समजले जाते, त्यामुळे अशावेळी विशेष काळजी घ्यावी लागते. तसेच रक्तदाब वाढलेला असणे, अंगावरून अधिक रक्तस्त्राव होणे, पोटात दुखणे, डोके खूप दुखणे, पायावर सूज असणे इ. लक्षणे असतील तरीही अधिक काळजी घ्यावी लागते व लगेच डॉक्टरांकडे जाने गरजेचे असते.
स्त्रोत : गरोदरपण, माहिती व शिक्षण मार्गदर्शक पुस्तिका, वॉटरशेड ऑगनायझेशन ट्रस्ट
अंतिम सुधारित : 7/29/2020
एक किंवा एकापेक्षा अधिक वेळा पातळ अगर पाण्यासारखी ...
डॉक्टर्स आणि नर्सेस एवढेच मनुष्यबळ गृहीत धरून स्वा...
या विभागात अ जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे म्हणजेच योग...
अतिसार म्हणजे वारंवार मलप्रवृत्ती होणे, मल पातळ हो...