गरोदरपणात हलकी फुलकी कामे करायला काहीच हरकत नाही. स्वयंपाक करणे, झाडलोट करणे, भांडी करणे अशी सहज करता येण्याजोगी कामे करावीत. शेतीची पण कमी श्रमाची कामे करावीत.
गरोदरपणात जड उचलणे, जड ढकलणे, शिडीवर चढणे अशी कुठलीही कामे करू नयेत. जड ओझी वाहू नयेत. पाण्याचा हंडा वर उचलणे किंवा डोक्यावरून आणणे टाळावे. सारासार विचार करून अतिश्रमाची व पोटावर ताण पडतील अशी कामे टाळावीत.
गरोदरपणी थोडातरी व्यायाम रोज करावा. चालण्याचा व्यायाम चांगला. ज्यांना दिवसभर काही ना काही कामे करावे लागते त्यांना व्यायामाची फारशी आवश्यकता नसते ही गोष्ट खरी असली तरी बाळंतपण सुलभ होण्याच्या दृष्टीने हलका-फुलका व्यायाम हा चांगला ठरतो. मोकळ्या हवेत फिरायला जाने अधिक चांगले असते. काही सहज सुलभ योगासने तज्ञांच्या सल्ल्याने करावीत.
गरोदर मातेने दुपारी दोन तास तरी विश्रांती घ्यावी. त्यामुळे मन प्रसन्न, ताजेतवाने राहते. या काळात कुठलेही दडपण किंवा ताण घेऊ नये. तसेच गरोदर मातेने नेहमी आनंदी राहावे.
गरोदरपणात रात्री ८ ते ९ तास शांत झोप मिळाली पाहिजे. शेवटच्या काही महिन्यात गर्भाचा दाब जठारावर पडतो. त्यासाठी डोक्याशी उशी घेऊन डाव्या कुशीवर झोपावे म्हणजे दाब पडणार नाही व झोपही चांगली लागेल. दुपारीही १ ते २ तास झोप किंवा विश्रांती घेतली पाहिजे. या काळात झोपताना नेहमी डाव्या कुशीवर झोपावे.
स्त्रोत : गरोदरपण, माहिती व शिक्षण मार्गदर्शक पुस्तिका, वॉटरशेड ऑगनायझेशन ट्रस्ट
अंतिम सुधारित : 1/29/2020
सांगली जिल्ह्यात दुष्काळी जत तालुक्यातील वळसंग ये...
वर्षभर पद्धतशीर अवकाश निरीक्षण करणार्यास सर्व अवक...
आपत्तीच्या काळात जिल्हा माहिती कार्यालयाची जबाबदार...
लोकांनी आरोग्यविषयक गैरसमजुती, चुकीच्या सवयी टाकून...