बाळाच्या जन्मानंतर आईच्या शरीरात, विशेषतः लैंगिक अवयवांमध्ये बदल घडतात. हे अवयव परत आपल्या गरोदरपणापूर्वीच्या स्थितीत येतात त्या काळाला वैद्यकीय भाषेत प्रसवोत्तर काळ (प्युर्पेरिअम) असे म्हणतात.
प्रसूतीपश्चात मानसिक औदासिन्य म्हणजे प्रसूतीनंतरचे सुरुवातीचे काही आठवडे किंवा महिने अतिशय उदास वाटणे किंवा संबंधीत मानसिक ताणतणावाची भावना वाटणे.
बाळंतपण ही नैसर्गिक क्रिया असली तरी काही बाळंतपणात आई व जन्मणारे मूल यांना त्रास होऊ शकतो. यामध्ये बाळंतपन कसे होते याची माहिती दिली आहे.
बाळंतपण घरीच करावयाचे असल्यास कोणती पूर्वतयारी करावी ? बाळंतीणीची खोली कशी असावी ? बाळंतपणाच्या वेळी स्वच्छतेची किंती काळजी दाईने प्रथम घेतली पाहिजे ? याची माहिती दिली आहे.
कोणतेही बाळंतपण दवाखान्यातच होणे चांगले असते. पण गरोदरपणात ज्यांना विशेष काळजी घ्यायला सांगते अशी जोखमीची किंवा धोक्याची सारी बाळंतपणे मात्र दवाखान्यात केली पाहिजेत.
गरोदरपणाची सूचना मासिक पाळी चुकण्यावरून मिळते.
बाळंतपणानंतर आहार कसा असावा व काय काळजी घ्यावी याची माहिती यामध्ये दिली आहे.
गर्भाशयास जंतूदोष निर्माण होऊन, गर्भाशयातून येणाऱ्या स्त्रावाला दुर्गंधी येऊ शकते. खूप ताप येतो आणि कधी कधी तापमान एकदम खाली येऊन अंग गार लागते.
बाळाचे डोके मोठे असून जन्ममार्ग लहान असल्यास, मूल आडवेतिडवे असल्यास, आईचा रक्तदाब वाढला, मधुमेह असेल तर, नाळ बाळाच्या मानेभोवती असल्यास बाळंतपण अडचणीत येते व त्यासाठी सिझेरियन करावे लागते.