बाळाच्या जन्मानंतर आईच्या शरीरात, विशेषतः लैंगिक अवयवांमध्ये बदल घडतात. हे अवयव परत आपल्या गरोदरपणापूर्वीच्या स्थितीत येतात त्या काळाला वैद्यकीय भाषेत प्युर्पेरिअम असे म्हणतात. हा प्रसूतीनंतरचा काळ सहा आठवडयांपर्यंत (४२ दिवस ) चालू राहतो. ह्या काळाच्या शेवटी तुम्हाला परत सामान्य स्थितीत आल्यासारखे वाटते. फक्त काही बदल जाणवू शकतात. जसे की थोडे वाढलेले वजन. कदाचित हेच कारण आहे की परंपरागत संकल्पनांनुसार प्रसूतीनंतर ४० दिवस (सव्वा महिना) बहुतेक भारतीय घरांमध्ये बंधन पाळले जायचे. यामुळे स्त्रीला तब्येत सुधारायला वेळ मिळे.
बाळाच्या जन्मानंतरचे पहिले २४ तास (सुरुवातीचे प्युर्पेरिअम) स्थिती खूपच नाजुक असते. हीच वेळ असते जेव्हा आपले गर्भाशय व्यवस्थित आखडले जाते, जेणेकरुन नाळ जोडलेल्या ठिकाणातून होणारा रक्तस्त्राव थांबेल. याचवेळी स्तनपानास आणि आई व बाळामध्ये नाते जुळण्यास सुरुवात होते. कधीकधी ह्यावेळी प्रसूतीमुळे जिवाला धोकादायक अशा गुंतागुंती निर्माण होतात. ह्यामध्ये प्रसूतीनंतरचा अधिक रक्तस्त्राव, रक्तप्रवाह कोसळणे, ह्रदयाघात, इत्यादी मोडतात. हे फार सर्वसाधारण नाहीत, पण सामान्य योनीमार्गाद्वारा झालेल्या प्रसूतीमध्येसुद्धा मृत्यूचा धोका असतो. सुमारे १०००० स्त्रियांमध्ये १. हा धोका अशा स्त्रियांमध्ये जास्त असतो ज्या पूर्वीपासून शारीरिकदृष्ट्या दुर्बळ असतात, जसे, रक्तक्षय, उच्च रक्तदाब किंवा हृदयरोग. हा धोका सिझेरियन प्रसूतीमध्येसुद्धा जास्त असतो. म्हणूनच अशा स्त्रियांना प्रसूतीनंतर किमान २४ तास दवाखान्यात राहण्याचा सल्ला दिला जातो.
ही वेळ प्रसूतीनंतर दुस-या दिवसापासून सातव्या दिवसापर्यंतची असते. ह्या कालावधीमध्ये योनी मार्गात अधिकांश बदल होतात. शक्यतः हीच वेळ आपल्या “आई”च्या नवीन भूमिकेत जास्तीतजास्त अंगवळणी पडण्याची असते. आपण आपल्या बाळाला घेऊन आपल्या घरी जाता. तुलनात्मक दृष्टीने अजून काही लहान, पण महत्त्वाचे शारीरिक बदल आहेत जे आपल्याला माहिती असणे आवश्यक आहे.
यात खालील बाबी अंतर्भूत आहेत:
लोकिया/ योनीतून स्त्राव होणे:
म्हणजे मुख्यत: गर्भाशयाचा आतली बाजू झडून योनीतून स्त्राव होतो. पहिल्या चार दिवसांत रक्तस्त्राव जास्त असतो, जसे मसिक पाळीत होते. शक्यतो एकाच वेळी दोन पॅड वापरावे लागतात आणि दिवसातून ३-४ वेळा ते बदलावे लागतात. पण जर अती प्रमाणात रक्तस्त्राव होत असेल किंवा रक्ताच्या गुठळ्या बाहेर पडत असतील, तर आपल्या डॉक्टरांना याची जाणीव करून देणे आवश्यक आहे. बहुदा पाचव्या दिवसापर्यंत स्त्राव कमी होतो आणि तो शक्यतो लालसर पिवळ्या ते तपकिरी रंगात असतो. आपल्याला तरीही दिवसात 2-3 पॅड वापरावे लागू शकतात. बहुदा हा स्त्राव दुस-या आठवड्यापर्यंत थांबतो. त्यानंतर स्त्राव पांढ-या रंगाचा होतो. एपीसियोटोमी (चीरा) ची चांगली स्वच्छता आणि काळजी घेतली तर आजारांच्या संक्रमणापासून वाचता येऊ शकते. कोणताही दुर्गंधीयुक्त स्त्राव होत असेल तर याची आपल्या डॉक्टरांना जाणीव करून देणे आवश्यक आहे.
पहिल्या दिवशी आपण किमान दर २-३ तासांमध्ये एकदा लघवीला जायला पाहिजे, जरी टाक्यांमुळे त्रास होत असला तरीही. कारण आपल्याला जाणीव न होता आपले मूत्राशय भरू शकते. यामुळे नंतर समस्या होऊ शकते, विशेषकरून आजारांचे संक्रमण. पहिल्या आठवड्यामध्ये आपल्याला जास्त प्रमाणात लघवीला जावेसे वाटेल. याचे कारण असे आहे की आपले शरीर जास्त प्रमाणात असलेले पाणी आणि क्षार शरीरातून बाहेर टाकते जे गरोदरपणात शरीरात साचलेले असते.
प्रसूती नंतर पहिल्या दोन दिवस आपल्याला व्यवस्थित शौचास होत नसेल याची वेगवेगळी कारणे आहेत. एक कारण हे की प्रसूतीवेदनांच्या वेळेस आपण काही खाल्लेले नसेल, आपण फार थकलेले असाल आणि आपल्याला झोप येत असेल. दुसरे कारण हे आहे की आपल्याला टाके घातलेल्या ठिकाणी दुखत असेल. अशा वेळी आपण आहारात जास्त प्रमाणात तंतुमय आणी तरल पदार्थ घेणे आवश्यक आहे. आपल्याला सारक (लॅक्झेटिव्ह) औषधांची सुद्धा गरज भासु शकते.
पहिल्या दिवशी आपल्याला आपल्या स्तनांतून फक्त पाणसट, पिवळट स्त्राव येईल, तो ख-या दूधासारखा वाटणार नाही. ह्याला कोलोस्ट्रम असे म्हणतात आणि त्यात पोषक तत्त्वे जास्त प्रमाणात असतात जी आपल्या बाळाला आवश्यक असतात. या वेळेत आपल्याला बाळाला पाजावे लागते. तिस-या दिवसापर्यंत दुधाचे प्रमाण जास्त होते, याचे कारण हे की आपल्या शरीरात अंतस्त्रावांमध्ये (हार्मोन्स) बदल होतो. स्तनांचे आटणे (एनगोर्जमेंट) टाळण्यासाठी नियमित स्तनपान करणे आवश्यक आहे.
जर आपल्याला टाके असतील तर आपल्याला निवांत आणि निरोगी राहण्यासाठी, मुख्यत: पहिल्या आठवड्यात, काही बाबींची तुम्हाला काळजी घ्यावी लागेल.
आधी चर्चा केल्यानुसार आपल्या शरीराला गरोदरपणातील बदल भरून काढण्यास ६ आठवडे लागतात म्हणून आपल्याला धीर धरायला पाहिजे. आपल्या आरोग्यातील बदल भरून काढण्याची प्रत्येक स्त्रीची क्षमता वेगवेगळी असते. पण बहुतेक प्रकरणांमध्ये नॉर्मल प्रसूतीनंतर आपल्याला आपल्या पूर्वीच्या कामाला परतण्यास एकच दिवस लागतो आणि घरगुती कामाला परतण्यास एक आठवडा लागतो. स्वत:ला जास्त ताण देऊ नये. हीच वेळ आहे जेव्हा आपल्याला आपला वेळ आपल्या बाळाला देणे आवश्यक आहे. दुस-यांकडून मदत घ्यावी जेणेकरून आपल्याला सोपे होईल. जटील प्रसूती किंवा सिझेरियन प्रसुतीनंतर आपल्याला दुप्पट वेळ लागू शकतो.
प्रसुतीच्या लगेचच नंतर लैंगिक संबंध टाळणे उत्तमच आहे. कारण आपले टाके आता ताजे आणि वेदनादायक असतात आणि योनीला आजारांचे संक्रमण होण्याची जास्त शक्यता असते, विशेषतः पहिल्या आठवड्यात. नाळ जोडलेली जागा आणि गर्भाशयाची आतील बाजू पूर्णपणे भरलेली नसते. म्हणूनच परंपरागत असा सल्ला दिला जातो की प्रसूतीनंतर ६ आठवडे लैंगिक संबंध टाळावे. पण जर आपल्याला अडचण नसलेली प्रसूती झाली असेल आणि जर आपल्याला काही त्रास/ समस्या नसेल तर लैंगिक संबंधाला परतू शकता. गरोदरपणाच्या शेवटच्या महिन्यांमध्ये आपल्याला आणि आपल्या पतीला एकमेकांकडून वंचित राहायला लागले असेल. त्यामुळे आपल्याला आपले लैंगिक जीवन ताजे करावेसे वाटेल यात काही वावगे नाही. जोपर्यंत प्रत्यक्ष लैंगिक संबंध ठेवण्यास आपल्याला योग्य वाटत नाही तोपर्यंत दुस-या पद्धतीने प्रेमाचे प्रदर्शन करणे जसे कळजी घेणे आणि जिव्हाळा पुरेसे असते. आलिंगन, चुंबन, छेडणे किंवा हात लावणे हे गरोदरपणाच्या काळात आणि प्रसूतीनंतर केव्हाही करू शकतो.
जेव्हा आपण पूर्णपणे स्तनपान करता तेव्हा शरीरातील अंतस्त्राव आपल्या योनीतील अण्डोत्सर्ग (ओव्युलेशन) आणि मासिक पाळी थांबवते.
आपल्याला काही महिने मासिक पाळी येणार नाही. स्तनपानाची पद्धत आणि वारंवारता यानुसार काही स्त्रियांना मासिक पाळी सुरू होण्यास एक वर्ष पण लागू शकते.
वेळ
स्तनपान नसले की
स्तनपान असले की
मासिक पाळी
६-१२ आठवडे
३६ आठवडे (सरासरी)
शीर्घातिशीर्घ् अण्डोत्सर्ग
४ आठवडे
१२ आठवडे
अण्डोत्सर्ग होण्यासाठी लागणारे सरासरी वेळ
८-१० आठवडे
१७ आठवडे (बदलू शकते)
याचे अर्थ असा आहे का की आपण परत गरोदर होऊ शकत नाही? उत्तर आहे, नाही. सुमारे ५% महिला प्रसूतीनंतर मासिक पाळी सुरू होण्याअगोदर परत गरोदर होऊ शकतात. स्तनपानामुळे मासिक पाळी बंद होणे (मासिक पाळी होत नाही) ही वेळ काही प्रमाणात आपल्याला परत गरोदर न होण्यापासून मदत करते. असे असतानाही, आपण स्तनपान करताना मासिक पाळी बंद होण्याच्या वेळेवर परत गरोदर न होण्यास अवलंबून राहू शकता जर खालील ३ अटी पाळल्या तर:
जर आपण स्तनपान करताना मासिक पाळी बंद होण्यावर अवलंबून आहात, तर आपण सुरक्षित असू शकता. जर नाही, तर हे आपल्याला एका महत्त्वाच्या प्रश्नाकडे घेऊन जाते: आपण दुस-या गरोदरपणासाठी तयार आहात का? आपल्याला शरीरास परत पूर्वीप्रमाणे होण्यास वेळ दिला पाहिजे, आपल्या बाळाला वाढण्यास वेळ दिला पाहिजे आणि स्वत:ला ‘आई’च्या नवीन भूमिकेत जमवून घेण्यास वेळ दिला पाहिजे. नक्कीच, हा एक वैयक्तिक प्रश्न आहे पण दोन गरोदरपणांमध्ये किमान २ वर्ष फरक असण्यास सल्ला दिला जातो.
आपण प्रसूतीनंतरच्या काळात परत गरोदर होणे कसे टाळू शकता?
खूप सारे उपाय आहेत. प्रसूतीनंतरच्या काळात काही घटक आहेत जे आपल्याला लक्षात ठेवणे आवश्यक आहे:
ही फार विश्वसनीय पद्धत आहे. ती बसविण्यासाठी डॉक्टरांकडे एकदाच जावे लागते आणि ते गुंगीशिवाय करता येऊ शकतो. ते सरासरी ३-५ वर्ष प्रभावी असते (उपकरणावर अवलंबून) आणि लैंगिक संबंधाच्या बाबतीत अपक्ष आहे, जसे निरोध नाही. ज्या स्त्रियांना एक किंवा दोन मूले आहेत त्यांच्यासाठी ही एक फार प्रचलित पद्धत आहे. खरेतर हा पर्याय कायमच्या पद्धतीसाठीही वापरता येऊ शकतो. आपल्या प्रसूतीनंतरच्या पहिल्या तपासणीच्या वेळेसच (प्रसूती नंतर ६ आठवडे) आययूसीडी लावून घेऊ शकतो किंवा यानंतर जरी आपल्याला मासिक पाळी सुरू झाली नसेल तरी, आपल्या शरीराची आतील तपासणी व्यवस्थित केली जावी.
गर्भ निरोधक गोळ्या
पूर्णपणे स्तनपान करत असताना, संयुक्त गर्भ निरोधक गोळ्या (ईस्ट्रोजेन + प्रोजेस्टरोन) घेतले की दूध कमी होऊ शकते. म्हणून जास्त करून गोळ्या घेण्याचा सल्ला दिला जात नाही. एकदा वीनिंग (अपस्तनन- दूध सोडवणे) सुरू झाल्यावर, गर्भ निरोधक गोळ्या सुरक्षितपणे वापरू शकतो.
पहिल्या तपासणीच्या वेळेस डॉक्टर खालील बाबी तपासतील
आपल्याला काही चाचण्या कराव्या लागतील. आपल्याला आपल्या डॉक्टरांशी चर्चा करावी लागेल
आपण आता आपल्या प्रवासाच्या शेवटाला पोचला आहात—कसा होता हा प्रवास? आपले विचार आम्हाला कळवा— ई-मेल
स्तोत :पोर्टल कंटेंट टिमअंतिम सुधारित : 1/29/2020
या विभागात अ जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे म्हणजेच योग...
एक किंवा एकापेक्षा अधिक वेळा पातळ अगर पाण्यासारखी ...
म्हातारपण किंवा दीर्घ आजारपण यामुळे माणूस अंथरुणाल...
अतिसार म्हणजे वारंवार मलप्रवृत्ती होणे, मल पातळ हो...