कोणतेही बाळंतपण दवाखान्यातच होणे चांगले असते. पण गरोदरपणात ज्यांना विशेष काळजी घ्यायला सांगते अशी जोखमीची किंवा धोक्याची सारी बाळंतपणे मात्र दवाखान्यात केली पाहिजेत. म्हणजे मातेचा किंवा बाळाचा धोका टाळता येतो.
जवळपास दवाखाना असल्यास बाळंतपण दवाखान्यातच होणे चांगले. बाळंतपणाच्या कळा येऊ लागल्या की गरोदर स्त्रीला दवाखान्यात न्यावे. साधारणपणे बाळंतपणाच्या अगोदर १० ते १२ तास या बाळंतपणाच्या कळांना सुरुवात होते.
बाळंतपण ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे असे असले तरी काही वेळा त्यात अडचणी येऊ शकतात. त्यामुळे बाळंतपण हे घरातील किंवा शेजारचे कोणीही करू शकेल असे समजू नये. प्रशिक्षित दाई किंवा नर्स बाळंतणाचे वेळी हजर असली पाहिजे. त्यामुळे अडचणीच्या वेळी माता व बाळ यांची तब्येत सुरक्षित राहते. धनुर्वात किंवा इतर संसर्गही होत नाहीत. अवघड बाळंतपण मात्र दवाखान्यात व्हायला पाहिजे.
खरे म्हणजे बाळंतपण हे दवाखान्यातच होणे अधिक चांगले असते. कारण तिथे सर्व प्रकारची व्यवस्था असते. बाळंतपण अवघड असेल तर ते बाळंतपण दवाखान्यातच झाले पाहिजे म्हणजे धोका टळू शकतो. पूर्वी सिझेरियन झालेले असेल/ पूर्वीच्या बाळंतपणात खूप रक्तस्राव झालेला असे, रक्तगट आर.एच. निगेटिव्ह असेल तर अशी बाळंतपणे दवाखान्यातच झाली पाहिजेत. याशिवाय गरोदर स्त्रीचे वय २० वर्षाच्या आत असेल किंवा ३० ते ३२ वर्षाच्या पुढे असेल, स्त्रीचे चौथे किंवा त्या पुढचे बाळंतपण असेल, उंची कमी असेल किंवा रक्तदाब, क्षय, कावीळ इ. गंभीर आजार असल्यासही सर्व बाळंतपणे अवघड जोखमीची समजली जातात. म्हणून ती दवाखान्यातच झाली म्हणजे धोका टळू शकतो. जवळच्या हॉस्पिटलची माहिती ( वेळ, फोन नंबर, डॉक्टरचे नाव, दवाखान्यामधील सोयीसुविधा) याबद्दलची माहिती आपल्याजवळ आधीच लिहिलेली असावी. वाहनाची सोय सुद्धा बघून ठेवावी.
वर पडायला उशीर लागणे, बाळंतपण होऊन अर्धातास झाला तरी वर बाहेर न पडणे, गर्भाशय बाहेर येणे, पोट दुखणे, एकदम रक्तस्राव होणे व तो न थांबणे, श्वास घेण्यास त्रास होणे, लघवी करताना त्रास होणे, ताप येणे, खालची जागा /मायांग फाटणे, अशा प्रकारचा त्रास होऊ शकतो. अशावेळी ताबडतोब डॉक्टरांना दाखवणे आवश्यक असते.
स्त्रोत : बाळंतपण, माहिती व शिक्षण मार्गदर्शक पुस्तिका, वॉटरशेड ऑगनायझेशन ट्रस्ट
अंतिम सुधारित : 8/2/2020
डॉक्टर्स आणि नर्सेस एवढेच मनुष्यबळ गृहीत धरून स्वा...
या विभागात अ जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे म्हणजेच योग...
म्हातारपण किंवा दीर्घ आजारपण यामुळे माणूस अंथरुणाल...
एक किंवा एकापेक्षा अधिक वेळा पातळ अगर पाण्यासारखी ...