गर्भाशयास जंतूदोष निर्माण होऊन, गर्भाशयातून येणाऱ्या स्त्रावाला दुर्गंधी येऊ शकते. खूप ताप येतो आणि कधी कधी तापमान एकदम खाली येऊन अंग गार लागते. अशावेळी त्वरित दवाखान्यात न्यावे नाहीतर जंतूसंसर्ग रक्तात पसरून गंभीर परिस्थिती होऊ शकते. कधी कधी स्तनांमध्ये गळू होते. डॉक्टरांकडून त्याची नीट माहिती करून घ्यावी. दर २ ते ३ तासांनी दूध पिळून काढणे किंवा गरम पाण्याचा शेक देऊन फरक पडतो पण त्याकडे दुर्लक्ष करू नये. क्वचित प्रसंगी गर्भाशयात रक्ताची गाठ किंवा वारेचा भाग राहिल्यास रक्तस्त्राव होऊ शकतो. या साध्या गोष्टी धोकादायक समजून वेळीच डॉक्टरांना दाखवून घ्यावे.
स्त्रोत : बाळंतपण, माहिती व शिक्षण मार्गदर्शक पुस्तिका वॉटरशेड ऑगनायझेशन ट्रस्ट
अंतिम सुधारित : 7/23/2020
अतिसार म्हणजे वारंवार मलप्रवृत्ती होणे, मल पातळ हो...
एक किंवा एकापेक्षा अधिक वेळा पातळ अगर पाण्यासारखी ...
प्रत्येकच रोग सर्वानाच होतो असं नाही परंतु बहुतांश...
योनिद्वारे रक्तस्रावाची कारणे अनेक आहेत. त्यांचे य...