बीजांडास अनेक प्रकारच्या गाठी येऊ शकतात. गाठ लहान असेल तर ओटीपोटात एक बाजूला लागते. कधीकधी या गाठी दुख-या असतात. यांतल्या काही प्रकारच्या गाठींमध्ये पाणी होते. अशा पाणीदार गाठींचे वजन एक-दोन किलोही भरू शकते.
गर्भाशय, बीजांड यांच्या गाठींचे प्राथमिक निदान पूर्वी हाताने तपासूनच होत होते. 'सोनोग्राफी' ही तपासणी यासाठी खूप उपयोगी ठरते. शंका आल्यावर लवकरात लवकर तज्ज्ञाकडे पाठवणे हीच सर्वात महत्त्वाची मदत आहे. सोनोग्राफीने छोटी गाठ किंवा कर्करोग शोधणे शक्य होते.
दुर्बिणतपासणी (एंडोस्कोपी) तंत्राने आता गर्भाशय व बीजांडाच्या गाठींचे रोगनिदान अगदी सोपे झाले आहे. यातून तपासणीसाठी नमुनाही घेता येतो. छोटया गाठी दुर्बिणीतून शस्त्रक्रियेने काढताही येतात.
लेखक : डॉ. श्याम अष्टेकर (MBBS, MD community Medicine)
संदर्भ : आरोग्याविद्या
अंतिम सुधारित : 4/22/2020
या विभागात अ जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे म्हणजेच योग...
डॉक्टर्स आणि नर्सेस एवढेच मनुष्यबळ गृहीत धरून स्वा...
एक किंवा एकापेक्षा अधिक वेळा पातळ अगर पाण्यासारखी ...
म्हातारपण किंवा दीर्घ आजारपण यामुळे माणूस अंथरुणाल...