वंध्यत्व हा पुनरुत्पादक यंत्रणेचा रोग असून त्यामुळे शरीराचं सर्वात मूलभूत कार्य – मूल जन्माला घालणं – हरवून बसतं. गर्भधारणा होणं ही एक गुंतागुंतीची प्रक्रिया असून ती अनेक घटकांवर अवलंबून असते. पुरुषाव्दारे सुदृढ शुक्रजंतू तयार होणं आणि स्त्रीव्दारे सुदृढ अंडं तयार होणं, अंडवाहक नलिका मोकळ्या असणं म्हणजे शुक्रजंतू अंड्यापर्यंत पोचेल, दोघांचं मिलन झाल्यानंतर अंडं फलित करण्याची शुक्रजंतुची क्षमता, फलित अंडं त्या महिलेच्या गर्भाशयात स्थापित केलं जाण्याची त्याची क्षमता आणि गर्भाची आवश्यक गुणवत्ता हे ते घटक आहेत.
अंततः, गर्भधारणा पूर्ण काळाची होण्यासाठी, गर्भ सुदृढ असावा आणि त्याच्या विकासासाठी त्या महिलेच्या शरीरातील हार्मोनल स्थिती पुरेशी असावी. यापैकी एखादा घटक जेव्हा बिघडलेला असेल तेव्हा वंध्यत्व येऊ शकतं.
पुरुषांमधे वंधत्वाचं सर्वात सामान्य कारण म्हणजे, शुक्रजंतू अजिबात तयार न होणे किंवा कमी तयार होणे. काहीवेळा, शुक्रजंतूच्या पेशी विकृत असतात आणि त्या अंड्यापर्यंत पोचण्यापूर्वी मरुन जातात. स्त्रियांमधे सर्वात सामान्य वंध्यत्वाचा घटक म्हणजे मासिक पाळीतील गडबड. अन्य कारणांमधे, अंडनलिका बंद असणे, जन्मजात व्यंग यामधे गर्भाशयाची रचना आणि त्यातील द्राव हे वारंवार गर्भपात होण्यासाठी कारणीभूत ठरतात.
कृत्रिम गर्भधारणा म्हणजे आयव्हीएफमधे, अंडी गर्भाशयातून शस्त्रक्रियेनं काढली जातात आणि शरीराच्या बाहेर त्यांचं शुक्रजंतुंशी मिलन केलं जातं. अंदाजे 40 तासांनी, ती अंडी फलित झाली आहेत का आणि त्यांचं पेशींमधे विभाजन होत आहे का ते तपासलं जातं. अशी फलित अंडी (गर्भ) नंतर त्या महिलेच्या गर्भाशयात स्थापित केली जातात, त्यामुळे अंडनलिकेला वगळलं जातं.
स्त्रोत : पोर्टल कंटेंट टिम
अंतिम सुधारित : 5/2/2020
एक किंवा एकापेक्षा अधिक वेळा पातळ अगर पाण्यासारखी ...
अतिसाराबाबतच्या माहितीचा प्रसार करणे व तिची अंमलबज...
प्रत्येकच रोग सर्वानाच होतो असं नाही परंतु बहुतांश...
योनिद्वारे रक्तस्रावाची कारणे अनेक आहेत. त्यांचे य...