पुरुषांच्या तपासणीनंतर स्त्रियांच्या तपासणीत गर्भाशयाची तपासणीगर्भनलिका मोकळी आहे की नाही, बीज तयार होते की नाही इत्यादी तपासणी केली जाते. सोनोग्राफी आणि गर्भनलिकांची क्ष किरण तपासणी करतात.वंध्यत्व तपासणीचे तंत्रज्ञान आता पुष्कळ प्रगत झाले आहे. यात शुक्रपेशी तपासणी,शरीरातील संप्रेरकांची पातळी तपासणी, गर्भाशयाची लॅपरॉस्कोपिक तपासणी, सोनोग्राफी,गर्भनलिका तपासणी इ. तंत्रे वापरली जातात. उपचाराच्या वेळेस यातल्या काही तपासण्या परत परत कराव्या लागतात.
शुक्रपेशी किंवा स्त्रीबीज नसेल तर गर्भधारणा होणे शक्य नसते. पण इतर कारणांवर उपचार होण्यासारखा असेल तर वंध्यत्वावर मात करता येते; यासाठी तज्ज्ञांची मदत लागते. अंधश्रध्दा न बाळगता सत्य परिस्थिती जाणून मार्ग काढणे आवश्यक असते. हे त्या जोडप्यास समजावून सांगणे आवश्यक आहे.
लेखक : डॉ. श्याम अष्टेकर (MBBS, MD community Medicine)
संदर्भ : आरोग्याविद्या
अंतिम सुधारित : 6/26/2020
पॉलिसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम (पीसीओएस) एक असा डिसऑर...
गुरांमधील वंध्यत्व हे भारतातील दुग्धशेती आणि दुग्ध...
योग्य वयोगटातील व मुले होण्याची इच्छा असलेल्या सर्...
एखाद्या जोडप्याला मूलबाळ होत नसल्यास दोघांपैकी एका...