অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

अकरावीत प्रवेश घेणाऱ्यांना वसतीगृह प्रवेशासाठी 10 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ

अकरावीत प्रवेश घेणाऱ्यांना वसतीगृह प्रवेशासाठी 10 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ

गुरुवार, ७ सप्टेंबर २०१७

मुंबई : आदिवासी विकास विभागामार्फत अनुसूचितजमातीच्या विद्यार्थ्यांसाठी वसतीगृह प्रवेश ऑनलाईन पद्धतीने प्रवेशप्रक्रिया सन 2017-18 पासून swayam.mahaonline.gov.in या संकेतस्थळावरुन राबविण्यात येत आहे. इयत्ता अकरावीमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना वसतीगृह प्रवेशासाठी 10 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. ही मुदतवाढ फक्त 26 जुलै, 2017 नंतर इयत्ता 11वी मध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी लागू राहील.

माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागाचे निकाल अनुक्रमे दि. 27 जून व 17 जून रोजी जाहीर झाले आहेत. त्याअनुषंगाने ज्या अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांनी पुढील शिक्षणाकरिता महाविद्यालयात प्रवेश घेतलाआहे, अशा विद्यार्थ्यांना शासकीय वसतीगृहात प्रवेश घेण्याकरिता ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची मुदत दि. 26 जुलै, 2017 पर्यंत ठेवली होती. दिनांक 26 जुलै, 2017 पर्यंत ज्या विद्यार्थ्यांनी वरील संकेतस्थळाद्वारे ऑनलाईन अर्ज भरले आहेत, अशा पात्र विद्यार्थ्यांना गुणानुक्रमे वसतीगृहात रिक्त जागांवर प्रवेश देण्यात आलेला आहे.

तथापि, मुंबई विद्यापीठाच्या निकालास होत असलेला विलंब व काही शहरात इयत्ता 11 वी च्या प्रवेश फेऱ्या अद्याप सुरु असल्यामुळे तेथे इयत्ता 11 वी मध्ये प्रवेशित होणाऱ्या विद्यार्थ्यांना वसतीगृह प्रवेशसाठी संकेतस्थळ बंद केले असल्यामुळे विद्यार्थी वसतीगृह प्रवेशापासून वंचित राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांनी दि. 26 जुलै 2017 नुसार इयत्ता 11 वी मध्ये महाविद्यालयात प्रवेश घेतलेला आहे अशा विद्यार्थ्यांना वसतीगृह प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज करता यावा म्हणून दि. 10 सप्टेंबर, 2017 पर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे.

ही मुदतवाढ फक्त 26 जुलै, 2017 नंतर इयत्ता 11 वीमध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी लागू राहील. वसतीगृहातील यापूर्वी झालेले नवीन प्रवेश वगळता रिक्त असलेल्या उर्वरीत जागांवर गुणानुक्रमे प्रवेश देण्यातयेईल याची नोंद विद्यार्थ्यांनी घ्यावी, असे आवाहन आयुक्त, आदिवासी विकास यांनी केले आहे.

 

स्रोत : महान्यूज, ६ सप्टेंबर २०१७ 



© 2006–2019 C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate