मिनीॲपोलिस
मिनीॲपोलिस : अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांपैकी मिनेसोटा राज्यातील सर्वांत मोठे व औद्योगिक शहर. लोकसंख्या ३,७०,९५१, उपनगरीय - २१,१४,२५६ (१९८०). हे शिकागोच्या वायव्येस ३६५ किमी., मिसिसिपी नदीच्या दोन्ही काठांवर, मिनेसोटा नदीच्या मुखाजवळ वसले आहे. मिनेसोटाची राजधानी सेंट पॉल व मिनीॲपोलिस ही जुळी शहरे म्हणून ओळखली जातात.